भाज्या आणि फळे
भाज्या आणि फळे यांचा समावेश बाळाच्या आहारात सातव्या महीन्यानंतर करावा. यातुन बाळाला अ, ब, क जीवनसत्वे मिळतात. जर तुमचे बाळ काही वस्तु चावत असेल तर त्याला घट्ट पदार्थ किंवा फळ देवून त्याच्या चावून खाण्याच्या कौशाल्याला वाढवा. बाळ ८-९ महिन्यांचे झाल्यानंतर त्याला बटाटा, केळ, बिट देण्यास काहीच हरकत नाही. याकाळात त्याला दातही येउ लागतात. तेव्हा अशा पदार्थातुन तो आपली चावण्याची क्रिया पुर्ण करू शकतो.
वाढत्या मुलांसाठी
इतर पदार्थ देण्यास सुरूवात केली तरी सहाव्या महिन्यापर्यंत आईचे किंवा पावडरचे दुध हेच मुलांचे मुख्य अन्न असते. दहाव्या-बाराव्या महिन्यात त्यांच्या आहारात अंड्यातील पिवळ्या बलकाचा समावेश करावा. मुल एक वर्षाचे होईपर्यंत त्याला पुर्ण अंड देवू नये. कारण एक वर्षाआधी अंड्यातील पांढरा भाग मुलाच्या खाण्यात आल्यास तो त्यांना बाधू शकतो. मुल एक वर्षाचे झाल्यानंतर त्याला थोड्या प्रमाणात चीज देण्यास हरकत नाही.
आहाराचे वेळापत्रक
साधारण १०-१२ व्या महिन्यापर्यंत मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीचे वेळापत्रक बसुन जाते. मोठ्या व्यक्तीप्रमाणे लहान मुलांनाही दोनवेळच्या नियमित खाण्याबरोबर आणखी दोनवेळचे खाणे लागते.
कपातुन पाणी पिणे
मुल साधारण १० महिन्यांचे झाल्यानंतर मोठ्या माणसाने त्यांच्या तोंडाशी पाण्याचा कप धरला असता तो त्यातुन पाणी, दुध पिउ शकतो. तेव्हा बाटली ऐवजी त्याला कपातुनच पाणी, दुध व रस पाजावा. सुरूवातीला हे प्रमाण थोडे ठेवावे. ते हळुहळु वाढवत न्यावे. याच वेळेत काही मुलांची स्तनपानाची अथवा बाटलीतुन दुध पिण्याची सवय तुटते. बहुतेक मुलांना आणखी काही महिने बाटलीची गरज भासते.
अंगावर पाजणे.
साधारण १ वर्षानंतर मुले अंगावर दुध पिणे सोडतात. ही सवय एक वर्षानंतर कायम असेल तर कपातुन दुध किंवा पाणी पाजुन त्यांची ही सवय मोडता येते. जी मुले घनपदार्थ पेक्षा दुध अधिक घेतात, त्यांच्या पोषणाच्या गरजा नीट भागल्या जात नाहीत. यासाठी पहिल्या वर्षापासुन बाळाला विविध प्रकारचे अन्नपदार्थ दिले पाहिजेत दिवसातुन फक्त २ कप दुध त्याला द्यावे.
कोणत्या गोष्टींचे निरीक्षण कराल?
कच्चे अंडे किंवा कच्चे दुध हे लहान मुलांसाठी योग्य नाही. या अन्नातुन संसर्गदोष होऊ शकतो. जो त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मुलांना शक्यतो चॉकलेट, आइस्क्रीम सारखे गोड पदार्थ, चहा कॉफी देउ नये. त्यातुन कॅलरीज मिळत असल्या तरी पोषणमुल्य फार कमी असतात.
जगण्यास उपयुक्त अन्न
पुढिल आयुष्याच्या दृष्टीने चांगली वाढ व विकास व्हायचा असेल तर लहाणपणीच योग्य पौष्टिक आहार घेतला पाहिजे. योग्य वाढ ही कॅलरीज, प्रथिने, जीवनसत्वे यांच्या पुरवठ्यावर अवलंबून असते. जेवण्याच्यावेळी मन नेहमी प्रसन्न ठेवावे. आई-वडिल मुलांना यासाठी मदत करू शकतात. खाण्याच्या चांगल्या सवयी लावताना कोणता पदार्थ पोषणमुल्य आहे हे पालकांनी पटवून दिल्यास मुलांचा आहार चांगला रहाण्यास मदत होते. पालकांनी आपल्या मुलांना आरोग्यदायी व पौष्टिक आहार योग्य वेळी व योग्य प्रमाणात दिला पाहिजे.
आरोग्यदायी जगणे आत्मसात करताना
चांगले आरोग्य हे चांगल्या सवयी व योग्य आवडीनिवडी यातुन निर्माण होत असते. चांगले आरोग्य आता व भविष्यात उपभोगायला मिळावे म्हणून वाढत्या वयाच्या तरूणांनी, मुलांनी व्यायाम कसा करावा. ताणताणावर नियंत्रण कसे करावे. व्यक्तिगत स्वच्छता कशी राखावी व रोग होण्याचा धोका कसा टाळावा हे लहान वयातच शिकले पाहिजे. त्यांनी पौष्टिक आहार घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे आणि शारीरिक व मानसिक आरोग्याच्या क्रिया प्रतिक्रिया त्यांना समजल्या पाहिजेत. संकटसमयी काय करावे आणि काय नाही, केव्हा म्हणावे हे मुलांना समजले पाहिजे. जर मुलांचे आरोग्य चांगले असेल तर ते शाळेत चांगली प्रगती करू शकतात.
मुलांना काय शिकवाल
- जेवणाआधी शर्करायुक्त पदार्थ खाणे टाळावे. नेहमी पौष्टिक आहार घ्यावा.
- तुमच्या मुलाच्या न्याहरीची सुरूवात - शाळेत किंवा घरात- आरोग्यदायी पदार्थाने होते काय याकडे लक्ष द्यावे.
- जेवणाच्या आधी हात स्वच्छ ठेवून जंतुचा प्रसार कसा रोखावा. हे मुलांना शिकवावे.
- योग्य वयात रोगप्रतिकारक लस मुलांना दिली आहे ना याची खात्री बाळगा.
- कोणत्या रोगप्रतिकारक लस मुलांना देउन झाल्या आहेत, त्यांचे एक कोष्टक तयार करा. वेळोवेळी त्याकडे लक्ष द्या.
- मुलांना जॉगिंग, चालणे, दोरी वरच्या उड्या, पोहणे, सायकल चालविणे, किंवा स्केटिंग करण्यात प्रोत्साहित करा.
- व्यायामातुन ताण कसा कमी करावा, पुरेशी झोप कशी मिळवावी, मनातील समस्यांची चर्चा कशी करायची आणि कामाचे लहान लहान भाग कसे पाडायचे हे मुलांना शिकवा.
- स्वतःच्या संरंक्षणासाठी नाही केव्हा म्हणावे मारामारी पासुन दुर कसे रहावे व बोलण्यातुन आपण अडचणीत येणार नाही ना याची शिकवण पालकांनी मुलांना द्यावी.
चांगल्या सवयी
दात घासणे - २ ते ५ वर्षाच्या मुलांसाठी
जेव्हा मुलांना दात घासायला शिकवायचे असतात. तेव्हा गमतीशीर बडबडगीते म्हणुन ते शिकवावे.
उदा. ‘दात घासा रे दात घासा,
भल्या पहाटे दात घासा,
शुभ्र सकाळी दात घासा,
रोखण्या दुर्गंधीयुक्त श्वासा,
दात घासा, दात घासा,
दात घासा आणि हसा,’
मुलांना दात घासायला शिकवताना खुळखुळ असे आवाज करा त्यांच्या दातांना एकेक नाव द्या. आणि ते घासताना ती नावे घेत रहा.
एकमेकांचे काय वापराल काय नाही.
ज्या वस्तुंच्या वापरण्यातुन जंतु अथवा रोगाचा प्रसार होऊ शकतो. अशा व्यक्तीगत वस्तु एकमेकांनी वापरू नयेत हे तुमच्या मुलांना शिकवा जसे कि,
ब्रश, कप, फणी, चमच्या
एका कागदावर तुमच्या मुलाला यासंबंधी विविध चित्रे चिटकवायला सांगा.
या चित्रावर रंगीबेरंगी पेन्सिलिने मी एकमेकांच्या वस्तु वापरणार नाही असे शिर्षक देण्यास सांगा.
ज्या वस्तु एकमेकांच्या वापरल्या तरी मी या वस्तु शकतो असे शिर्षक देउन मुलांना ते रंगीबेरंगी पेन्सिलने रंगवण्यास सांगा.
मुलांनी नेहमी पौष्टिक आहार घेणे महत्वाचे आहे, काही आरोग्याचे अन्नपदार्थ
दुधजन्य पदार्थ: भाजीपाला: मांसाहारी पदार्थ: फळे: ब्रेड: |
चीज, लोणी. आईस्क्रिम, दही, मलई घेवडा, गाजर, प्लॉवर, सॅलड, स्पिनिच पालेभाजी चिकन, डुकराचे मास, गोमास सफरचंद, संत्री, पपई, आंबा, केळी रोल्स, कुरकुरीत बिस्किट, पॅटिस |
प्रत्येक दिवशी तुमच्या मुलांच्या आहारात वरील विभागातील किमान एखादा पदार्थ तरी आला पाहिजे ज्यातुन त्याला चौरस आहार मिळु शकेल.
पालकत्व तुम्हाला कोणी असे सांगितले नाही का, की एक काळ असा येईल की अकाली वृध्दत्व आल्यासारखे वाटेल, भरदिवसा मरगळ्ल्यासारखे होईल आणि या वास्तवाच्या सरळ विचाराने नैराश्य येईल.