गंधोपचार आता दिवसेंदिवस एक पर्यायी उपचार म्हणून मान्यताप्राप्त होऊ लागला आहे. आजकालच्या धाकाधकीच्या जीवनात माणूस नेहमीच पर्यायी उपचार शोधत असतो. त्यातही गंधोपचाराचे आपल्या शरिरावर आणि मनावर खूपच चांगले परिणाम दिसून येतात. त्यामुळे अनेक जण ह्या उपचारांकडे आकर्षिले जातात. मुख्यत: गंधोपचारात वापरली जाणारी सर्व तेले आणि सुगंधी द्रव्ये ही पूर्णत: नैसर्गिक असतात, आणि त्यामुळेच त्याचे परिणामही आपल्याला जास्त कालावधीसाठी दिसून येतात. प्रदुषीत जीवनशैलीमधे आपण निसर्गाच्या जितके जवळ जातो, तितके ताजेतवाने होतो. हीच गोष्ट ह्या उपचार पद्धतीमधे घडते. गंधोपचार तुम्हाला सकारात्मक विचारांच्या दिशा - पॉझिटिव्ह वेव्हस- सुद्धा देते. ही उपचार पद्धती वापरणे सुरू करण्याच्या आधी मात्र आपल्याला त्या बद्दल पूर्णत: ज्ञान असणे जरुरीचे आहे. म्हणजे त्याचे परिणाम तुमच्यावर तर दिसून येतीलच, आणि तुमच्या कुटुंबियांना, जवळच्या माणसांनासुद्धा सुदृढजीवनशैलीसाठी त्याचा खूप उपयोग होईल.
तुमच्या रोजच्या जीवनशैलीमधे गंधोपचाराचा वापर करणे तसे खूप सोपे असते. हा त्यामधील खूप मोठा फायदा आहे. शिवाय तुम्ही गंधोपचार घरच्या घरी वापरून, त्याचा अनुभव घेऊन निर्णय घेऊ शकता.
गंधोपचार पद्धती घरच्याघरी वापरण्याच्या काही पद्धती आहेत.
- गंधोपचार आणि स्नान
- गंधोपचार आणि मसाज
- गंधोपचार आणि उपचार