Print
Hits: 8803

लहान मुलांच्या क्रिडाप्रशिक्षणची मुलतत्वे
१. लहान मुलांच्या क्रिडा प्रशिक्षणामध्ये सर्वाधिक प्राधान्य, त्यांना आनंद व करमणूक वाटण्यास, कौशल्य आत्मसात करण्यास द्यायला हवे.
२. क्रिडा प्रशिक्षणमध्ये त्यांना सतत प्रोत्साहन देणे, शरीराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी, विविध खेळांचा, क्रिडा प्रकारांचा समावेश करणे.
३. क्रिडा प्रशिक्षणात, लहान मुलांनी, पालकांच्या मार्गदर्शकांच्या , अगर शिक्षिकेच्या आवडीचे खेळ न खेळता स्वत:च्या आवडीचे खेळ खेळणे.
४. खेळताना खालील गोष्टींबद्दल फार आग्रही असू नये. टारगेट फुलफीलमेंट खेळ शेवटपर्यंत खेळणे. काटेकोरपणे नियमांचे पालन करणे टोकांची शिस्तबध्दता, परिपूर्णता, अचूकता
५. लहान मुलांच्या क्रिडा प्रशिक्षणाचा कालावधी एका वेळेला १०-१५ मिनिटांपेक्षा अधिक नसावा.
६. क्रिडा प्रशिक्षण हे त्या खेळांमधील तज्ञांकडूनच दिले जावे.
७. बाल क्रिडापटूंची वेळोवेळी वैद्यकिय तपासणी होणे गरजेचे.
८. प्रत्येक क्रिडा प्रशिक्षणाच्या दरम्यान प्रथमोपचाराची व्यवस्था असायलाच हवी.
९. स्पर्धात्मक क्रिडाप्रकरांमध्ये भाग घेणार्‍या बाल क्रिडापटूंना विम्याचे संरक्षण देणे.

क्रिडाप्रशिक्षण
लहान मुलांना क्रिडा प्रशिक्षण देताना त्यातील तोच तो पणा, एकसुरीपणा टाळून ते सतत उत्तेजना देणारे, शरीराचा व मनाचा सर्वांगिण विकास करणारे आहे ना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

क्रिडा प्रशिक्षणाच्या दरम्यान, ताकदीच्या व्यायामांचा अतिरेक खाल्यास त्याच हाडांच्या वाढीच्या केंद्रावर (Epiphysis) सांध्यांवर, स्नायूंवर त्यावरील आवरणांवर गंभीर दुष्परिणाम झाल्याने, शरिराच्या अंतिम वाढीवर वाईट परिणाम होऊ शकतात, जिम्नॅस्टिक, फिगर स्केटींग, विविध बॉलगेम्स मध्ये या गोष्टी अधिक प्रकर्षाने जाणवतात. खेळताना कठीण पृष्ठभागावर वरचेवर पडण्याने, उड्या मारण्याने पाठीच्या कण्यात आसेप्टीक नेक्रोसिस सारखा दोष निर्माण होऊ शकतो.

लहान वयात खेळताना झालेल्या दुखापतींवर शास्त्रोक्त पध्दतीने योग्य ते उपचार न खाल्यास पुढील आयुष्यात मायोसायटीस ऑसिफिकान्स आर्थोटिक डिजनरेशन, या सारखे दुष्परीणाम होऊ शकतात. स्पर्धात्मक क्रिडा प्रशिक्षण घेणारा खेळाडू हा पूर्णपणे, निरोगी असायलाच हवा. शारीरिक व्यंग असणाऱ्यांनी जास्त भर हा करमणुकीच्या खेळांमध्ये भाग घेण्यास देणे, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक हितावह ठरते. लहान मुलांचे शरीर, हे शारीरिक प्रशिक्षणामुळे होणाऱ्या शरीरातील बदलांशी उत्तम प्रकारे जुळवून घेते. शारीरिक प्रशिक्षणातील प्रगतितील मर्यादा, प्रामुख्याने , मेंदूच्या विकसितपणावर, नैसर्गिक बौध्दिक क्षमतेवर अवलंबून असतात. बाल क्रिडापटूस थकवा येणे, भोक लागणे, खेळातील गोडी, उत्साह नाहीसा झाल्याचे आढळून आल्यास क्रिडा प्रशिक्षणचा, अतिरेक होत आहे हे लक्षात घ्यावे.क्रिडाप्रशिक्षण व स्नायूंची ताकद
लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले, मुली, या सर्वांच्या स्नायूंच्या ताकदीमध्ये, योग्य प्रमाणांत दिल्या गेलेल्या वेट ट्रेनिंग मुळे लक्षणीय वाढ खाल्याचे सिध्द झाले . एरोबिक- ऍन- एरोबिक, ट्रेनिग एकत्रितपणे दिल्यास ११ ते १५ वर्षे वयोगटातील खेळाडूंच्या स्नायूंमध्ये क्रिएरिन फॉस्फेट, एटीपी, आणि ग्लायकोजेनच्या प्रमाणात विलक्षण वाढ झाल्याचे सिध्द झाले आहे. तसेच उड्या मारणे, चेंडू फिकणे, २००-४०० मीटर्स धावणे, वल्हवणे , ह्या सारख्या व्यायाम प्रकारांनी स्नायूंमधील ग्लायाकोजनचे विघटन करणार्‍या फॉस्फोफ्कटो कायनेज, या फेनक द्रव्यामध्ये, वाढ झालेली दिसून आले आहे. क्रिडा प्रशिक्षणांमुळे जलद धावण्यामधील सुधारणा, ही, पळण्याच्या स्नायूंनी उपलब्ध उर्जेचा काटकसरीने केलेला वापर रनिंग इकॉनॉमी व शैलीमधील (स्टाईल), परिपूर्णतेमुळे झालेली असते. क्रिडा प्रशिक्षणामुळे, लहान मुलांमध्ये , शारीरिक वाढीबरोबरच, स्नायूंच्या एकत्र सुसूत्रपणे हालचाली करण्याच्या क्षमतेमध्ये व तोल सांभाळण्याच्या कौशल्यामध्ये लक्षणीय प्रगति झाल्याचे सिध्द झाले आहे.

क्रिडा प्रकार व त्यासाठीचे क्रिडाप्रशिक्षण सुरू करण्याचे आदर्श वय

क्रिडा प्रकार वय (वर्षे)
ऍथलेटिक्स
हॉकी
बास्केटबॉल
बॉक्सिंग
कॅनोईंग
सायकलिंग
फुटबॉल
जिम्नॅस्टिक
हॅण्डबॉल
बर्फावरील हॉकी
रोईग
स्काईग
पोहणे
टेबलटेनिस
टेनिस
व्हॉलीबॉल
वॉटरपोलो
वजन उचलणे
कुस्ती
रग्बी
११
१०
१३
१५
११
१४
१०
११
११
१०
१०
११


१०
११
१२
१५
१२
१०


टॅलेन्ट स्पॉटींग - लहान वयातील असामान्य खेळाडूचा शोध
लहान वयात, खेळामधे असामान्य गुणवत्ता असणार्‍या अत्युच्च दर्जाच्या, स्पर्धात्मक क्रिडाप्रकारांमध्ये भाग घेणार्‍या, बाल खेळाडूंना योग्य ती पोषक परिस्थिती, खेळासाठी दर्जेदार प्रशिक्षणाची सोय, उत्तम दर्जाच्या खेळाच्या साधनांची उपलब्धता , उत्तम जीवनपध्दती, डावेधक शास्त्रातील, खेळांमधील, उत्तम तज्ञांचे मायेचा ओलावा असणारे, जिव्हाळ्याचे मार्गदर्शक मिळणे, अतिशय आवश्यक आहे.

असामान्य खेळाडू होण्यासाठी , बालक्रिडापटूमध्ये क्रिडा वेधक शास्त्राच्या दृष्टिकोनातून खालील गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत.

अनुवंशिकता आणि असामान्य गुणवत्ता
बुध्दिमान, उच्च दर्जाच्या खेळाडूंची मुले ही सुध्दा, तशाच दर्जाचे उत्तम खेळाडू होतीलच याला कोणताही शास्त्रीय सिध्द झालेला पुरावा उपलब्ध नाही. पालकांचा प्रभाव हा केवळ, शारिरीक ठेवण, मानसिकता, कार्यक्षमता किंवा खेळास पूरक अशी कौंटुंबिक परिस्थिती इथपर्यंतच मर्यादित असू शकते. ७ वर्षांच्या मुलांवरील, स्नायूंमधील चिकाटी, गतिमानता व ताकदीच्या व्यायामांवरील प्रयोगांद्वारे हे सिध्द झाले आहे कि, १२ मिनिटे धावणे, पुढे वाकणे, या प्रकारांमध्ये, मुलांच्या स्नायूंवर वडिलांचा प्रभाव अधिक असून, मुलींमध्ये, १२ मिनिटे धावणे, ५० मीटर धावणे व पाठीच्या स्नायूंची ताकद, ह्यावर आईचा प्रभाव अधिक असल्याचे आढळून आले आहे.

शास्त्रीय चाचण्यांद्वारे हे सिद्ध झाले आहे, कि हजारात फ़क्त एका मुलामधे आंतरराष्ट्रीय दर्जाचा, दीर्घ पल्ल्याचा धावपट्टू होण्याची क्षमता असते. तर २००० मुलांमधील फ़क्त एकामधे अत्युच्च दर्जची , प्राणवायू शोशन करण्याची क्षमता ( vol max upto 86/min/kg) अनुवंशिकतेने येते. अशा प्रकारे गतिमानता, ताकद, शारीरिक कार्यक्षमता, तोलसांभाळणे, ह्या गोष्टींसाठी देखिल अनुवंशिकता प्रामुख्याने कारणीभूत असते.

असामान्य गुणवत्ता असलेल्या बाल खेळाडूस द्यावयाचा सल्ला
अशा खेळाडूंना, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून, कमीत कमी पदवीधर तरी होणे योग्य ठरते. त्यामुळे दैदीप्यमान खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यावर देखील, त्यास पर्यायी कारकीर्द उपलब्ध होऊ शकते. अशा खेळाडूंचा शालेय जीवनातील वेळ, प्रामुख्याने , क्रिडाप्रशिक्षकाच्या बालक्रिडापटूमध्ये तीव्र मानसिक गुंतवणूक असणार्‍या पालकांच्या सान्निध्यात व त्यांच्या सल्लानुसार वागण्यात जातो. त्यामुळे ही मुले, भावनिकरित्या खुजी राहून, आयुष्यातील साधे साधे निर्णय घेण्यास देखील, असमर्थ बनतात. या बुध्दिमान खेळाडूंना कला, शालेय शिक्षण, संगीत, ह्यासारख्या खेळ सोडून इतर, विविध क्षेत्रांच्या संपर्कात आणून, खेळाच्या पलीकडे देखील, आयुष्यात बर्‍याच काही गोष्टी, तितक्याच महत्वाच्या आहेत, ह्याची जाणीव करून द्यायला हवी.बालक्रिडापटूंच्या प्रयोगशाळेतील व मैदानावरील चाचण्या
बालक्रिडापटूंची कार्यक्षमता ठरवणारा, सर्वात महत्वाचा घटक म्हणजे VO2max ( हवेतील प्राणवायू जास्तीतजास्त प्रमाणात शोषुन घेण्याची क्षमता) त्याचे प्रमाण उत्तम असणे, हे चिकाटीच्या, अधिक वेळ चालणार्‍या क्रिडाप्रकारांसाठी, उपयुक्त असतात हे सिध्द झाले आहे. खेळात पुढे असणार्‍या मुलांची शारीरिक वाढ, ही इतरांपेक्षा अधिक जलद झाल्यामुळे, त्यांच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा, खेळणार्‍या मुलांची कार्यक्षमता सर्वच बाबतीत, अधिक असते. लहान मुलांसाठी खालील ६ चाचण्या अधिक महत्वाच्या आहेत.

वरील चाचण्या ह्या, खेळाडू कुठल्या विशिष्ट क्रिडाप्रकारात, नैसर्गिकरीत्या चमकदार प्रगति करू शकेल ह्याचा अंदाज देऊ शकतात. अशाच प्रकारच्या काही चाचण्या ऑस्ट्रेलियन स्पोर्टस मेडिसीन असोसिएशनने निर्माण केल्या आहेत.

मानसिकतेचा विचार केल्यास तणावपूर्ण परिस्थितीमध्ये मानसिक संतुलन ठेवणे. चटकन निराश न होणे, बदलत्या परिस्थितीमध्ये, तणावाखाली असताना देखील योग्य, अचूक निर्णय घेणे, स्पर्धात्मक क्रिडाप्रकारांमध्ये नेत्रदिपक कामगिरी करण्यास अत्यावश्यक आहे.

एखाद्या क्रिडा प्रकारात अत्युच्च दर्जा गाठण्यासाठी खालील गुणवत्ता असणे अत्यावश्यक आहे.

लहान मुलांच्या जीवनातील खेळाचे स्थान
ज्याप्रकार लहान वयातील खाण्याच्या सवयी, पुढील आयुष्यात देखील चालू राहातात. त्याचप्रमाणे, लहान वयातील शारीरिक हालचालींचे प्रमाण, कार्यक्षमता खेळ खेळणे, हे पुढील आयुष्यातील , शारीरिक क्षमता दर्शवते. लहान मुलांमधील , दैनंदिन जीवनातील उर्त्स्फूत शारीरिक हालचालींचे प्रमाण , खेळ खेळणे, क्रिडा प्रशिक्षण घेणे, हे अनुवंशिकता, खेळास पोषक वातावरण व लहान मुलाच्या निरोगीपणावर अवलंबून असते.

प्राथमिक शालेय जीवनात, केवळ आनंदासाठी, उर्त्स्फूतपणे, खेळ खेळण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. तर माध्यामिक शालेय जीवनात, नियोजितपणे, एकत्रितपणे केलेल्या क्रिडा प्रकारांना उदा. सामुहिक जिम्नॅस्टीक्स, किंवा क्रिडा प्रशिक्षणाला अधिक महत्व देणे आवश्यक आहे. प्रत्येक लहान मुलाने , त्याच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार कुठल्याना कुठल्या खेळात, स्वत:च्या आनंदासाठी भाग घेणे त्याच्या सर्वांगीण शारीरिक व मानसिक वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे. अशा उर्त्स्फूतपणे केलेल्या शारीरिक हालचालींची तीव्रता , ही नियोजित, मार्गदर्शनाखाली केलेल्या हालचालींपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात असल्याचे सिध्द झाले आहे.

लहान मुलांना थोडा वेळ शारीरिक कवायत, थोडा वेळ खेळ व थोडा वेळ विश्रांती, अधिक आवडते. ह्या खेळांचा कालावधी एका वेळेस ५ मिनिटांकडून अधिक नसावा. लहान मुलांमध्ये खर्च झालेली Phosphate ची, उर्जा देणारी द्रव्य, तात्काळ भरून येतात. आणि त्यामुळे हानिकारक अशा lactate चे प्रमाण, शरीरात एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वाढत नाही.

लहान वयात देखील खेळाडूने, पराभवाला सामोरे जाण्यास, अपयश पचवण्यास शिकायला हवे व लवकरात लवकर, त्या निराशाजनक अनुभवातून बाहेर यायला शिकायला हवे साधारणपणे १० वर्षांची मुले ही, आपल्या पालकांना खुश ठेवण्याचा कसोशीने प्रयत्‍न करतात. त्यामुळे अपयश आल्यास त्यांना आपल्या क्रिडाप्रेमी पालकांच्या जिव्हारी लागणार्‍या टिकेस, वेळप्रसंगी शारीरिक मारास देखील सामोरे जावे लागते. व तो ताण त्यांना अतिशय कष्टदायक असतो. १२ ते १५ वर्षाची, पौगंडावस्थेतील मुले , मुली, शारीरिक बदलांच्या अवस्थेतून (body) जात असतात. त्या दरम्यान खेळाद्वारे आपल्या बदलत्या शरीराच्या ताकदीची आव्हाने स्वीकारण्याची चांगली संधि त्यांना मिळते.

शालेय जीवनात, बरीचशी मुले, खेळ आणि स्वत:ची खेळातील कारकीर्द, अतिशय गंभीरपणाने घेत असल्याने, शालेय संघात, जिल्हा पातळीवर, सब ज्युनियर गटात निवड न होणे, ह्यासारख्या गोष्टी त्यांच्या मनाला सतत बोचत राहतात.

बाल खेळाडू आणि आहार
लहान मुलांचा सरफेस एरिआ व सेल्युलर ऍक्टीविती अधिक प्रमाणार असल्याने त्यांचा बेसल मेटॅबोलीक रेट, जास्त असतो. त्यात देखील जर ते मूल, वाढणारे , भरपूर खेळणारे असल्यास, त्यास योग्य पोषणाची, सकस आहाराची अधिक गरज भासते. पोषण योग्य प्रकारे होत आहे की नाही याचे योग्य मूल्यमापन लहान मुलांच्या वजनातील वाढीद्वारे करता येते. उष्णांक वाढवण्यासाठी आहारामध्ये, अधिक उष्णांक पुरवणार्‍या फळे, दूध, भाज्या, पोळी, भात भाकरीचा अधिक प्रमाणात समावेश करणे, अत्यावश्यक आहे. मिठाई तसेच तळलेल्या पदार्थाचा समावेश न करणेच योग्य. लहान मुलांना अधिक प्रमाणात आहार घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी , अन्नपदार्थ, चटकदार, खमंगवास येणारे, आकर्षक रंगाचे करणे, गरजेचे आहे. डबा नेत असल्यास त्यात सकस पोषक अन्नपदार्थांचा समावेश होणे, आवश्यक आहे. रात्रीचे जेवण ही दिवसभरातील उष्णाकांची उणीव भरून काढण्याची योग्य वेळ असते.

लहान मुलांना, योग्य प्रकार, नियमितपणे जेवणाच्या वेळेवर हसत खेळत जेवण्यास शिकवायला हवे. खाण्याच्या वेळा, त्यांच्या प्रशिक्षणनुरूप स्पर्धानुरूप बदलणाऱ्या असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. कुपोषण झाल्यास त्यांच्या शारीरिक वाढीवर दुष्परिणाम होऊन, त्यांच्या अभ्यासातील व खेळातील प्रगतिवर, अहितकारक परिणाम होतात. हे विसरता कामा नये. लहानपणातील कुपोषणामुळे, येणारा, निरूत्साह, कमकुवतपणा , थकवा हे पुढे मोठे झाल्यावर देखील तसेच चालू राहते.

आहारात ५० ते ६० टक्के कार्बोदके २५ ते ३५ टक्के चरबी युक्त पदार्थ, १० ते १५ टक्के प्रथिनांचा , तसेच योग्य प्रमाणात, जीवनसत्वे लोह, कॅल्शियम आणि इतर खनिज पदार्थांसाठी, तृणधान्यांचा अंडी, फळे, हिरव्या पालेभाज्या, गूळ, दूध, दूधाचे पदार्थ, डाळी मोडी आलेली कडधान्ये या अन्न पदार्थांचा समावेश असणे अत्यावश्यक आहे. व्यायाम प्रकार करताना तसेच खेळताना, घामावाटे, जलद श्वसनावाटे, शरीरातील कमी झालेले पाण्याचे प्रमाण, सतत ठराविक वेळाने, पाणी पिऊन योग्य प्रमाणत ठेवणे, आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य आहे की नाही, हे वजन, लघवीचा रंग, लघवीचे प्रमाण, काही प्रमाणात तहान लागण्याची संवेदना, याच्यावर ठरवता येते, १ किलो वजन कमी झाल्यास, ४ कप पाणी पिणे (१ कप २४० मिलीलिटर) आवश्यक आहे. लघवीचा गडद पिवळा रंग, शरीरातील पाणी कमी झाल्याचे दर्शवते.

पाणी पिणे हे, खेळाच्या दरम्यान तसेच नंतर देखील चालू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी, बाजारात उपलब्ध पावडर पाण्यात मिसळून वापरण्यास काही हरकत नाही. क्रिडा प्रकार. किंवा खेळ, अधिक काळ चालणार असल्यास, ठराविक वेळानंतर, साखर घातलेली गोड पेये घेणे, गरजेचे आहे. लहान मुलांना आवश्यक उष्णांकांची पाण्याची, तसेच क्षाराची गरज ही त्या त्या क्रिडाप्रकारच्या तीव्रतेवर, तो किती वेळ चालणार आहे, ह्याचेवर तसेच वातावरणाचे तपमान व आद्रतेवर अवलंबून असते.

बालक्रिडापटूंच्या आहार विषयक, कार्यक्रमांची अंमलबजावणी करताना ह्या सर्व बाबींचा विचार करणे अत्यावश्यक आहे. खेळ एक उपचार पध्दती लहान मुलांमध्ये, खेळ हे, उपचार पध्दती म्हणून विविध प्रकारच्या आजारांमध्ये, उपयुक्त सिध्द झाले आहे.आजार

खेळामुळे झालेले उपयुक्त बदल

 1. वागण्यात मोकळेपणा येणे.
 2. दम्याची तीव्रता व वरचेवर दम्याचा त्रास होण्याचे प्रमाण कमी होणे.
 3. हालचालींमध्ये सुधारणा, वजन आटोक्यात राहणे.
 4. भूक वाढणे.
 5. दम श्वसन मार्गातील श्लष्माचा चांगल्या प्रकारे निचरा होणे
 6. शरीरांतर्गत प्रक्रियामध्ये अधिक संतुलन.
 7. हालचालींमधील सुधारणा.
 8. विश्रांती काळातील रक्तदाबामध्ये सुधारणा.
 9. एकमेकांबरोबर मिसळण्याच्या, प्रवृत्ती मध्ये वाढ.
 10. शारीरिक हालचालीमध्ये सुधारणा.
 11. स्नायूंच्या ताकदीमध्ये वाढ.
 12. वजन आटोक्यात राहाणे.
 13. दिसण्यास सुधारणा झाल्यामुळे वाढलेला आत्मविश्वास.
 14. सांध्यांच्या हालचालीमध्ये सुधारणा.

शारीरिक व्यंगामुळे, बरीचशी आजरी, लहान मुले, निरूत्साही, संथ हालचाली करणारी, त्यांच्या मित्र मैत्रिणीपासून दूर, एकटी एकटी असतात. उदा. स्थूलत्व, पाठीच्या मणक्याचे विकार असणे. खेळांमुळे त्यांना सवंगड्यांबरोबर मिसळण्याची संधि मिळाल्यामुळे, त्यांचा आत्‍मविश्वास वाढतो. आत्मसन्मान वाढतो व ती मुले अधिक बहिर्मुख, आनंदी बनतात.

खेळातील कारकीर्द चालू ठेवायची का नाही ह्याचा पुनर्विचार
बुध्दिमत्ता ही त्या त्या विशिष्ट कलेसाठी त्यानुसार, मेंदूच्या विशिष्ट केंद्राच्या वाढीवरती अवलंबून असते. एवढेच नव्हे जुळ्या लहान मुलांमध्ये देखील ती भिन्न कलांमध्ये पारंगत असल्याचे सिध्द झाले आहे. म्हणूनच आपले मुल जरी खेळात प्राविण्य मिळवण्यात कमी पडत असेल तर, त्याचा पाण उतार न करता, त्याला नाऊमेद न करता, त्याच्यासाठी दुसर्‍या पर्यायी, त्याच्या आवडीच्या व त्यास योग्य अशा कारकिर्दीचा विचार करायला हवा. त्यासाठी कला, संगीत, शिक्षण, कॉम्प्युटर्स, फॅशन डिझायनिंग, व्यापार, सरकारी सेवा, यासारखी अनेक आव्हानात्मक, मनाला आनंद देणारी, भरपूर प्रसिध्दी व पैसा मिळवून देणारी क्षेत्रे, उपलब्ध आहेत, प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यामधील ती चमक ओळखून त्याप्रमाणे त्यास, त्या क्षेत्रात पुढे आणण्यास मदत करून, एक जबाबदार, स्वावलंबी, निर्भिड नागरीक म्हणून, जगात ताठ मानेने जगण्यास प्रोत्साहीत करणे अधिक योग्य ठरेल.

लहान मुले - खेळ - आणि समाज
काही शाळांमधून, खेळाचा शारीरिक शिक्षणाचा तास हा भर दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घेण्यात येतो. कि जे लहान मुलांच्या आरोग्यास, त्रासदायक, धोकादायक असून, त्याचा धिक्कार करून ते ताबडतोब थांबवले गेले पाहीजे.

शहर विकासांच्या योजनांमध्ये (टाऊन प्लॅनिंग ) लहान मुलांना, खेळण्यासाठी मोकळी जागा, कायदेशीररित्या हक्काने उपलब्ध व्हायलाच हवे. तशा जागा, राखून ठेवल्या गेल्याच पाहिजेत. अशा ठिकाणी कोणाही इतर पादचार्‍यांना, वाहनांना, गुरांना, प्रवेश मिळता कामा नये. अशा ठिकाणी खेळांची साधने, मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध व्हायला हवीत. खेळाच्या मैदानांवर, प्रशिक्षणाच्या वेळेस देखील प्रथमोपचाराची सोय उपलब्ध असणे, महत्वाचे आहे.मार्गदर्शक प्रशिक्षक व काही सिनियर खेळाडू, यांना कृत्रिम श्वासोश्वास कसा द्यायचा ह्यांचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. लहान वयातील खेळाडूंना, खेळताना झालेल्या दुखापतींसाठी विम्याचे संरक्षण मिळणे, हे अधिक योग्य व दूरदर्शीपणाचे ठरेल. सरकारच्या अंदाज पत्रकात देखील केवळ लहान मुलांच्या खेळांसाठी, पैशाची तरतूद होणे अत्यावश्यक आहे.

लहान मुलांच्या खेळांची मैदाने व त्यांची सभागृहे, ही केवळ खेळांसाठी व त्या संबंधित कार्यक्रमासाठीच उपयोगात आणली जाणे, आवश्यक आहे. त्यावर अन्य कुठल्याही प्रकारची संमेलने, सर्कशी, फटाक्याचे स्टॉल्स, प्रदर्शने, भरवली जाता कामा नयेत.

आपल्य़ा आवडीचा खेळ, मनसोक्तपणे खेळायला मिळणे, हा प्रत्येक लहान मुलाचा जन्मसिध्द हक्कच आहे. लहान मुलांच्या खेळांस प्रोत्साहन देणार्‍या संस्था, कि ज्या ठिकाणी, लहान मुले, निरंकुश वातावरणात, आनंदाने बागडत, प्रेमळ क्रिडा प्रशिक्षकांच्या बरोबर, आपल्या सवंगड्यांबरोबर आपल्या आवडीचे खेळ खेळतील. ग्रामीण तसेच शहरी भागात, अधिकाधिक प्रमाणात असंख्य मुले, पुडे जाऊन, आपापल्या क्रिडा प्रकारांमध्ये पारंगत होऊन, त्यातून चांगल्यात चांगल्या खेळाडूंची निवड करणे, शक्य होईल. कि जे आपणांस, आंतरराष्ट्रीय, जागतिक, ऑलिंपिक स्पर्धामध्ये अनेक सुवर्णपदके, व विजयी करंडक मिळवून देतील.

-डॉ. प्रविण जोशी