Print
Hits: 41744

आयुर्वेदिक हर्बल कंडीशनर आणि कलप हे वापरासाठी पुर्णतः सुरक्षित आहेत. संबंधित मिश्रणाची सुकी पावडर बनवली आणि साठवली जाऊ शकते. ही साठवून ठेवलेली पावडर बराच काळानंतरही उपयोगात आणली जाऊ शकते. यामुळे केस मुलायम तर होतातच शिवाय केसांचे तुटणेही कमी होते. त्याचबरोबर केसांना चमकदारपणाही येतो.

केसांचा कंडीशनर
सामग्री प्रमाण प्रक्रिया
बवाची एक ते दोन चमचे (बिया)
नागरमोटा एक ते दोन चमचे (मुळ)
तुळशी एक ते दोन चमचे रक्त चंदनाची भुकटी
प्रत्येकी एक भाग सर्व सामग्री गरम पाण्यात चांगल्याप्रकारे मिसळून घ्यावी व त्याची पेस्ट तयार करावी. मिश्रणानाचा केसांवर चांगल्याप्रकारे लेप द्यावा. पाच मिनिटांनी केस पाण्याने धुवावेत.

ईतर औषधी जसे ब्रम्ही, भ्रिंगराज, मेहेंदी (हीना), कडुलिंब, जास्वंद, त्रिफळा.
आवळा प्रत्येकी दोन भाग
शिकाकाई भुकटी प्रत्येकी पाच भाग


वर उल्लेख केलेल्या औषधींची चांगली सुकी भुकटी बनवता व साठवता येते. साठवण्यासाठी फक्त सुक्या व हवाबंद डब्याचा वापर करावा. आंघोळीआधी ही भुकटी पाण्यात किंवा दुधात पेस्ट करुन वापरता येते.

केसांचा कलप
सामग्री प्रमाण प्रक्रिया
मेहेंदी (हीना) आठ चमचे नमूद केलेली सामग्री गरम चहासोबत लोखडी भांड्यात २४ तासांसाठी भिजत ठेवावी. वापराच्याआधी दोन चमचे लिंबुचा रस किंवा विनेगर टाकावे. एक चमचा कॉफी किंवा कत्था मिसळावा. यामिश्रणाचा केसांवर जाड थर द्यावा व एक ते तिन तासांसाठी तसेच राहुन द्यावेत. नंतर केस पाण्याने धुवून घ्यावेत.
नीलीनी (विकल्पिक) आठ चमचे
आवळा/त्रिफळा चार चमचे


हे आयुर्वेदिक कलप पुर्णतः सुरक्षित असतात. तसेच त्यांचे कोणतेही दुष्परीणाम होत नाहीत. मिश्रणाची भुकती कॉफीमध्ये भिजत घातल्याने वापरल्यानंतर केसांना तपकिरी रंगाची झालर येते.