अपुऱ्या दिवसांची मुलं आणि अपुऱ्या वाढीची मुलं:
कधी कधी मुलाला डॉक्टरांकडे आणंल जातं तेच मुळी ‘वर्गात इतर मुलांच्या मानानं खूप लहान वाटतो या तक्रारीसाठी आणिएर्द मग डॉक्टर पहिला प्रश्न विचारतात.
तो म्हणजे, याचं जन्मत: वजन किती होतं आणि दिवस पूर्ण भरले होते का? आता सहाजिकच पालकांच्या मनात प्रश्न येतो, जन्माच्या वेळच्या वजनाचा आताच्या वाढीशी काय संबंध? तर मुलाच्या वजनाची वाढ त्याच्या गर्भावस्थेतल्या वजनावर आणि वाढीवर फारच अवलंबून असते.
आपलं बाळ छान बाळसेदार, वजनदार, गुटगुटीत असावं असं कोणत्या आईला वाटणार नाही? पण सगळीच बाळं छान बाळसेदार जन्माला येतातच असं नाही. मूल जन्माला येतांना त्याचं वजन हे त्याची पोटात असतांनाची वाढ दर्शवतं. ही वाढ त्याच्या आई वडिलांच्या तब्येतीवर, त्यांच्या चणीवर, आईच्या शारीरिक, मानसिक स्थितीवर, वारेच्या गुणधर्मांवर आणि मुलाच्या दिवस भरण्यावर अवलंबून असते. या सगळ्या परिस्थितीवर बाळाचं बजन अवलंबून असतं.
अपुऱ्या दिवसांची मुलं
पूर्वी अशी कमी वजनाची कितीतरी मुलं दगावर असत. नव्हे, पूर्वी १० ते १५ मुलं होत असत. आणि त्यातली २ ते ५ जगत असत. हा एक सर्वसामान्य रिवाजच होता. त्यात फारसं वावगं वाटतही नसे. कच्चं फळ झाडावरून काढलं, तर ते पिकणार नाही, हाती लागणार नाही असा जणू त्यावरचा युक्तिवाद (थोडयाफार प्रमाणात खराही) असे. पण आता ती स्थिती राहिली नाही. वैद्यक शास्त्रातल्या संशोधनानं, अभ्यासानं आपल्याला अशा नैसर्गिक आपत्तींवर थोडी तरी मात करायला शिकवलंय. त्यामुळं आपण अशा प्रकारे लवकर जन्माला आलेल्या मुलांना जगवू शकतो. वारंवार अपुर्या दिवसांच्या प्रसूतिंनी आणि मुलांच्या दगावण्यानं दु:खे झालेल्या स्त्रिया मागच्या पिढीतल्या लोकांना माहीत आहेत. या कारणांन त्यांना अपत्यहीनही रहावं लागलं होतं. पण आता बर्याच अंशी त्यात प्रगती होत आहे. आता आपण अशा मुलांच्या जगण्याबद्दल पुष्कळशी खात्री देऊ शकतो. त्यांच्या पालकांच्या आयुष्यात फुललेला आनंदही पाहू शकतो.
सर्वसामान्यपणे गरोदरपणाचा काळ २८० दिवस मानला गेलाय. पाळी चुकण्याआधी २८ ते ३० दिवस आणि पुढे २५० ‘अ किंवा-’ १० दिवस असा गर्भ धारणा आणि वाढीचा काळ असतो. यातले पहिले १०० दिवस गर्भाच्या रूजण्याचे व त्याच्या सर्व अवयव आणि संस्थांच्या निर्मितीचे असतात. नंतरचे ९० दिवस हे गर्भाची शारीरिक वाढ आणि या सर्व शरीर यंत्रणेची आणि या विशिष्ट संस्थांच्या कार्यक्षमतेची वाढ होण्याचे असतात. म्हणजे नीट विचार करून पाहू गेल्यास शेवटचे ३ महिनेच खरे ‘वाढीचे’ धरावेत. जितके दिवस कमी भरतील तितकी बाळाची वाढ कमी भरते. त्याच्या सगळ्या अवयव संस्थांवर अकाली म्हणजे फार लवकरच संपूर्णपणे स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची मोठीच जबाबदारी पडते. अर्थातच हा फार मोठा ताण असतो.
निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याच्या पोषणाची संपूर्ण व्यवस्था वारेमार्फत, आईकडून होत असतांनाच काही कारणांनी लवकर जन्माला आल्यामुळे या सर्व गोष्टी उदा. श्वसन क्रिया, हृदय रक्ताभिसरण क्रिया, पचन क्रिया, उत्सर्जन शेवटच्या काही दिवसातच वजनाची वाढ झपाटयानं होत असते. तीही न झाल्यानं सांगितल्याप्रमाणे सर्वच गोष्टींची पूर्ण जबाबदारी असा दुहेरी ताण या बाळांना त्याच्या इतक्या सहजतेनं आणि अचूकपणानं करणं. खूपच अवघड असतं. अशा मुलांना जगवणं हे पालक, डॉक्टर, नर्सेस यांना एक प्रकारचं मोठं आव्हानच असतं. काही महत्वाच्या गोष्टींकडे काळजीपूर्वक आणि नेटानं लक्ष पुरवलं तर या मुलांनाही जगण्याचा त्यांचा हक्क परत मिळवून देता येतो.
कमी वजनाची मुलं
- Details
- Hits: 14829
4
मुलांचे आरोग्य
आहार म्हणजे काय?
