- अचानक कामाची प्रत कमी होणे.
- कुठलेही काम करायला आपण असमर्थ आहोत असे वाटणे.
- काम सुरू करण्यापुर्वीच काम करता येणार नाही असे वाटणे.
- क्षमतेइतकं काम करत नाही असं वाटणं.
- बरोबरीच्या मुलामुलींच्या इतपत शिक्षणात प्रगती नसणं.
- अंक व अक्षर यांच्या क्रमामध्ये सातत्य ठेवता न येणे.
- शरीराचे अवयव ओळखण्यात सातत्य नसणे.
- आजूबाजूच वातावरण व किरकोळ आवाज यांनी लक्ष विचलीत होणे.
- पुस्तक व चित्र नेहमी उलटी धरून बघणे.
- लक्ष देऊन एखादी गोष्ट करण्यामध्ये अडचण येणे.
- एकापेक्षा अधिक अंक क्रमाने वापरता न येणे.
- अधून मधून स्मरणशक्ती क्षीण होणे.
- खुर्ची किंवा बाकावर मागे पुढे झुलत राहणे.
- आज एखादी गोष्ट आठवली तर उद्या न आठवणं.
- साध्यासुध्या सूचना नीट अमलात न आणता येणे.
- पेन पेन्सिल अतिशय घट्ट पकडणे.
- चौकोन, त्रिकोण, वर्तुळ इत्यादी आकृत्या नीट न काढता येणे.
- माणसाचं चित्र काढायला सांगितल्यावर नुसत्या रेघोट्या ओढणे.
- विषयाशी असंबध्द अशी तोंडी उत्तर देणे.
- केस उपटणे.
- पेनाची शाई स्वतःवर उडवणं.
- नखं कुरतडणं, खाजवणं, नाकात बोटे घालणे.
- दुसऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांना त्रास देणे.
- दुसऱ्या मुलांबरोबर क्रूरपणे वागणे.
- जाणीवपूर्वक दूसऱ्या मुलांना इजा पोहोचवणं.
- मुक्या प्राण्यांशी क्रूरपणे वागणे.
- शाळेची बस किंवा शाळेत जाता येता सतत कटकट करणे.
- सतत रागाचा उद्रेक होणे.
- शाळेतून किंवा घरून पळून जाणे.
- मागील अनुभवावरून काही न शिकणे.
- शाळेचे नियम न पाळणे.
- अधिकाधिक व्यक्तींना सतत विरोध करणे.
- सतत चोऱ्या करणे.
- वयाने मोठे असलेल्या व्यक्तींबरोबर जास्ती घसट असणे.
- त्याच्याकडे बघून इतरांना त्याच्याबद्दल आत्मीयता न वाटणे.
- उलट्या होणे.
- गिळण्याला त्रास होणे.
- सतत पोटदुखी जाणवणे.
- शरीरावर, चेहऱ्यावर सतत पुरळ उठणे.
- घशातून सतत चमत्कारिक आवाज येणे.
- सतत सर्दी, खोकला होणे.
- सतत हगवण लागणे.
- जाणीवपूर्वक दुसऱ्याला त्रास देणे, छळणे.
- पालक दारू किंवा तत्सम् व्यसणाच्या आहारी गेल्याची लक्षणे दिसणे.
- पालक किंवा घरातील इतर कोणाकडून तरी हडतहूडत केलेलं जाणवणे.
- मुलाच्या मर्यादा पालकांनी लक्षात घेतलेलं जाणवणे.
- मुलाची तक्रार नेल्यानंतर पालकांनी आक्रमक होणे.
- पालकांनी मुलाचा सतत पाणऊतारा केलेला असणे.
- पालकांनीच मुलाला शाळेत गैरहजर रहायला लावणे.
- पालक इतर मुलांच्या बरोबर खेळायला देत नाहीत अशी मुलाची तक्रार असणे.
लहान वयामध्ये येणाऱ्या अडचणी - शंभर ठळक खुणा व लक्षणे
- Details
- Hits: 12087
6
मुलांचे आरोग्य
आहार म्हणजे काय?
