Print
Hits: 6874

गंधोपचार आता दिवसेंदिवस एक पर्यायी उपचार म्हणून मान्यताप्राप्त होऊ लागला आहे. आजकालच्या धाकाधकीच्या जीवनात माणूस नेहमीच पर्यायी उपचार शोधत असतो. त्यातही गंधोपचाराचे आपल्या शरिरावर आणि मनावर खूपच चांगले परिणाम दिसून येतात. त्यामुळे अनेक जण ह्या उपचारांकडे आकर्षिले जातात. मुख्यत: गंधोपचारात वापरली जाणारी सर्व तेले आणि सुगंधी द्रव्ये ही पूर्णत: नैसर्गिक असतात, आणि त्यामुळेच त्याचे परिणामही आपल्याला जास्त कालावधीसाठी दिसून येतात. प्रदुषीत जीवनशैलीमधे आपण निसर्गाच्या जितके जवळ जातो, तितके ताजेतवाने होतो. हीच गोष्ट ह्या उपचार पद्धतीमधे घडते. गंधोपचार तुम्हाला सकारात्मक विचारांच्या दिशा - पॉझिटिव्ह वेव्हस- सुद्धा देते. ही उपचार पद्धती वापरणे सुरू करण्याच्या आधी मात्र आपल्याला त्या बद्दल पूर्णत: ज्ञान असणे जरुरीचे आहे. म्हणजे त्याचे परिणाम तुमच्यावर तर दिसून येतीलच, आणि तुमच्या कुटुंबियांना, जवळच्या माणसांनासुद्धा सुदृढजीवनशैलीसाठी त्याचा खूप उपयोग होईल.

तुमच्या रोजच्या जीवनशैलीमधे गंधोपचाराचा वापर करणे तसे खूप सोपे असते. हा त्यामधील खूप मोठा फायदा आहे. शिवाय तुम्ही गंधोपचार घरच्या घरी वापरून, त्याचा अनुभव घेऊन निर्णय घेऊ शकता.

गंधोपचार पद्धती घरच्याघरी वापरण्याच्या काही पद्धती आहेत.

 1. गंधोपचार आणि स्नान
 2. गंधोपचार आणि मसाज
 3. गंधोपचार आणि उपचार

गंधोपचार आणि स्नान
गंधोपचारातील स्नान हे शरीराला आराम मिळण्यासाठी, थकवा घालवण्यासाठी खूपच प्रभावी असते. त्वचेवरील रंध्र जेव्हा बुजून जातात, तेव्हा गंधोपचार हा त्यावरील अक्सीर इलाज समजला जातो. गंधोपचाराने रंध्र-रंध्र मोकळी होण्यास आणि त्वचेला तजेला मिळण्यास खूपच उपयोग होतो. प्रत्येकाच्या गरजांप्रमाणे वेगवेगळी तेले गंधोपचारात वापरली जातात. ह्या स्नानानंतर स्नायूंवर येणारा ताण आणि मनावरचा शीण हलका होण्यास सुद्धा खूपच मदत होते. शीण आणि ताण जवळजवळ नाहीसाच होतो म्हंटले तरी चालेल.

गंधोपचाराची स्नान सामुग्री (बाथ प्रॉडक्टस)
गंधोपचारातील स्नान सामुग्री म्हणजेच बाथ प्रॉडक्टसचा वापर खूपच प्रभावी असतो. ही बाथ प्रॉडक्टस वापरायला खूपच सोपी असतात. ते वापरायचे एकदा तंत्र समजले की हे तुमचे तुम्ही सुद्धा करू शकता.

गंधोपचारामध्ये स्वत:ला वाहून घेणे ही फारच कमी खर्चीक, सोयीची, आणि कुणावर अवलंबून न रहाण्याची उपचार पद्धती आहे. मुख्य म्हणजे ह्यामुळे कोणते साईड इफेक्टस सुद्धा होत नाहीत.

गंधोपचाराची स्नान सामुग्रीमधे भरपूर विविधता असते.

बाथ सॉल्ट

गंधोपचाराची सर्व औषधे
गंधोपचाराच्या प्रत्येक औषधाचा वापर कोमट वहात्या पाण्यात करणे अपेक्षित असते. जेव्हा ते औषध पाण्यात पूर्ण विरघळते तेव्हा ते पाणी स्नानासाठी वापरण्यास योग्य असते. त्या गंधयुक्त नैसर्गिक तेलांचा सुगंध खोलीभर पसरतो, आणि वातावरणही चैतन्यमय होते. हे पाण्यातले तेल त्वचेच्या रंध्रांमधून प्रवेश करते. रंध्रे मोकळी होऊ लागतात आणि आपला थकवा, कंटाळा नाहिसा होऊ लागतो आणि एखादे दुखणे असेल तर हळूहळू कमी होऊ लागते. गंधोपचाराचा परिणाम हा अशा त-हेने त्वरित दिसायला लागतो.

गंधोपचारात अशी जवळजवळ १०० प्रकारची विविध गुणधर्म असलेली तेले असतात. काही गंधोपचार पद्धतींमधे दोन किंवा त्या पेक्षा जास्त तेलांचा, काही वेळा त्या तेलांच्या मिश्रणांचा समावेश असतो. योग्य तेलांची निवड करण्यासाठी खालील मुद्यांची मदत घ्या:

गंधोपचारातील स्नानाचे पाणी तयार करणे सोपे असते. पूर्ण कोमट पाण्याने भरलेल्या बाथ टब मधे ८ थेंब तेल टाकावे, आणि त्यात आपले शरीर हलके करावे. आपल्या गरजे प्रमाणे, आवडी प्रमाणे अनुभवानुसार त्या पाण्यात तेलाचे थेंब टाकावेत. दर वेळी वेगवेगळ्या तेलांचा अनुभव घेतला की आपली गरज आणि आवड आपल्याला लक्षात येते. गंधोपचार स्नान नियमीत सुरू केल्यास त्याचा सुयोग्य परिणाम आपल्याला लवकरच दिसून येतो.

गर्भवती स्त्रीने गंधोपचाराचा वापर करण्या आधी डॉक्टरांना जरूर विचारावे. कारण काही तेले गर्भार अवस्थेत वापरू नयेत अशी असतात.

गंधोपचार स्नान घेण्यापूर्वी काही गोष्टी जरूर लक्षात ठेवाव्यात.

गंधोपचार स्नान घ्यायला सुरवात केल्यावर योग्य ती तेले तुमच्या त्वचेच्या रंध्रांमधे प्रवेश करू लागतील आणि त्याचा असर लगेच दिसायला लागेल. त्यामुळे कोणतेही गंधोपचार स्नानासाठी तेल विकत घेताना हे लक्षात ठेवा, की ही तेले कोणतेही साईड इफेक्ट नसलेली आहेत. ह्या तेलांना घाबरू नका. त्यांनी तुम्हाला तोटा होणार नसून फायदाच होणार आहे.

तर कधी घेणार गंधोपचार स्नानाचा आनंद?


गंधोपचार आणि मसाज
तेलाचा चांगल्या त-हेने उपयोग करून घेण्यासाठी मसाज हा सर्वोत्तम पर्याय आहे. मसाज तेले वास नसलेल्या इतर पातळ तेलांमधे मिसळली जातात. उदाहरणार्थ: द्राक्षाचे बियांचे तेल, गोड बदामाचे तेल, किंवा पीचच्या बियांचे तेल.

मसाजसाठी वापरणार असलेले तेल ३% घेऊन पातळ तेलात मिसळावे. (जर मसाज तेल नाजूक त्वचेवर वापरायचे असल्यास अजून थोडे कमी घ्यावे.) ३% असे म्हंटल्यास नेमके किती घ्यावे ते आपल्याला कळत नाही; त्यामुळे त्याचे अंदाजे प्रमाण म्हणजे २ मिलिलिटर पातळ तेलात एक थेंब गंधोपचार तेल. पण गंधोपचारातील मसाजसाठी, तेल जास्त होण्यापेक्षा कमी पडलेले बरे, असे म्हणतात.

मसाज तेले त्वचेवर शोषून घेऊन ती रक्तात मिसळली जातात हा गैरसमज आहे. त्यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. त्वचा हा शरिरातील सर्वात मोठा अवयव आहे. सर्व शरीर झाकून टाकणारा आणि शरिराची आणि आतील इतर अवयवांची कळजी घेणारा अवयव म्हणजे त्वचा.

जिरेनियम
शरीर आणि मनाला मसाजाने स्वास्थ्य आणि संतुलन देणारे तेल म्हणजे जिरेनियम तेल होय. ह्या तेलाला ताजा, अगदी थोडा उग्र आणि गोडसर वास असतो, ज्यामुळे शरिराला खूप छान आराम मिळतो आणि मनाला शांती मिळते. तसेच ह्या तेलाच्या मसाजामुळे भावनिक संतुलन सुद्धा राखले जाते. सर्व प्रकारच्या त्वचांसाठी हे तेल चालते. काही वेळा त्यात लव्हेंडर किंवा बरगॅमोट तेल मिसळल्यास त्याचे उत्तम रूम फ़्रेशनर होऊ शकते.

स्त्रोत: चीन मधील पाने आणि मुळे
करण्याची पद्धत: स्टीम डिस्टिलेशन
गंधोपचाराचा प्रकार: संतुलित, आरामदायी.
त्वचा प्रकार: तेलकट, कोरडी त्वचा
पारंपारिक पद्धत: त्वचेला उजाळा देणारे, बरे करणारे
तेलाचे प्रकार: द्राक्षाचे तेल, चमेलीचे तेल, जास्वंदीचे तेल, चंदनाचे तेल, लव्हेंडर, लिंबू, संत्री इत्यादी.


गंधोपचार आणि उपचार
गंधोपचाराचे उपचार आपल्या अंतरिक शरिरासाठी जितके उपयोगी आहे तितकेच बाह्य शरिरासाठीही उपयोगी असते. सर्वसामान्य शारिरीक स्थीती जेव्हा सुधारते आणि आपण गंधोपचाराचे उपचार घेतो तेव्हा त्याचे कमालीचे परिणाम दिसून येतात.

उपचारांच्या वेळी घ्यायची काळजी
गंधोपचाराचे उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्याला मिश्रणे आणि मसाज पद्धतींची योग्य रितीनी माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण फक्त लक्षणांवरून उपचार सुरू केले, त्याबद्दल खात्री नसेल, किंवा चुकीचे तेल निवडले तर जादूची कांडी फिरवल्या प्रमाणे त्या व्यक्तीची तब्येत सुधारण्याची अपेक्षा करू नये.

गंधोपचारातील उपयोग खालील व्याधींवरिल उपचारांसाठी होऊ शकतो:

 1. मासिक पाळी
 2. मल-मूत्र व्याधी
 3. स्नायू दुखापत
 4. नैराश्य
 5. श्वासोच्छ्वास
 6. त्वचा
 7. निद्रानाश
 8. अस्थिव्यंग
 9. गादी ओली करणे
 10. अती घाम येणे