गेल्या दहा वर्षांपासून फाउंडेशन हृदयाच्या वेगवेगळ्या रोगांवर कार्य करीत आहे आणि आयुर्वेदाच्या तत्त्वांवर त्यांचे व्यवस्थापन करीत आहे.
हृदयरोगाचे तीन मुख्य भाग आहेत

- हृदयस्नायूंमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होणे.
- रक्ताचा तुटवडा पडल्याने होणारा हृदयरोग
- रक्ताचा तुटवडा पडल्याने होणारा जुनाट हृदयरोग
हे तिन्ही बिघाड एका वर्गात मोडतात त्यास वाटिका हृदयरोग असे म्हणतात. वाटिका हृदयरोगामध्ये अनेक रोगांचा समावेश होतो. हृदयात अतिशय वेदना होणे, सुईने अगर टाचणीने टोचल्यासारख्या वेदना होणे, पिळवटणे, तुटणे इत्यादीचा यात मुख्यत्वे समावेश होतो. इतर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत मोकळेपणा जाणवणे, धडधडणे अचानक शिथीलता येणे, शुध्द हरपणे इ. चा समावेश होतो. लक्षणांचे विश्लेषण आणि स्पष्टीकरण वेगवेगळ्या मूळग्रंथामध्ये दिलेल्या स्पष्टीकरणाशी जुळते. ही जर रोगाची सुरूवात समजली गेली तर आपल्याला रक्ताचा तुटवडा पडल्याने होणाऱ्या हृदयरोगावर आणि आयुर्वेदाने त्याचे व्यवस्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.