Print
Hits: 5975

खरं तर कोणाच्या घरांत डोकावून विचारलं नसताना सल्ले देऊ नयेत. पण जवळ जवळ सगळ्याच घरातून ही सूचना आली की, अहो हे सगळं तुम्ही सांगताय ना, ते तुम्ही आजच्या आजी आजोबांना सांगा ना ! त्यांना पटू दे, तरच काही उपयोग होईल.

जणू काही आम्ही सांगितलेलं इतर सगळं आईबाबांकडून पाळलं जाणारच आहे आणि उरेल ते मात्र आजी आजोबांकडे लागलं. तेवढ्यामुळं सगळं बिघडलं असं होऊ नये म्हणून हा लहान तोंडी मोठा घास घेण्याचं धाडसं केलंय.

ज्या आजी आजोबांना स्पष्ट बोलून, वागून नातवंडांविषयीची आपली जबाबदारी माफक करता आली आहे किंवा ज्या आजी आजोबांची नातवंडांच्या जबाबदारीलाही ना नाही, अगदी संपूर्ण आनंदातच त्यांना ती झेपतीय, अशांना सोडून उरलेल्या आजी आजोबांच्या (बहुतेक) संदर्भात हे लिहिलं आहे.

मुलांना सांभाळून, वाढवल्यानंतर आजी आजोबांवर पुष्कळदा मुलं बिघडवल्याचा आरोप येतो तेव्हा मात्र खरोखर वाईट वाटतं. उतरत्या वयात, शरीराला विश्रांती आणि मनाला शांततेची जरूरी असतांना आजच्या मिळवत्या सुना आणि मुलींच्या जमान्यात, त्यांना नाईलाजानं पुन्हा उभं रहायला लागतं, पदर बांधून उसनं अवसान आणून सगळं साजरं करावं लागतं. मुलींना सुनांना आपण स्वावलंबी बना, पायावर उभ्या रहा म्हटलंय, मग आता तिची नोकरी चालू रहायला हवी असेल तर तिची मुलं सांभाळायलाच हवीत. इतकं लोभस काम गळ्यात प्रेमपाश बनून कधी अडकतं हेच लक्षात येत नाही.

मोठया उत्साहानं सगळी कामं अंगावर घेतली जातात. पूर्वी नव्हतो का हे आपण सगळं करत असं मनाला विचारत, आणि आता कुरकुर करायची नाही असं स्वतःलाच बजावत आपणहूनच परत ती गोड जबाबदारी लावून घेतली जाते, असंच बहुतेक आजी आजोबांच्या बाबतीत घडतं. पण आता शरीर साथ देत नाही. थोड्याच वेळात त्या जबाबदारीचं ओझं वाटायला लागतं. मुलांचं प्रेमाचे शब्द गोंगाट बनू लागतात, छोटी कामं मोठी वाटू लागतात, क्षण काम्ण मिठी वाटू लागतात, क्षण युगासारखे वाटायला ळागतात, कधी एकदा सुना मुली येतील अन्‌ यातून मला सोडवतील इकडे डोळे लागतात. आजी, आजोबा , नातवंडं, पालक सगळेच एका विशिष्ट मनस्थितीतून जाता असतात . प्रत्येक जण आता फक्त स्वत:पुरताच विचार करू शकतो. कारण ही परिस्थितीच तितकी ताणली गेलेली असते.

या सगळ्यावर शांतपणे विचार केला के सर्वांनाच एकमेकांचं पटतं, समजतं, सहानुभूती वाटते. सुधारणा करावी. (आजी आजोबांनासुध्द) असं वाटतं पण तो विचार तिथंच संपतो. गडबडीत दुसरा दिवस उजाडतो अन्‌ परत तेच चक्र सुरू होतं तसंच फिरत रहातं. असे दिवसामागून दिवस जातात. मूल मोठं होतं. यात फक्त बऱ्याच गोष्टी राहून गेल्या, हातातून निसटल्याचं जाणवते.

अशा पार्श्वभूमीवर आजे आजोबांकडे जेव्हा मुलं असतात तेव्हा त्यांना काय वाटतं? मुलाला शिस्त, प्रेम दोन्ही मुळालं पाहिजे. त्यांची जपणूक झाली पाहिजे. आपलीही थोडी करमणूक झाले पाहिजे. आपल्या मुलांच्या बाबतीत आपण जसे वागलो तसंच वागून यांनाही चांगलं वाढवलं पाहिजे. थोडासं विरंगुळाही मिळाला पाहिजे. यासाठी ते जबाबदारी घेतात. यावेळी त्यांची अपेक्षा असते ती म्हणजे वेळी शरीर थकलं तर कोणी तरी ही जबाबदारी चटकन्‌ वाटून घेणारं मिळालं पाहिजे.

या मागणीत काही वावगं आहे असं नक्कीच नाही. त्यांने मुलानं देऊ केलेल्या गोष्टी नक्कीच आपल्यालाही हव्यात. पण हे प्रत्यक्षात का येत नाही? आजी आजोबा मुलं बिघडतात असा त्यांच्या वर का येतो? याचं एक न टाळता येण्यासारखं कारण असं की मुलं फार जपली जातात. त्याची कारणं अशी, आता एक- दोन मुलांचा जमाना आहे. प्रत्येक मूल अमूल्य म्हणून जपलं जातं. त्यात आपण कुठं तरी कमी पडू नये असं वाटतं. म्हणूनच जास्त फाजील जपणूक नकळत होते. आता अनेक वर्षांच्या खंडानंतर पुन्हा मुलं सांभाळतांना त्यांच्या आजार, औषधपाण्यानं दडपण वाटतं. त्यांच्या मागे लक्ष ठेवायला जमेल की नाहीची शंका वाटल्यानं पुन्हा जास्त जपणंच होतं.