Print
Hits: 6048

दाबतंत्र हे दोन कल्पनांवर आधारलेले आहे.
यीन आणि यांग कल्पना
सामान्यत: यीन आणि यांग ही कल्पना नकारात्मक आणि सकारात्मक कल्पना म्हणून ओळखली जाते. विश्वसृष्टीत राहणा-या व कामकरणा-यांना मिळणारा जोम व जोर हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हे सृष्टीचे उगमस्थान आणि निसर्ग व मानवी शरीर त्यांच्या सर्व साधनांसहीत चालविण्याचे मुख्य घटक आहेत.

ते नाण्यांच्या दोन बाजुंसारखे आहे. जसे यीन व यांग, तसेच स्त्री आणि पुरूष, डावे आणि उजवे, आणि रात्र व दिवस. एकजण दुस-याशिवाय जिवंत राहू शकत नाही. ते एकमेकास कुलुप आणि किल्ली सारखे पुरक आहेत. दोघांचीही जीवनास गरज आहे. यीन आणि यांग मधील एक भाग जरी गेला तरीपण अधुरेपणा येऊ शकतो किंवा जिवंत राहू शकत नाही.

पाच कामे किंवा पाच तत्त्वे
यीन आणि यांग प्रमाणे पाच तत्त्वे जी निसर्ग, ऋतु, रंग, जीवनाचे टप्पे आणि आणखी काही यांना लागू पडते. मानवी शरिरात ही पाच कामे किंवा तत्त्वे, कार्य इंद्रिय, चवी, मुख, वृत्ती आणि बुध्दी यांना लागू पडतात. या पाच तत्वांची अतिशय मिश्र अंतर्गत शरिरविषयक नाते आहे. तेथे गुंतागुंतीचा दाब आणि तोल शरीर यंत्रणेची वाढ होण्यास मदत करते. या पाच तत्वांपैकी सिनरगीझम्‌ आणि अ‍ॅन्टॉगॉनिझम्‌ (विरोध) ह्या तत्वांचे संरक्षण करून, कोणतेही एक तत्व अधिक ताकदवार किंवा दुबळे होऊ न देता, प्रत्येक तत्वाची एक नविन तत्व निर्माण करण्याची व दुसऱ्याचे नियमन करण्याची जबाबदारी असते. निर्मिती व विरोध ही दोन चक्रे ह्यातून आपल्याला मिळतात.