Print
Hits: 18400

अश्वगंधा (Withania somnifera)

Withania somnifera अश्वगंधा

वर्णन
०.५ ते २ मीटर उंचीचे रोमश व डेरेदार क्षुप. पर्ण एकान्तार, ५ ते १० सेमी लांब, पांढरी लव असलेले. पुष्प पिवळट हिरवे, फळ लहान गोल रसदार पिकल्यावर गुंजेप्रमाणे लाल दिसणारे, बीज लहान पिवळे वृक्काकार.

३३ ते १ मीटर लांब, कच्च्या मुळाला घोडयासारखा वास येतो म्हणून अश्वगंधा शरदऋतूत फुले व त्यानंतर फळे येतात. वर्षाऋतूत बी पेरतात व हिवाळ्यात मुळे काढून घेतात. सबंध भारतात व हिमालयात १.५ हजार मीटर उंचीपर्यंत मध्य प्रदेशच्या मंदसोर जिल्ह्यात व्यापारी तत्वावर लागवड केली जाते.
औषधी गुणधर्म
बळवाढीसाठी/शक्तिवर्धक आस्कंदचूर्ण दुधाबरोबर द्यावे. धातूक्षयांवर आस्कंद, तूप, व मध एकत्र करून द्यावीत. दूध वाढण्यासाठी (बाळंतणीस) अश्वगंधी, भुईकोहळा आणि ज्येष्ठमध यांचा काढा गाईच्या दुधाबरोबर द्यावा. वेडेपणा, राजयक्ष्मा (T.B), निद्रानाश, शुक्रक्षय या रोगांवर अश्वगंधची पेस्ट वापरावेत.

चंदन (Santalum album)
या झाडाचे व्यावहारिक नाव त्याच्या भारतीय नावावरून आले आहे.
वर्णन
मध्यम आकाराचा, सदाहरित वृक्ष, फांद्या बहुतेक खाली लटकलेल्या, साल काळी, खडबडीत आणि त्यात सरळ चिरा असलेली, पूर्ण वाढलेले लाकूड सुगंधी, पाने ४-७ सेमी. लांब, संमुख, वरच्या पृष्ठभागावर चमकदार, फुले लहान, फिकी जांभळी, लहान गुच्छांत, फळे गोलाकार, ६ मि. मी. परिघ असलेली, जांभळी, काळी व रसदार.
वितरण
हा वृक्ष भारताच्या द्वीपकल्पी प्रदेशात विशेषत: दक्षिण भारतात नैसर्गिक अवस्थेत उगवतो.
औषधी गुणधर्म
या झाडाच्या लाकडापासून (गाभ्यातून) काढलेले तेल औषधी आहे. हे तेल लघवी होण्याच्या, मूत्राशय सुजण्याच्या, परमा आणि कफ होण्याच्या उपचारात वापरले जाते. लाकूड पाण्याबरोबर उगाळून लेप तयार करतात, तो सुजेवर, तापात कपाळावर आणि त्वचारोगावर लावला जातो. बियांपासून काढलेले तेल त्वचारोगावर वापरले जाते.
इतर उपयोग
लाकूड लहान घरगुती वस्तू बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्याचा सुवास बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतो. लाकडाची भुकटी अगरबत्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येते आणि सुगंधी भूकटी म्हणून देखील वापरली जाते. तेल, साबणे, उटी इत्यादीमध्ये स्नानाच्या सामानात सुगंधी म्हणून देखील वापरली जाते. तेल, साबणे, ऊटी इत्यादीमध्ये स्नानाच्या सामानात सुगंधी म्हणून मोठया प्रमाणावर वापरले जाते आणि कीटकनाशक म्हणूनही वापरतात.