Print
Hits: 14588

अपुऱ्या दिवसांची मुलं आणि अपुऱ्या वाढीची मुलं:
कधी कधी मुलाला डॉक्टरांकडे आणंल जातं तेच मुळी ‘वर्गात इतर मुलांच्या मानानं खूप लहान वाटतो या तक्रारीसाठी आणिएर्द मग डॉक्टर पहिला प्रश्न विचारतात.

तो म्हणजे, याचं जन्मत: वजन किती होतं आणि दिवस पूर्ण भरले होते का? आता सहाजिकच पालकांच्या मनात प्रश्न येतो, जन्माच्या वेळच्या वजनाचा आताच्या वाढीशी काय संबंध? तर मुलाच्या वजनाची वाढ त्याच्या गर्भावस्थेतल्या वजनावर आणि वाढीवर फारच अवलंबून असते.

आपलं बाळ छान बाळसेदार, वजनदार, गुटगुटीत असावं असं कोणत्या आईला वाटणार नाही? पण सगळीच बाळं छान बाळसेदार जन्माला येतातच असं नाही. मूल जन्माला येतांना त्याचं वजन हे त्याची पोटात असतांनाची वाढ दर्शवतं. ही वाढ त्याच्या आई वडिलांच्या तब्येतीवर, त्यांच्या चणीवर, आईच्या शारीरिक, मानसिक स्थितीवर, वारेच्या गुणधर्मांवर आणि मुलाच्या दिवस भरण्यावर अवलंबून असते. या सगळ्या परिस्थितीवर बाळाचं बजन अवलंबून असतं.

अपुऱ्या दिवसांची मुलं
पूर्वी अशी कमी वजनाची कितीतरी मुलं दगावर असत. नव्हे, पूर्वी १० ते १५ मुलं होत असत. आणि त्यातली २ ते ५ जगत असत. हा एक सर्वसामान्य रिवाजच होता. त्यात फारसं वावगं वाटतही नसे. कच्चं फळ झाडावरून काढलं, तर ते पिकणार नाही, हाती लागणार नाही असा जणू त्यावरचा युक्तिवाद (थोडयाफार प्रमाणात खराही) असे. पण आता ती स्थिती राहिली नाही. वैद्यक शास्त्रातल्या संशोधनानं, अभ्यासानं आपल्याला अशा नैसर्गिक आपत्तींवर थोडी तरी मात करायला शिकवलंय. त्यामुळं आपण अशा प्रकारे लवकर जन्माला आलेल्या मुलांना जगवू शकतो. वारंवार अपुर्‍या दिवसांच्या प्रसूतिंनी आणि मुलांच्या दगावण्यानं दु:खे झालेल्या स्त्रिया मागच्या पिढीतल्या लोकांना माहीत आहेत. या कारणांन त्यांना अपत्यहीनही रहावं लागलं होतं. पण आता बर्‍याच अंशी त्यात प्रगती होत आहे. आता आपण अशा मुलांच्या जगण्याबद्दल पुष्कळशी खात्री देऊ शकतो. त्यांच्या पालकांच्या आयुष्यात फुललेला आनंदही पाहू शकतो.

सर्वसामान्यपणे गरोदरपणाचा काळ २८० दिवस मानला गेलाय. पाळी चुकण्याआधी २८ ते ३० दिवस आणि पुढे २५० ‘अ किंवा-’ १० दिवस असा गर्भ धारणा आणि वाढीचा काळ असतो. यातले पहिले १०० दिवस गर्भाच्या रूजण्याचे व त्याच्या सर्व अवयव आणि संस्थांच्या निर्मितीचे असतात. नंतरचे ९० दिवस हे गर्भाची शारीरिक वाढ आणि या सर्व शरीर यंत्रणेची आणि या विशिष्ट संस्थांच्या कार्यक्षमतेची वाढ होण्याचे असतात. म्हणजे नीट विचार करून पाहू गेल्यास शेवटचे ३ महिनेच खरे ‘वाढीचे’ धरावेत. जितके दिवस कमी भरतील तितकी बाळाची वाढ कमी भरते. त्याच्या सगळ्या अवयव संस्थांवर अकाली म्हणजे फार लवकरच संपूर्णपणे स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची मोठीच जबाबदारी पडते. अर्थातच हा फार मोठा ताण असतो.

निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याच्या पोषणाची संपूर्ण व्यवस्था वारेमार्फत, आईकडून होत असतांनाच काही कारणांनी लवकर जन्माला आल्यामुळे या सर्व गोष्टी उदा. श्वसन क्रिया, हृदय रक्ताभिसरण क्रिया, पचन क्रिया, उत्सर्जन शेवटच्या काही दिवसातच वजनाची वाढ झपाटयानं होत असते. तीही न झाल्यानं सांगितल्याप्रमाणे सर्वच गोष्टींची पूर्ण जबाबदारी असा दुहेरी ताण या बाळांना त्याच्या इतक्या सहजतेनं आणि अचूकपणानं करणं. खूपच अवघड असतं. अशा मुलांना जगवणं हे पालक, डॉक्टर, नर्सेस यांना एक प्रकारचं मोठं आव्हानच असतं. काही महत्वाच्या गोष्टींकडे काळजीपूर्वक आणि नेटानं लक्ष पुरवलं तर या मुलांनाही जगण्याचा त्यांचा हक्क परत मिळवून देता येतो.अपुऱ्या वाढीची मुलं
अपुऱ्या दिवसांमुळे वजनवाढ न झालेल्या मुलांचा एक गट आहे तर गर्भावस्थेत असतानाच काही कारणांमुळे वाढच नीट न झाल्यामुळे पूर्ण दिवस भरूनही जन्माच्या वेळी कमी वजन असणाऱ्या मुलांचा एक गट आहे. अशा दुसऱ्या प्रकारच्या मुलांची संख्या आपल्याकडं जास्त प्रमाणात दिसून येते. यालाच गर्भावस्थेतच वाढ खुंटणं असं समजलं जातं. यांना आपण अपुऱ्या वाढीची मुलं म्हणू या. या दोन प्रकारच्या मुलांमध्ये फार फरक असतो. जन्माला आल्यानंतर त्यांना येणाऱ्या समस्यांमध्ये आणि धोक्यामधे फरक असतो. नंतरच्या वाढीतही फरक असतो. २ कि. वजनाचं अपुऱ्या दिवसांचं मुल आणि २ कि. वजनाचं पूर्ण दिवस भरलेलं मूल यांच्या तब्येतीत, जडण- घडणीत, पुढील वाढीत खूप फरक पडतो.

या मुलांची अशी वाढ खुंटण्याची कारणं तीन प्रकारची असू शकतात.
१. आईच्या तब्येतीतले गुणधर्म, आईवडिलांची वजन उंची, चण, आईचे शारीरिक आजार, आहार, कुपोषणि.
२. वारेतील दोष, अकाली वार निकामी होणं, वारेची वाढ कमी असणं इ. वारेची स्वत:च्या वाढीकडं पोषण द्रव्य वापरणं आणि बाळाकडे ती पोचू देणं याच्या क्षमतेवर बाळाची वाढ अवलंबून असते.
३. बाळाच्या शारीरिक जडणघडणीचा प्रकार : यावर त्याच्या वाढीचा वेग आणि मर्यादा ठरत असतात.

यातल्या एक किंवा अनेक कारणांमुळं बाळाची वाढ खुंटते आणि ९ महिने भरूनही कमी वजनाचं मूल जन्माला येतं/ द्र यातही आईच्या किंवा वारेच्या दोषांमुळं बाळाचं पोषण गर्भावस्थेत कमी झालं असेल तर जन्माला आल्यानंतर योग्य पोषण मुळताच ही मुलं झपाट्यानं वाढून इतर मुलांप्रमाणे आणि आपापल्या आईवडलांच्या चणीप्रमाणे वाढतात. पण मुळात स्वत:च्याच शरीरातल्या दोषांमुळं बाळाच्या वजनाची वाढ झाली नसेल तर मात्र नंतर चागलं पोषण मिळालं तरी हळूहळूच वाढत रहातात, आणि छोट्याच चणीचे मोठे होतात.

त्या त्या आईच्या, त्या गरोदरपणात, त्या परिस्थितीत जन्माला येणाऱ्या बाळाच्या वजनासंबंधी अंदाज करता येतो. असा अंदाज करून ठरवलेलं वजन आणि प्रत्यक्षात जन्माला आलेल्या बाळाचं वजन यांची तुलना केली तर या बाळाचं वजन योग्य की कमी की जास्त असा शेरा देता येतो.

जन्माला येणाऱ्या बाळाचं फक्त ‘वजन’ हा त्याच्या सुद्दढतेचा निकष होऊ शकत नाही. कधी कधी छोटयाशा अशक्त आईला वजनदार बाळ होतं तर कधी कधी धिप्पाड बांध्याच्या वजनदार आईला किरकोळ वजनाचं बाळ होतं, दोन्हीही आपापल्या आईसाठी अयोग्यच. या बाळांना सुदृढ कसं म्हणायचं? दोन्ही टोकाच्या गोष्टी अयोग्यच. या बाळांना सुदृढ कसं म्हणायचं? दोन्ही टोकाच्या गोष्टी अयोग्यच. या प्रकारच्या अभ्यासानं बाळ वजनानं योग्य दिसलं तरी ते खरंच सुयोग्य आहे कां, हे ठरवता येतं आणि त्याच्या आगामी पहिल्या आठवड्यातल्या धोक्याबद्दल आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडल्यानंतर त्यांच्या शारीरिक वाढीबद्दल निष्कर्ष्‌ काढता येतात.

अशा या वजनामुळं आणि आपल्या वयामुळं (कमी दिवस भरणं) वेगवेगळ्या ठरलेल्या बाळासांठी वेगळी काळजी घ्यावी लागते, ती काय आणि कशी ते आता पाहू:

बाळाचं तापमान:
अपुऱ्या दिवसांच्या कमी वजनाच्या बाळांना त्यांच्या जगण्याच्या मुलभूत क्रिया देखील स्वतंत्रपणे करायला जमत नाही. कधी कधी श्वास जलद होऊन धाप लागते, तर कधी कधी श्वास चालू ठेवणं अशक्य झाल्यानं, थकून श्वास बंद पडतो. कधी हृदयाचे काम नीट चालत नाही. त्यामुळं रक्ताभिसरण योग्य होऊ शकत नाही. कधी कधी ही मुलं काळी निळी पडतात. स्वत:च्या शरीराचं तापमान योग्य राखणंही यांना जमत नाही. सर्वसाधारणपणे मुलाला ताप आहे का, ह्याची काळजी केली जाते, पण या मुलांच्या बाबतीत उलटं आहे. ही मुलं चटकन्‌ गार पडतात. म्हणून ही मुलं गार पडत नाही ना, हे पहावं लागतं.

अगदी उन्हाळ्यातही यांना खूप कपड्यात गुंडाळून ठेऊन उबदार राखावं लागतं. अशा वेळी गुंडाळून ठेवलेल्या बाळाच्या श्वासाच्या हालचाली, शरीराच्या हालचाली, रंग इ. गोष्टींवर कसं लक्ष ठेवता येणार? यासाठी या मुलांना एका पारदर्शक गरम पेटीत ठेवलं जातं आणि मग त्यांना त्यात न गुंडाळता उघडं ठेवलं तरी चालतं. अशा मुलाच्या सर्व हालचाली, श्वास, रडणं, अंगाचा रंग, दचकणं, डोळे उघडणं, निजणं इ. गोष्टींवर वेळोवेळी लक्ष ठेवता येतं. त्यातच ठेवून त्यांची देखभाल केली जाते.

मूल जसजसं वयानं (दिवसानं) मोठं होत जातं तसतसं त्याला बाहेर हवेत थोडया उबदार कपडयात आपलं तापमान राखता येऊ लागतं. तोपर्यंत त्यांच्या इतर अवयव संस्थाही विकसित होतात. आपल्या दैनंदिन जगण्याच्या गरज भागवून शकतात आणि मग त्यांना पेटीच्या बाहेर काढलं जातं. मग कपडयात गुंडाळून किंवा एखादी गरम शेगडी वापरून हवेचं तापमान वाढवून बाळाला पेटीबाहेर आईजवळ देण्यात येतं.

जिथं अशा इन्क्यूबेटर्स सारख्या पेटया मिळू शकत नाहीत अशा ठिकाणी आई आणि बाळ दोघांनाही एकत्र एका वेगळ्या उबदार खोलीत इतर सर्वांपासून वेगळं ठेवतात. संपूर्ण खोलीच उबदार (इतरांना उकडेल, घाम येईल इतकी गरम) ठेवून हे काम करता येतं.

बाळाचं पिणं:
या मुलांच्या पचन संस्थेची वाढ झालेली नसल्यानं आणि दूध स्वत: ओढून पिण्याची, गिळण्याची ताकद नसल्यानं यांच्या आहाराची गरज भागवणं अवघड होतं.

खरं तर त्यांच्या वाढीचा वेग खूप असतो. तशीच त्यांची आहाराची गरजही मोठी असते. ती सगळी कृत्रिम रीतीनं पुरवणं हे फार अवघड असतं. तोवर त्यांना आईचं दूध किंवा पचेल तसं वरचं दूध किंवा नुसत्या सलाईन आणि इतर विशेष आहार घटकांवर वाढवावे लागतं.

जी मुलं अशक्त असल्याने स्वत: दूध ओढून पिऊ शकत नाहीत, त्यांना शक्यतो त्यांच्या आईचं दूध पिळून काढून, तोंडानं, सिरींज किंवा नाकातल्या नळीनं पाजलं जातं. हे काम फार सावकाश, बेताबेतानं, बाळाच्या कलाकलानं करावं लागतं. या कामासाठी फार वेळ घालवावा लागतो. १० सी. सी. दूध पाजायला २० ते ३० मिनीटं वेळ घालवावा लागतो. अतिशय काळजीपूर्वक सगळं हाताळायला लागतं. या काळात बाळ पेटीबाहेर काढलं तरी गरम दिव्याच्या जवळ किंवा उबदार खोलीतच त्याला उब राहील अशा रीतीनं पाजण्याचं काम करवं लागतं. नाहीतर ते गार पडतं.

एकदा दूध पचू लागलं की वजन वाढू लागतं. त्याच्या अन्नाच्या गरजा वाढू लागतात. अंगात शक्ती आल्यामुळं बाळ आईच्या अंगावर चोखू शकतं आणि स्वत: बाळ जोरानं चोखू लागल्यामुळं आईचं दूध आणखी वाढून येऊ लागतं. अशा तऱ्हेने हळूहळू दोघांची चांगली जोडी जमून दूध पिणं-पचणं -वजन वाढणं चोखणं दूध वाढणं अशा सगळ्या गोष्टींची साखळी जमून मोठे प्रश्न सुटतात. सुरूवातीला पहिले काही दिवस या मुलांचं वजन आणखीनच कमी होतं. साधारणपणे १० ते १५ टक्के, म्हणजे १५०० ग्रॅमच्या बाळाचं वजन १३५० होतं. मग ते हळू हळू वाढून पूर्ववत्‌ होतं. यासाठी जवळजवळ २-३ आठवडे खर्च होतात. तेव्हा कुठं ते जन्माच्या वजनाइतके होतात. नंतर मात्र झपाटयाने वाढू लागतात.

आईनं मनाचा निश्‍चय ढळू देता कामा नये. आणि कंटाळूनही जाता कामा नये. तिला लागेल ती सगळी मदत तिच्या नातेवाईकांनी अन डॉक्टरांनी दिली तर हा अवघड काळ लवकरच संपतो अन्‌ बाळाला, दूध बंद न पडता, ते तिच्या बाळाला, नंतर हवे तेवढे दिवस मिळू शकतं. यासाठी आई अन्‌ बाळ यांना एकत्र ठेवणं महत्वाचं. बाळ नजरेसमोर राहिल्यानं दूध येण्यास मदत होते अन्‌ आईच्या स्पर्शानं, अस्तित्वानं, बाळाला निर्धास्त वाटून त्याची वाढ व्हायलाही मदत होते. बाळाच्या वाढीची सुरवात होताच या सगळ्या कष्टाचं चीज झाल्याचा आनंद आईच्या चेहऱ्यावर दिसतो अन्‌ हे सगळे त्रास संपतात.बाळ बाळंतिणीला (एकत्र) वेगळं ठेवणं.
तिसरी महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे या मुलांना इतरांच्या संपर्कात येऊ न देणं. आपल्याकडे बाळ झाल्याची बातमी येताच बाळ- बाळंतिणीला ‘पहायला’ आप्तेष्टांची गर्दी होते. बाळ जितकं लवकर जन्माला आलं असेल तितकी त्याची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते असं गृहीत धरून चालावं. अशा मुलांना जंतूंचा संसर्ग फार लवकर होतो. आपल्या आजूबाजूला, आपल्या अंगावर, आपल्या हातपायांवर सर्वत्र जंतू असतात. किरकोळ सर्दी खोकला, फोड इ. गोष्टी झालेल्या माणसांपासून अतिशय भयानक रोगजंतू बाळापर्यंत पोहोचू शकतात. हे रोगजंतू मोठया सशक्त माणसांना, फारसं बेजार न करता, किरकोळ आजार करतात. पण कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्या अशा या बाळांना त्यांच्या मुळं प्राणघातक आजार होऊ शकतात. याचसाठी बाळाला स्वतंत्र आणि स्वच्छ राखणं महत्वाचं ठरतं. ‘बाळ अन्‌ आई’ हे दोघं नसून एकच समजले पाहिजेत. या दोघांना एकत्र ठेवावंच लागतं. म्हणून या दोघांना कोणी भेटायला, पहायला जाऊ नये. शक्य तितकी स्वच्छता पाळावी. ‘बाळ अजून जन्मालाच आलेलं नाही, म्हणजेच पोटातच आहे.असं समजावं म्हणजे बाळाला पहायची उत्सुकता दाबता येईल.

अपुऱ्या दिवसांची मुलं:
यामुलांना जन्मानंतर पहिल्या काही दिवसात काही जीवघेणे किंवा गंभीर असे आजार होऊ शकतात. याचं कारण पूर्वी सांगितल्याप्रमाणं, अवयव संस्था यांची अपुरी वाढ आणि कार्यक्षमता, यापैकीच काही पुढं देत आहे.

धाप लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं:
फुफ्फुसांची वाढ न झाल्यांनं मूल चांगला श्वास घेऊ शकत नाही. त्यामुळे प्राणवायु कमी पडल्यानं शरीरातल्या सर्वच अवयवांचा काम कमी कमी होऊन मृत्यू येऊ शकतो. यासाठी प्राणवायुचा सतत पुरवठा करावा लागतो. कधी कधी जास्त दाबानं प्राणवायू फुफ्फुसांमधे पोचवावा लागतो. यासाठी क्वचित यंत्राचीही मदत घ्यावी लागते.

श्वास थांबणं:
वर दिलेल्या प्रकारचाच पुढचा प्रकार म्हणजे दमून, थकून श्वास थांबण. या अपुऱ्या दिवसांच्या मुलावर त्यांचा श्वास बंद पडत असला तर सतत लक्ष ठेवून बसावं लागतं, त्यासाठी बाळाचा श्वास थांबला आहे हे सांगणारी यंत्रं आता उपलब्ध आहेत. असा श्वास थांबल्याचा इशारा या यंत्रामार्फत मिळाला की लागलीच त्याला परत श्वास घेण्यासाठी मदत करावी लागते किंवा कृत्रिम श्वास द्यावा लागतो.

रक्तातली साखर कमी होणं:
अपुऱ्या दिवसाच्या मुलांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण अनेकदा कमी होतं. शरीरातल्या सर्व संस्थांच्या व्यवस्थित कार्यक्षमतेसाठी विशिष्ट प्रमाणात साखर मिळावी लागते. नाहीतर श्वास थांबणं, झटके येणं, बेशुध्द होणं, इ. प्राणघातक गोष्टी होऊ शकतात. यासाठी शिरेतून ग्लूकोज देऊन साखरेचे प्रमाण राखावं लागतं. नाहीतर यामुळं मेंदूवर व इतर संस्थांवर कायमचे वाईट परिणाम होऊ शकतात.

कावीळ:
सर्वच नवजात बालकांना ही कावीळ होत असते. गर्भावस्थेतलं विशिष्ट प्रकारचं रक्त दुसऱ्या प्रकारच्या रक्तानं म्हणजे मोठेपणीच्या वेगळ्या रक्तानं बदललं जात असतं आणि निरूपयोगी झालेल्या रक्त पेशींच्या नाशापासून कावळीचं द्रव्यं तयार होऊन रक्तात येत असतं. या मुलांच्या यकृताची, या कावीळीच्या द्र्व्याचा नाश करून लघवीवाटे निचरा करण्याची क्षमता कमी असल्यामुळं या द्रव्याचं रक्तातलं प्रमाण वाढतं. असं हे द्रव्य मेंदूला हानीकारक असतं. त्याचं प्रमाण ‘फोटोथेरपी’ देऊन आटोक्यात ठेवता येतं. कधी कधी मात्र प्रमाणाबाहेर कावीळ वाढत असल्याचं दिसल्यास ‘रक्त बदलून’ कावीळीचं प्रमाणं तातडीनं कमी करावं लागतं. याला Exchange Transfusion म्हणतात. आई-मुलाचा रक ाव होणं, रक्त न गोठणं या गोष्टींनी अतिशय गंभीर आजार होतात किंवा ते प्राणघातक ठरू शकतात. असे रक्तस्त्राव मेंदूत झाल्यास मृत्यू येण्याची शक्यता अधिक असते किंवा अशी रक्तस्त्राव झालेली मMतगट न जुळल्यामुळं होणारी कावीळी याच प्रकारची असते. या कावीळीचा मोठ़्यांना होणाऱ्या संसर्गजन्य कावीळीशी काहीही संबंध नाही.

रक्तस्त्राव:
महत्वाच्या अवयवांमध्ये अंतर्गत रक्त्स्त्⏂�लं वाचल्यास त्यांना कायमचं अपंगत्वही राहू शकतं.

संसर्गजन्य आजार:
या मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यानं वेगवेगळ्या गंभीर प्रकारचे जंतूजन्य आजार होऊन मूल दगावू शकतं.

अपुऱ्या वाढीची मुलं:
आपल्या देशात अपुऱ्या दिवसांच्या मुलांच्या मानानं अपुऱ्या वाढीची मुलं जास्त प्रमाणात जन्माला येतात. पाचात एक असं हे प्रमाण असतं. अशी मुलं अर्थातच कमी वजनाची जन्माला येतात. जन्माआधी काही दिवस पोटात असतांना योग्य ते पोषक वातावरण न मिळाल्यानं त्यांच्यावर मोठा ताण पडतो. मिळणाऱ्या तुटपुंज्या आहार द्रव्यातून शरीराची वाढ होताना बाळाच्या सर्वच संस्थांवर विशेष ताण पडतो. अशा ताणचा परिणाम रक्तावर प्रामुख्यानं आढळतो. या मुलांच्या रक्तातल्या तांबडया पेशींचं प्रमाण बरंच वाढलेलं आढळतं. पण याच वाढलेल्या रक्त पेशींमुळं रक्ताच्या गुणधर्मात फरक पडून आणखी काही समस्याच उभ्या राहतात.

रक्तपेशींचं प्रमाण वाढल्यामुळं रक्त दाट होतं. रक्त जास्त दाट झाल्यानं सर्वत्र सहजपणे फिरू शकत नाही अन्‌ विविध अवयवांना रक्त पुरवठा कमी पडण्याचा त्रास होतो. यामुळं सर्वच अवयव, संस्था त्यांचं काम नीट करू शकत नाहीत. त्यामुळं बाळाच्या तब्येतीत गंभीर प्रश्न उभे राहातात. याबद्दल वेळेवर उपचार न केल्यास त्याचे दुष्परिणामही गंभीरच असतात. म्हणून रक्ताचा दाटपणा कमी करण्याचे उपाय लगेचच योजावे लागतात म्हणजे सर्व शरीराचा रक्तपुरवठा सुरळीत चालू राहतो.

याशिवाय पोटातच शी करणं, हेच पाणी श्वासमार्गात जाणं, वारेची वाढ संपणं, त्यामुळं बाळाची वाढ संपणं अशा महत्वाच्या गोष्टींमुळं ही बाळं जन्मानंतरच्या काही दिवसात आजारी होऊ शकतात. या प्रश्नांकडे लक्ष देऊन ते प्रत्यक्ष येण्याआधीच त्याविरूध्द करायच्या उपाययोजनांची तयारी ठेवल्यास ते चांगल्या तऱ्हेने हाताळता येतात आणि त्यात यशही मिळतं. अशा अपुऱ्या दिवसांच्या अन्‌ वाढीच्या मुलांना वाढवतांना आणखी एक प्रश्न अनेकदा पुढं येतो तो म्हणजे यांच्या शरीरात असलेल्या जन्मजात विकृती. याबद्दलही विचार होणं आवश्यक आहे.

ज्या जन्मजात विकृतींमुळं मूल दीर्घकाळ जगू शकणार नाही किंवा स्वतः स्वतंत्रपणे जगू शकणार नाही, ज्या विकृतींच्या दुरूस्तीची खत्री नाही अथवा खर्च अफाट आहे अशा विकृती दुरूस्त करणं की निसर्गाच्या विरूध्द फारसं न जाणं चांगलं, हे बाळाच्या नातेवाईकांनी, आईनं, डॉक्टरांनी एकत्र बसून चर्चा करून ठरवावं, आणि निर्णय घ्यावा. यामुळं बरेचदा वेळ आणि पैसा वाचून मनस्ताप टळू शकतो.