Print
Hits: 15301

जन्मल्यानंतरच्या पहिल्या वर्षात मुलाची वाढ व विकास अधिक गतीने होत असतो. सर्वसाधारपणे मुलाच्या जन्मानंतर त्याचे वजन पहिल्या चार महिन्यात दुपटिने वाढते. तर त्याच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत त्यात तिप्पटिने वाढ होते. अशी आश्‍चर्यजनक वाढ होण्यासाठी पौष्टीक आहाराबरोबरच बाळाला आनंदी वातावरणही मिळाले पाहीजे. त्याच बरोबर वाळ गुटगुटित होण्यासाठी पाणी, जीवनसत्वे, प्रथिने, खनीजे, मेदयुक्त पदार्थ असे जवळपास ४० पौष्टिक घटक त्याला त्याच्या आहारातुन दिले गेले पाहिजेत. गर्भाची पुर्ण वाढ होवून मुलाचा जन्म झालेला असेल तर त्या बालकाच्या शरीरात सुरूवातीला काहीकाळ पुरेल असा पोषक मुल्यांचा विशेषत: पाण्याचा पुरेसा साठा असतो. दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवसापासुन तुमच्या बाळाला पाणी व पोषक मुल्यांची गरज भासत असते.

जन्मापासुन चौथ्या महिन्यापर्यंत

Feeding स्तनपान

‘स्तनपान हाच बाळासाठी सर्वोत्तम आहार होय. परंतू काही आरोग्यविषयक तक्रारी असल्यास किंवा पहिलटकरणींना पुन्हा त्यांच्या कामास सुरूवार करायची असल्याने त्यांना बाळाला पुरेसे स्तनपान करता येत नाही. अशावेळी काही माता बाटलीतील दुधाची मदत घेतात. ज्या बायका मुलांना अंगावर दुध पाजतात. त्यांना दररोज किमान ५०० कि. ग्रॅ. कॅलरीजचे गरज असते. या शिवाय ४०० मि. ग्रॅ. कॅल्शियम व २० ग्रॅम प्रथिने तिला मिळालीच पाहिजेत त्यासाठी तिच्या आहारात दुध, दुधाचे प्रदार्थ, अंडी मांस, व ब्रेड मिळालेच पाहीजेत. तसेच ती जेवढ्या प्रमाणात पाणी पिईल तेवढ्या प्रमाणात तिला जास्त दुध सुटेल.

स्तनपानाचे फायदे
मातेच्या दुधात नवजात बालकासाठी आवश्यक ते सर्व पोषकमुल्य असतात. पहिल्या काही आठवड्यात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा वेळी आईचं दुंध बाळाचे सुक्ष्मजीव जंतु पासुन संरक्षण करते. अंगावर दुध पाजल्याने बाळाला जठरासंबंधी किंवा पोटाचे विकार उद्‌भवत नाहीत.

स्तनपानाचे तोटे
अल्कोहाल, कॅफिन किंवा औषधामधील काही अनावश्यक घटकद्रव्य स्तनपानातुन बाळाच्या शरीरात गेले तर त्याचे काही दुष्परिणाम हो‍उ शकतात. यासाठी स्तनपानाच्या काळात कॅफिन व मद्य यांचे सेवन मातांनी कमी केले पाहीजे व डॉक्टरांच्या सल्यानुसार मोजकी औषधे घेतली पाहीजेत. काहीतरी काम करत असताना बाळाकडे लक्ष देणे शक्य नसल्यास त्यांच्या तोंडातदुधाची बाटली देणे हे तुलनेने सोपे असते. बाटलीचे दुध ही काही मुलांच्या बाबतीतली एक वाईट सवयच बनून जाते. काही मुल तोंडात दुधाची बाटली ठेवूनच झोपतात. तर काहीनां दुधाच्या बाटलीशिवाय झोपच येत नाही. याचा परिणाम म्हणजे मुलांचे दात लवकर किडतात. कारण दुधात नैर्सगिक शर्करा असते. जिचे आवरण दातावर बसून त्याचा परिणाम दात किडण्यावर होतो.

स्तनपानाच्या वेळा
दर तीन तासांनी बाळाला दुधाची गरज भासते. पहिल्या काही आठवड्यात स्तनपानात अनियमितपणा आला तर मुलाला भुक लागते. परंतू जशजशी त्याची वाढ होत जाते. तसतशी त्याची भुकही वाढल्याने स्तनपानात मातेला नियमितपणा आणावा लागतो.

पाणी
छोटी मुले किंवा प्रौढांच्या प्रमाणेच बाळाला दुधा इतकीच पाण्याची गरज असते. पाण्यामुळे शरीरातील अनावश्यक पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकण्यास मदत होते. १८ पौंडाच्या वजनापर्यंत बालकांना त्यांच्या एका पौंड वजनासाठी एक तृतीयांश कप पाणी लागते. वजन जास्त असेल तर पाणी कमी लागते. उदा. १२ पौंड वजनाच्या दिवसाला ४ कप पाणी लागेल. यातील बहुतेक द्रवाची गरज स्तनपानातुन भागवली जाते. परंतू उन्हाळ्यात अशा द्रवाची अधिक गरज भासते.

जीवनसत्व व खनीज द्रवांचा पुरवठा
सर्वसाधारण बालकांसाठी आईच्या तसेच बाजारी पावडरच्या दुधात पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे व खनीजे असतात. जरी मातेच्या किंवा पावडरच्या दुधात ‘क’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी असले तरी ते लहान मुलाची गरज भागवण्याइतके असते. तरीही आईच्या दुधातील जीवनसत्वे व खनीजे मुलाकडून अधिक शोषून घेतली जातात. बाळाची वाढ पुर्ण झालेली असतील तर अशा बालकाच्या शरीरात सहा महिने पुरेल इतका लोहाचा साठा असतो.

पोटशुल
काही मुले स्तनपानानंतर नेहमीच रडतात, काहीजणांना उलटी येते. हा प्रकार पोटशुलामुळे होतो. आईच्या आहारात काही बाधक पदार्थ आल्यास दुधावाटे ते बाळाच्या पोटात जाउन याचा त्रास बाळाला होतो. बरेचदा मुलांना हा त्रास अनावर होतो. अशावेळी गाणी गाउन किंवा त्यांच्याशी बोलून त्यांना शांत केले पाहिजे.

प्रसन्न, प्रेमळ वातावरण
लहान मुलांना स्तनपानाच्या वेळी मातेच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव पटकन कळतात. यावेळी शक्यतो वातावरण आनंदी ठेवावे. कुटुंबाच्या हिताचे निर्णय पालकांनी वेळीच घेणे महत्वाचे असते. मुलाला दुग्धपान करण्यासाठी कोणतीही पध्दत वापरली तरी त्यावेळी आजुबाजुला आनंदी वातावरण हवे. स्तनपान करताना मातेने एखादे गाण गुणगुणावे, थोपटावे किंवा बाळाशी वातावरण खेळते ठेवावे. या प्रेमळ स्पर्शाशिवाय मुलांची योग्य वाढ विकास हो‍उ शकत नाही. घन पदार्थाचा आहार देताना घ्यायची काळजी: घन आहार देताना असे सुचविले जाते की मुल ४ ते ६ महिन्यांचे होई पर्यंत थांबावे. तोपर्यंत मुलाला मान सांभाळता येते व ते ताठ बसु शकते. यामुळे ते चमच्याने भरवलेले पदार्थ नीट ग्रहण करू शकते. ४ ते ६ महिन्यांनंतर मुलांना घन पदार्थातील पोषण मुल्यांची अधिक गरज भासते. या वेळेपर्यंत त्याचे वजन दुप्पटिने वाढलेले असते व त्यांची अन्नाची गरजही वाढलेली असते.

घनपदार्थ कसे द्याल?
घनपदार्थांचा आहार बाळाला हळुहळु द्यावा. सुरूवातीस १ किंवा २ चमचे पुरे एकावेळी एकच नवा पदार्थ त्याला भरवावा. दुसरा पदार्थ भरवण्यापुर्वी काही दिवस पहिला पदार्थ भरवण्याची सवय करावी. त्यामुळे त्याला कोणता पदार्थ बाधतो हे ओळखणे सोपे जाते. भाताच्या पेजेपासुन त्याच्या आहाराची सुरूवात करावी. इतर धान्याच्या तुलनेने भात बाधक असल्याने बरेच आहारतज्ञ बाळाला भात भरवण्याचा आग्रह धरून लोहयुक्त भाताची ते शिफारस करतात. भातातुन लोहाप्रमाणेच कॅलरीज, कार्बोहायड्रेटस्‌, प्रथिने व मेदयुक्त पदार्थ यांचा समतोलपणा राखला जातो. बाळाला प्रथम घनआहार देताना स्पर्शाचेही विशेष महत्व आहे. घनपदार्थ भरताना मुलांना व्यवस्थित धरून ठेवा.

मायक्रोव्हेव व बाळाचे अन्नपदार्थ
बाळाचे अन्नपदार्थ मायक्रोव्हेव गरम करत असताना विशेष दक्षता बाळगली पाहिजे. कारण मायक्रोव्हेव मधे अन्नपदार्थ सारख्याच प्रमाणात गरम होत नाहीत. एखादा भाग अधिक गरम होवू शकतो. मुलाला अन्न भरवताना एखादा चमचा गर्म पदार्थाचा जाउ शकतो. तर पुढचा चमचा थंड पदार्थाचा असु शकतो. प्रत्येक गरम करून देण्याची गरज नाही. ते सामान्य तपमानाचे असले तरी चालते. त्यातुनही गरम करावा. पदार्थ द्यावयाचे असतील तर तो चांगला ढवळुन गरम करावा म्हणजे तो सर्व बाजूंनी सारखा गरम होतो. तरीही तो पदार्थ भरवण्यापुर्वी त्यांची खात्री करून घेवून मगच भरवावा.भाज्या आणि फळे
भाज्या आणि फळे यांचा समावेश बाळाच्या आहारात सातव्या महीन्यानंतर करावा. यातुन बाळाला अ, ब, क जीवनसत्वे मिळतात. जर तुमचे बाळ काही वस्तु चावत असेल तर त्याला घट्‍ट पदार्थ किंवा फळ देवून त्याच्या चावून खाण्याच्या कौशाल्याला वाढवा. बाळ ८-९ महिन्यांचे झाल्यानंतर त्याला बटाटा, केळ, बिट देण्यास काहीच हरकत नाही. याकाळात त्याला दातही येउ लागतात. तेव्हा अशा पदार्थातुन तो आपली चावण्याची क्रिया पुर्ण करू शकतो.

वाढत्या मुलांसाठी
इतर पदार्थ देण्यास सुरूवात केली तरी सहाव्या महिन्यापर्यंत आईचे किंवा पावडरचे दुध हेच मुलांचे मुख्य अन्न असते. दहाव्या-बाराव्या महिन्यात त्यांच्या आहारात अंड्यातील पिवळ्या बलकाचा समावेश करावा. मुल एक वर्षाचे होईपर्यंत त्याला पुर्ण अंड देवू नये. कारण एक वर्षाआधी अंड्यातील पांढरा भाग मुलाच्या खाण्यात आल्यास तो त्यांना बाधू शकतो. मुल एक वर्षाचे झाल्यानंतर त्याला थोड्या प्रमाणात चीज देण्यास हरकत नाही.

आहाराचे वेळापत्रक
साधारण १०-१२ व्या महिन्यापर्यंत मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीचे वेळापत्रक बसुन जाते. मोठ्या व्यक्तीप्रमाणे लहान मुलांनाही दोनवेळच्या नियमित खाण्याबरोबर आणखी दोनवेळचे खाणे लागते.

कपातुन पाणी पिणे
मुल साधारण १० महिन्यांचे झाल्यानंतर मोठ्या माणसाने त्यांच्या तोंडाशी पाण्याचा कप धरला असता तो त्यातुन पाणी, दुध पिउ शकतो. तेव्हा बाटली ऐवजी त्याला कपातुनच पाणी, दुध व रस पाजावा. सुरूवातीला हे प्रमाण थोडे ठेवावे. ते हळुहळु वाढवत न्यावे. याच वेळेत काही मुलांची स्तनपानाची अथवा बाटलीतुन दुध पिण्याची सवय तुटते. बहुतेक मुलांना आणखी काही महिने बाटलीची गरज भासते.

अंगावर पाजणे.
साधारण १ वर्षानंतर मुले अंगावर दुध पिणे सोडतात. ही सवय एक वर्षानंतर कायम असेल तर कपातुन दुध किंवा पाणी पाजुन त्यांची ही सवय मोडता येते. जी मुले घनपदार्थ पेक्षा दुध अधिक घेतात, त्यांच्या पोषणाच्या गरजा नीट भागल्या जात नाहीत. यासाठी पहिल्या वर्षापासुन बाळाला विविध प्रकारचे अन्नपदार्थ दिले पाहिजेत दिवसातुन फक्त २ कप दुध त्याला द्यावे.

कोणत्या गोष्टींचे निरीक्षण कराल?
कच्चे अंडे किंवा कच्चे दुध हे लहान मुलांसाठी योग्य नाही. या अन्नातुन संसर्गदोष होऊ शकतो. जो त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मुलांना शक्यतो चॉकलेट, आइस्क्रीम सारखे गोड पदार्थ, चहा कॉफी देउ नये. त्यातुन कॅलरीज मिळत असल्या तरी पोषणमुल्य फार कमी असतात.

जगण्यास उपयुक्त अन्न
पुढिल आयुष्याच्या दृष्टीने चांगली वाढ व विकास व्हायचा असेल तर लहाणपणीच योग्य पौष्टिक आहार घेतला पाहिजे. योग्य वाढ ही कॅलरीज, प्रथिने, जीवनसत्वे यांच्या पुरवठ्यावर अवलंबून असते. जेवण्याच्यावेळी मन नेहमी प्रसन्न ठेवावे. आई-वडिल मुलांना यासाठी मदत करू शकतात. खाण्याच्या चांगल्या सवयी लावताना कोणता पदार्थ पोषणमुल्य आहे हे पालकांनी पटवून दिल्यास मुलांचा आहार चांगला रहाण्यास मदत होते. पालकांनी आपल्या मुलांना आरोग्यदायी व पौष्टिक आहार योग्य वेळी व योग्य प्रमाणात दिला पाहिजे.

आरोग्यदायी जगणे आत्मसात करताना
चांगले आरोग्य हे चांगल्या सवयी व योग्य आवडीनिवडी यातुन निर्माण होत असते. चांगले आरोग्य आता व भविष्यात उपभोगायला मिळावे म्हणून वाढत्या वयाच्या तरूणांनी, मुलांनी व्यायाम कसा करावा. ताणताणावर नियंत्रण कसे करावे. व्यक्तिगत स्वच्छता कशी राखावी व रोग होण्याचा धोका कसा टाळावा हे लहान वयातच शिकले पाहिजे. त्यांनी पौष्टिक आहार घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे आणि शारीरिक व मानसिक आरोग्याच्या क्रिया प्रतिक्रिया त्यांना समजल्या पाहिजेत. संकटसमयी काय करावे आणि काय नाही, केव्हा म्हणावे हे मुलांना समजले पाहिजे. जर मुलांचे आरोग्य चांगले असेल तर ते शाळेत चांगली प्रगती करू शकतात.

मुलांना काय शिकवाल

चांगल्या सवयी
दात घासणे - २ ते ५ वर्षाच्या मुलांसाठी
जेव्हा मुलांना दात घासायला शिकवायचे असतात. तेव्हा गमतीशीर बडबडगीते म्हणुन ते शिकवावे.

उदा. ‘दात घासा रे दात घासा,
भल्या पहाटे दात घासा,
शुभ्र सकाळी दात घासा,
रोखण्या दुर्गंधीयुक्त श्वासा,
दात घासा, दात घासा,
दात घासा आणि हसा,’

मुलांना दात घासायला शिकवताना खुळखुळ असे आवाज करा त्यांच्या दातांना एकेक नाव द्या. आणि ते घासताना ती नावे घेत रहा.

एकमेकांचे काय वापराल काय नाही.
ज्या वस्तुंच्या वापरण्यातुन जंतु अथवा रोगाचा प्रसार होऊ शकतो. अशा व्यक्तीगत वस्तु एकमेकांनी वापरू नयेत हे तुमच्या मुलांना शिकवा जसे कि,
ब्रश, कप, फणी, चमच्या
एका कागदावर तुमच्या मुलाला यासंबंधी विविध चित्रे चिटकवायला सांगा.
या चित्रावर रंगीबेरंगी पेन्सिलिने मी एकमेकांच्या वस्तु वापरणार नाही असे शिर्षक देण्यास सांगा.
ज्या वस्तु एकमेकांच्या वापरल्या तरी मी या वस्तु शकतो असे शिर्षक देउन मुलांना ते रंगीबेरंगी पेन्सिलने रंगवण्यास सांगा.

मुलांनी नेहमी पौष्टिक आहार घेणे महत्वाचे आहे, काही आरोग्याचे अन्नपदार्थ

दुधजन्य पदार्थ:
भाजीपाला:
मांसाहारी पदार्थ:
फळे:
ब्रेड:
चीज, लोणी. आईस्क्रिम, दही, मलई
घेवडा, गाजर, प्लॉवर, सॅलड, स्पिनिच पालेभाजी
चिकन, डुकराचे मास, गोमास
सफरचंद, संत्री, पपई, आंबा, केळी
रोल्स, कुरकुरीत बिस्किट, पॅटिस


प्रत्येक दिवशी तुमच्या मुलांच्या आहारात वरील विभागातील किमान एखादा पदार्थ तरी आला पाहिजे ज्यातुन त्याला चौरस आहार मिळु शकेल.

पालकत्व तुम्हाला कोणी असे सांगितले नाही का, की एक काळ असा येईल की अकाली वृध्दत्व आल्यासारखे वाटेल, भरदिवसा मरगळ्ल्यासारखे होईल आणि या वास्तवाच्या सरळ विचाराने नैराश्य येईल.