Print
Hits: 5183

ऍक्युपंक्चर म्हणजे काय?

ऍक्युपंक्चर या उपचार पध्दतीत विशिष्ठ बिंदूमध्ये उर्जेचा प्रवाह संतूलीत करण्यासाठी होतो. ज्या मुळे वेदने पासुन मुक्ती मिळविण्यात मदत, चालना मिळू शकते. आरोग्य हे उर्जेच्या संतूलीतपणावर आधारले आहे या विश्वासावर ऍक्युपंक्चर ही उपचार पध्दती आधारीत आहे. Qi शरीरातील प्रमुख १२ उर्जा प्रवाह मार्गामधून पसरत असते. ज्याला मेरीडीयन असे म्हणतात.

प्रत्येक मेरीडीयन हे विशिष्ट अवयवांना जोडलेले असते. मेरीडीयन प्रजातीत १००० पेक्षा जास्त ऍक्युबिंदू असतात. त्यांना उद्दीपीत करून (Qi) उर्जेचा प्रवाह नियंत्रीत केला जातो. ऍक्युपंक्चर हा शब्द लॅटीन भाषेतील Acus म्हणजे सुया व Puncturc ही चीनी उपचार पध्दती ४५०० वर्ष जुनी आहे.

आपण ऍक्यूपंक्चरचा वापर का करतो?

विविध आरोग्य समस्यांसाठी हजारो लोकांनी ऍक्यूपंक्चर ही उपचार पध्दती वापरली आहे. अनेक शास्त्रीय अभ्यासकांनी त्याची उपयुक्तता सिध्द केली आहे. दाब, उष्णता, लेझर आणि Moxibustion (शरीराच्या विशिष्ठ भागाजवळ वनस्पती जाळणे) ही इतर उद्दीपीत करणारी तंत्रे आहेत. WHO जागतिक आरोग्य संघटनेने ४० च्या वर विशिष्ट शारीरीक व्याधींची यादी आहे. ज्यामध्ये ऍक्युपंक्चरचा वापर होऊ शकतो. यामध्ये नॉशिया, वेदने पासून आराम, दारूचे तंबाखूचे व्यसन, आणि इतर ड्रग्ज फुफ्फूसाच्या समस्या, उदा. दमा, स्ट्रोकमूळे खराब झालेले मज्जातंतू यावर प्रतीबंधक व उपचार म्हणून केला जातो.

वेदने पासुन आराम मिळविण्यासाठी याचा खरोखरच उपयोग होतो का ?

शस्त्रक्रीये नंतर होणाऱ्या वेदना स्नायु/हाडांच्या वेदना या मध्ये ऍक्यूपंक्चरचा यशस्वी वापर केला जातो. यामध्ये पाठीच्या खालील वेदना, रेमीस ऎल्बो, तीव्र स्नायुंची सुज याचा समावेश आहे. अभ्यासांनी असे सिध्द झाले आहे की, ऍक्यूपंक्चर मुळे शरीरातील वेदना रसायन ज्याला एंडॉर्फीन म्हणतात, ज्याचा स्त्राव निर्माण होण्यास मदत होते. एंडॉर्फीन हे वेदना थांबविण्यावर अत्यंत प्रभावी आहे.

ऍक्यूपंक्चरचा जास्त प्रभावी उपयोग कोठे होतो?

असंख्य प्रात्यक्षिके आणि शोध निबंधानी असेस सिध्द केले आहे की, गरोदरपणामुळे येणारा नॅशिया, (मळमळ) शस्त्रक्रिये साठी होणारी भूल किंवा केमोथेरेपी यामध्ये ऍक्यूपंक्चर हे चांगला प्रतिसाद देते.

व्यसन आणि एड्स

जेंव्हा व्यसनावरती उपचार म्हणून या पध्दतीचा वापर केला तेंव्हा असे जाणवले की, त्या व्यक्तीची त्या पदार्थाची ओढ (cravinge) कमी झाली आहे, मानसिक परीस्थीतीपण सूधारली आहे. Withdrawal Symptoms ची तीव्रता खूपच कमी झालेली आढळली. ऍक्यूपंक्चर हे चीनी वनौषधी बरोबर जेंव्हा एड्स रूग्णांसाठी वापरले तेंव्हा त्यांची प्रतिकार शक्ती सुधारल्याचे तसेच, पचन क्रियेतील समस्या कमी झाल्याचे, थकवा कमी झाल्याचे व इतर लक्षणे कमी झाल्याचे आढळले.