Print
Hits: 4836

सुगंधी तेलांचे त्यांच्या गुणधर्मांनुसार आणि उपयुक्ततेनुसार वेगवेगळ्या प्रकारांमधे विभाजन केले जाते.

टॉप नोटस, मिड्ल नोटस आणि बेस नोटस

गंधोपचारासाठी वापरली जाणारी सुगंधी तेले:
गंधोपचारासाठी वापरली जाणारी सुगंधी तेले


टॉप नोटस
ह्या प्रकारचे तेल त्वरीत हवेत विरघळणारे असते. त्याचप्रमाणे शरीर आणि मनाला उभारी देणारेही असते.
उदाहरणार्थ: तुळस, क्लॅरी सेज.

मिड्ल नोटस
ह्या प्रकारच्या तेलांचा सुगंध त्यामानाने कमी असतो. परंतु त्याचा जास्त उपयोग शरीर कार्यासाठी होतो. जसे की पचनशक्ती, मासिकपाळी इत्यादि.
उदाहरणार्थ: लव्हेंडर

बेस नोटस
ह्या प्रकारच्या तेलांना सहसा थोडा उग्र आणि थोडा सौम्य गंध असतो. ज्यामुळे शरिराला एक छान आराम मिळतो.
उदाहरणार्थ: पचौली, चंदन.

सर्वसाधारण व्याधींच्या उपचारांमध्ये वापरण्यात येणारी उपयुक्त तेले:

 1. चंदन
 2. लव्हेंडर
 3. युकॅलिप्टस
 4. तुळस
 5. सेज
 6. ज्युनिपर
 7. पेपरमिंट
 8. जास्वंदी
 9. पचौली
 10. गुलाब

ही तेले ठराविक प्रमाणात मसाज, स्नान ह्या साठी शरीर आणि इतर त्वचेसाठी वापरली जातात.

ही तेले पुढील गोष्टींसाठीही वापरली जातात:

 1. इनहेलेशन
 2. स्नान
 3. मुखशुद्धी
 4. हात आणि पायाची स्वच्छता
 5. कॉम्प्रेस
 6. चहा
 7. रूम फ्रेशनर
 8. परफ्यूम्स
 9. शुद्ध तेलाच्या वापरासाठी