Print
Hits: 4237

शरीरामधे सातत्याने उर्जेचा स्त्रोत वहात असतो, त्याला क्वी (Qi) चीनी भाषेत ची (Chi), जपानी भाषेत की (Chi) आणि आयुर्वेदात प्राण म्हटले जाते.

ऍक्युपंक्चर तंत्रे
ऍक्युपंक्चर तंत्रे

या उर्जेला धन अणि ऋण असे दोन घटक असतात त्याला यांग आणि यिन म्हटले जाते. सर्वसामान्य माणसात हे घटक असतात. ज्यावेळेस या उर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो किंवा कमतरता निर्माण होते किंवा जास्त उर्जा निर्माण होते, किंवा एखाद्या अवयवात धन व ऋण घटकांचे असंतूलन निर्माण होते त्यावेळी ती व्यक्ती आजारी पडते.

शरीराच्या पृष्ठभागावर जवळ जवळ १००० बिंदू आहेत. निदानानंतर त्यापैकी ६ ते १० बिंदू उपचारासाठी निवडले जातात. सुया बॅटरीच्या सहाय्याने वापरल्या जाणाऱ्या यंत्राने विद्युत भारीत केल्या जातात. विद्यूत प्रवाह हा फक्त ९ व्होल्टस्‌ पर्यंतच वापरला जातो जो निरूपद्रवी आहे. सुया १५ ते २० मिनीटापर्यंत ठेवल्या. जातात. या एका कृतीस १ सीटींग असे म्हणतात. १ सीटींग दररोज असे १० दिवस हा एक कोर्स होतो. जर २ रा कोर्स आवश्यक असेल तर तो सुरू करण्यापूर्वी १० दिवसानंतर परत आढावा घेतला जातो.