आजार
- ऍनोर क्षिया नर्व्होसा दमा
- सेरेब्रलपाल्सी
- क्रोनिक रिनल फेल्युअर
- सिस्टिक फायब्रोसिस
- मधुमेह
- हिमोफिलिया
- रक्तदाब
- मतिमंदत्व
- मस्कुयलर डिस्ट्रोफी
- स्थूलत्व
- संधिवात
खेळामुळे झालेले उपयुक्त बदल
- वागण्यात मोकळेपणा येणे.
- दम्याची तीव्रता व वरचेवर दम्याचा त्रास होण्याचे प्रमाण कमी होणे.
- हालचालींमध्ये सुधारणा, वजन आटोक्यात राहणे.
- भूक वाढणे.
- दम श्वसन मार्गातील श्लष्माचा चांगल्या प्रकारे निचरा होणे
- शरीरांतर्गत प्रक्रियामध्ये अधिक संतुलन.
- हालचालींमधील सुधारणा.
- विश्रांती काळातील रक्तदाबामध्ये सुधारणा.
- एकमेकांबरोबर मिसळण्याच्या, प्रवृत्ती मध्ये वाढ.
- शारीरिक हालचालीमध्ये सुधारणा.
- स्नायूंच्या ताकदीमध्ये वाढ.
- वजन आटोक्यात राहाणे.
- दिसण्यास सुधारणा झाल्यामुळे वाढलेला आत्मविश्वास.
- सांध्यांच्या हालचालीमध्ये सुधारणा.
शारीरिक व्यंगामुळे, बरीचशी आजरी, लहान मुले, निरूत्साही, संथ हालचाली करणारी, त्यांच्या मित्र मैत्रिणीपासून दूर, एकटी एकटी असतात. उदा. स्थूलत्व, पाठीच्या मणक्याचे विकार असणे. खेळांमुळे त्यांना सवंगड्यांबरोबर मिसळण्याची संधि मिळाल्यामुळे, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आत्मसन्मान वाढतो व ती मुले अधिक बहिर्मुख, आनंदी बनतात.
खेळातील कारकीर्द चालू ठेवायची का नाही ह्याचा पुनर्विचार
बुध्दिमत्ता ही त्या त्या विशिष्ट कलेसाठी त्यानुसार, मेंदूच्या विशिष्ट केंद्राच्या वाढीवरती अवलंबून असते. एवढेच नव्हे जुळ्या लहान मुलांमध्ये देखील ती भिन्न कलांमध्ये पारंगत असल्याचे सिध्द झाले आहे. म्हणूनच आपले मुल जरी खेळात प्राविण्य मिळवण्यात कमी पडत असेल तर, त्याचा पाण उतार न करता, त्याला नाऊमेद न करता, त्याच्यासाठी दुसर्या पर्यायी, त्याच्या आवडीच्या व त्यास योग्य अशा कारकिर्दीचा विचार करायला हवा. त्यासाठी कला, संगीत, शिक्षण, कॉम्प्युटर्स, फॅशन डिझायनिंग, व्यापार, सरकारी सेवा, यासारखी अनेक आव्हानात्मक, मनाला आनंद देणारी, भरपूर प्रसिध्दी व पैसा मिळवून देणारी क्षेत्रे, उपलब्ध आहेत, प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यामधील ती चमक ओळखून त्याप्रमाणे त्यास, त्या क्षेत्रात पुढे आणण्यास मदत करून, एक जबाबदार, स्वावलंबी, निर्भिड नागरीक म्हणून, जगात ताठ मानेने जगण्यास प्रोत्साहीत करणे अधिक योग्य ठरेल.
लहान मुले - खेळ - आणि समाज
काही शाळांमधून, खेळाचा शारीरिक शिक्षणाचा तास हा भर दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घेण्यात येतो. कि जे लहान मुलांच्या आरोग्यास, त्रासदायक, धोकादायक असून, त्याचा धिक्कार करून ते ताबडतोब थांबवले गेले पाहीजे.
शहर विकासांच्या योजनांमध्ये (टाऊन प्लॅनिंग ) लहान मुलांना, खेळण्यासाठी मोकळी जागा, कायदेशीररित्या हक्काने उपलब्ध व्हायलाच हवे. तशा जागा, राखून ठेवल्या गेल्याच पाहिजेत. अशा ठिकाणी कोणाही इतर पादचार्यांना, वाहनांना, गुरांना, प्रवेश मिळता कामा नये. अशा ठिकाणी खेळांची साधने, मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध व्हायला हवीत. खेळाच्या मैदानांवर, प्रशिक्षणाच्या वेळेस देखील प्रथमोपचाराची सोय उपलब्ध असणे, महत्वाचे आहे.मार्गदर्शक प्रशिक्षक व काही सिनियर खेळाडू, यांना कृत्रिम श्वासोश्वास कसा द्यायचा ह्यांचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. लहान वयातील खेळाडूंना, खेळताना झालेल्या दुखापतींसाठी विम्याचे संरक्षण मिळणे, हे अधिक योग्य व दूरदर्शीपणाचे ठरेल. सरकारच्या अंदाज पत्रकात देखील केवळ लहान मुलांच्या खेळांसाठी, पैशाची तरतूद होणे अत्यावश्यक आहे.
लहान मुलांच्या खेळांची मैदाने व त्यांची सभागृहे, ही केवळ खेळांसाठी व त्या संबंधित कार्यक्रमासाठीच उपयोगात आणली जाणे, आवश्यक आहे. त्यावर अन्य कुठल्याही प्रकारची संमेलने, सर्कशी, फटाक्याचे स्टॉल्स, प्रदर्शने, भरवली जाता कामा नयेत.
आपल्य़ा आवडीचा खेळ, मनसोक्तपणे खेळायला मिळणे, हा प्रत्येक लहान मुलाचा जन्मसिध्द हक्कच आहे. लहान मुलांच्या खेळांस प्रोत्साहन देणार्या संस्था, कि ज्या ठिकाणी, लहान मुले, निरंकुश वातावरणात, आनंदाने बागडत, प्रेमळ क्रिडा प्रशिक्षकांच्या बरोबर, आपल्या सवंगड्यांबरोबर आपल्या आवडीचे खेळ खेळतील. ग्रामीण तसेच शहरी भागात, अधिकाधिक प्रमाणात असंख्य मुले, पुडे जाऊन, आपापल्या क्रिडा प्रकारांमध्ये पारंगत होऊन, त्यातून चांगल्यात चांगल्या खेळाडूंची निवड करणे, शक्य होईल. कि जे आपणांस, आंतरराष्ट्रीय, जागतिक, ऑलिंपिक स्पर्धामध्ये अनेक सुवर्णपदके, व विजयी करंडक मिळवून देतील.
-डॉ. प्रविण जोशी