गंधोपचार आणि स्नान
गंधोपचारातील स्नान हे शरीराला आराम मिळण्यासाठी, थकवा घालवण्यासाठी खूपच प्रभावी असते. त्वचेवरील रंध्र जेव्हा बुजून जातात, तेव्हा गंधोपचार हा त्यावरील अक्सीर इलाज समजला जातो. गंधोपचाराने रंध्र-रंध्र मोकळी होण्यास आणि त्वचेला तजेला मिळण्यास खूपच उपयोग होतो. प्रत्येकाच्या गरजांप्रमाणे वेगवेगळी तेले गंधोपचारात वापरली जातात. ह्या स्नानानंतर स्नायूंवर येणारा ताण आणि मनावरचा शीण हलका होण्यास सुद्धा खूपच मदत होते. शीण आणि ताण जवळजवळ नाहीसाच होतो म्हंटले तरी चालेल.
गंधोपचाराची स्नान सामुग्री (बाथ प्रॉडक्टस)
गंधोपचारातील स्नान सामुग्री म्हणजेच बाथ प्रॉडक्टसचा वापर खूपच प्रभावी असतो. ही बाथ प्रॉडक्टस वापरायला खूपच सोपी असतात. ते वापरायचे एकदा तंत्र समजले की हे तुमचे तुम्ही सुद्धा करू शकता.
गंधोपचारामध्ये स्वत:ला वाहून घेणे ही फारच कमी खर्चीक, सोयीची, आणि कुणावर अवलंबून न रहाण्याची उपचार पद्धती आहे. मुख्य म्हणजे ह्यामुळे कोणते साईड इफेक्टस सुद्धा होत नाहीत.
गंधोपचाराची स्नान सामुग्रीमधे भरपूर विविधता असते.
बाथ सॉल्ट
- बाथ सॉल्ट्स आणि पावडर ह्या स्नान करण्यापूर्वी स्नानाच्या पाण्यात घालायच्या असतात. अशा पावडर घातलेल्या पाण्यामुळे त्वचेचे डिटॉक्सिफिकेशन होण्यास आणि रंध्रे मोकळी होण्यास मदत होते. काही बाथ सॉल्ट्समुळे पाण्याचा रंग थोडासा बदलतो. परंतु त्याने होणारा फायदा एवढा असतो, की तुमच्यात एक तजेलदारपणा आणि नवचैतन्य येते.
- साजेशी तेले पाण्यात (प्रमाणात सांगितल्या इतके थेंब) घालावी.
- पाण्यात बाथ जेल घालून सुद्धा च्या त्वचेसाठी उपयुक्त ठरतात.
- काही क्रीम्स आणि लोशन्स बाथ च्या वेळी वापरणे सुद्धा फलदायी असते.
गंधोपचाराची सर्व औषधे
गंधोपचाराच्या प्रत्येक औषधाचा वापर कोमट वहात्या पाण्यात करणे अपेक्षित असते. जेव्हा ते औषध पाण्यात पूर्ण विरघळते तेव्हा ते पाणी स्नानासाठी वापरण्यास योग्य असते. त्या गंधयुक्त नैसर्गिक तेलांचा सुगंध खोलीभर पसरतो, आणि वातावरणही चैतन्यमय होते. हे पाण्यातले तेल त्वचेच्या रंध्रांमधून प्रवेश करते. रंध्रे मोकळी होऊ लागतात आणि आपला थकवा, कंटाळा नाहिसा होऊ लागतो आणि एखादे दुखणे असेल तर हळूहळू कमी होऊ लागते. गंधोपचाराचा परिणाम हा अशा त-हेने त्वरित दिसायला लागतो.
गंधोपचारात अशी जवळजवळ १०० प्रकारची विविध गुणधर्म असलेली तेले असतात. काही गंधोपचार पद्धतींमधे दोन किंवा त्या पेक्षा जास्त तेलांचा, काही वेळा त्या तेलांच्या मिश्रणांचा समावेश असतो. योग्य तेलांची निवड करण्यासाठी खालील मुद्यांची मदत घ्या:
- रात्री गाढ आणि सुंदर निद्रेसाठी लव्हेंडर तेल.
- युकॅलिप्टस तेलामधे अविस्मरणीय सुगंध आणि गूण हे छाती आणि डोकेदुखीतून सुटका-यासाठी उपयुक्त ठरतात.
- जिरॅनियम तेलामुळे शरीर स्वस्थ होते आणि उग्र वासामुळे एक वेगळाच गूण येतो.
- पुदीना तेलामध्ये तर मन आणि शरीर प्रसन्न होऊन त्यात तजेला येण्याचे गूण असतात.
गंधोपचारातील स्नानाचे पाणी तयार करणे सोपे असते. पूर्ण कोमट पाण्याने भरलेल्या बाथ टब मधे ८ थेंब तेल टाकावे, आणि त्यात आपले शरीर हलके करावे. आपल्या गरजे प्रमाणे, आवडी प्रमाणे अनुभवानुसार त्या पाण्यात तेलाचे थेंब टाकावेत. दर वेळी वेगवेगळ्या तेलांचा अनुभव घेतला की आपली गरज आणि आवड आपल्याला लक्षात येते. गंधोपचार स्नान नियमीत सुरू केल्यास त्याचा सुयोग्य परिणाम आपल्याला लवकरच दिसून येतो.
गर्भवती स्त्रीने गंधोपचाराचा वापर करण्या आधी डॉक्टरांना जरूर विचारावे. कारण काही तेले गर्भार अवस्थेत वापरू नयेत अशी असतात.
गंधोपचार स्नान घेण्यापूर्वी काही गोष्टी जरूर लक्षात ठेवाव्यात.
- बाथ टब कोमट पाण्याने (थोडे जास्त कोमट, पण गरम नाही.)भरून घ्यावा.
- पाण्यामधे सुगंधी तेले घालण्यापूर्वी बाथरूमचे दार लाऊन घ्यावे. म्हणजे तो उपचाराला साजेसा सुगंध बाथरूम मधेच राहील आणि तुमच्या श्वसोच्छ्वासात तो आल्याने त्याचा परिणाम जास्त चांगला होईल.
- नेहमी पहिल्यावेळी पाण्यात जाण्यापूर्वी आधी त्या पाण्यात हात ओले करा. नुसते हात पाण्यात घाला. म्हणजे ते तेल जर तुमच्या शरिराला लागू होत नसेल तर लगेच कळून येईल.
- पाण्यात गेल्यावर कधी शांततेनी तर कधी एखादे संगीत ऐकत गंधोपचाराचा आस्वाद घ्या!
गंधोपचार स्नान घ्यायला सुरवात केल्यावर योग्य ती तेले तुमच्या त्वचेच्या रंध्रांमधे प्रवेश करू लागतील आणि त्याचा असर लगेच दिसायला लागेल. त्यामुळे कोणतेही गंधोपचार स्नानासाठी तेल विकत घेताना हे लक्षात ठेवा, की ही तेले कोणतेही साईड इफेक्ट नसलेली आहेत. ह्या तेलांना घाबरू नका. त्यांनी तुम्हाला तोटा होणार नसून फायदाच होणार आहे.
तर कधी घेणार गंधोपचार स्नानाचा आनंद?