Print
Hits: 6465

आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की आपण सर्वांनी वार्षिक तपासण्या करणे केवढे गरजेचे आहे. पण आपण तशा तपासण्या खरच करतो का? वर्षातून एकदा तरी ह्या तपासण्या करणे गरजेचे आहे. चाळीशीनंतर अनेक चाचण्या नियमीत करणे अत्यंत जरूरीचे असते. पन्नाशी नंतर आपल्या कोणत्या व्याधी सुरू झाल्या आहेत, त्यानुसार इतरही चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे गरजेचे असते. त्यातील काही चाचण्या:

नियमीत करायच्या तपासण्या
रक्तदाब
तुमचा रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर - बी.पी. हे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही डॉक्टर कडे जाल तेव्हा तपासले पाहिजे.

उंची
ओस्टिरोपोरोसिस मुळे ब-याच वेळा पाठीला बाक येऊन उंची मध्ये फरक पडू शकतो.

वजन
अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे हे गंभीर आजारचे लक्षण असू शकते. वजन वाढल्यामुळे ह्रुदय रोग, लीव्हर, मुत्रपिंडाचे आजार होऊ शकतात.

रक्त कार्य
रक्ताच्या वार्षीक तपासण्या केल्या पाहिजेत, रक्तातील साख्ररेचे प्रमाण तपासण्यासाठी, तसेच थायरॉइड डिसॉर्डर आहे की नाही, आणि इतरही ब-याच तपासण्या तुमच्या अनुवंशिकते नुसार तपासले जाते.

छातीचा एक्स रे
ही चाचणी टी.बी म्हणजेच क्षयरोग, कर्करोग, ह्यांचे निदान करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते.

इ.के.जी टेस्ट
ही चाचणी सर्वसाधारणपणे स्त्री-पुरुषांनी वयाच्या ५० शी नंतर केली पाहिजे आणि त्या नंतर दर २-३ वर्षातुन एकदा केली पाहिजे.

गरज पडल्यास करावयाच्या चाचण्या
रक्तवाहिन्यांची तपासणी
ज्या रक्तवाहिन्या -करोनरी आर्ट्रीज- आपल्या ह्रदयाला रक्त पुरवतात, त्याच तुमच्या मेंदूला पुरवतात. त्या रक्तवाहिन्यांची खराबी आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांची खराबी अशी समांतर प्रक्रीया सुरू असते. तेव्हा ह्रुदयाच्या रक्तवाहिन्यांची जेव्हा तपासणी कराल तेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांची सुद्धा तपासणी करा. म्हणजे त्यासाठे मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा फोटो म्हणजे ऍंजिओग्राम काढायची गरज नाही. कारण शेवटी मेंदूला रक्तवाहिन्या ह्या मानेतून मिळतात. ह्या रक्तवाहिन्यांना कॅरॉकिड असं नाव आहे. तर ह्या रक्तवाहिन्यांची सोनोग्राफी, ज्याला डॉपलर म्हणतात, ही चाचणी केली तर रक्तवाहिन्यांच्या आतलं अस्तर असतं तिथे काही खराबी असेल तर दिसून येते.

एम.आर.आय. आणि कॅट स्कॅन
एम.आर.आय. आणि कॅट स्कॅन ह्या दोन चाचण्या इमेजिंग ह्या सदरात मोडतात. इमेजिंगच्या ह्या तंत्रज्ञानामुळे मेंदूचे फोटो घेता येतात. ह्या फोटोंमुळे मेंदूच्या अंतर्गत रचनेत काही बिघ्हाड असल्यास, अनैसर्गिक वाढ असल्यास, ट्युमर असल्यास लगेच दिसून येते. ह्या दोन चाचण्यांचा उपयोग आजाराच्या निदानासाठी तसेच उपचारांसाठी होतो.

ई.ई.जी.
इलेक्ट्रोएन्सिफालोग्राफ म्हणजे ई.ई.जी. या चाचणीमधे रुग्णाच्या डोक्याला छोट्या वायर्स चिकटवतात. या वायर्स द्वारे मेंदूतील पेशींच्या विद्युत लहरींची नोंद कागदावर नागमोडी रेषांच्या रुपात केली जाते. या लहरी आपल्याला कॉम्प्युटरच्या मॉनिटरवर पाहताही येतात.