Print
Hits: 17409

लठ्‌ठपणा, स्थूलता अथवा जादी अधिक असणे, या सर्व समानार्थीच बाबी असून त्यातून स्त्रीचे बैडोल शरीर, विजोड बांधा आणि अनारोग्य या बाबीच व्यक्त होत असतात. लठ्‌ठ व्यक्तीचे व्यक्तिमत्व हसरे, मोकळे असते असा गैरसमज आहे.

उलटपक्षी केव्हा स्त्रीचा बांधाव यामुळे बेढव बनत नाही, तर अनेक रोगांना आमंत्रण दिले जाते. हृदयरोग, उच्च रक्तदाब यासारखे विकार यातून निर्माण होत असतात. वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीराचे चापल्या वाढत नसते. तर उलट ते कमी होत असते. यामुळे स्त्रीचा देह केवळ बेढबच दिसत नाही तर तो तिच्या वाढत्या चरबीचा भार हृदय, मूत्रपिंड, यकृत इ. वर टाकत जातो. म्हणूनच स्त्रीने केवळ वजन कमी करण्याचे नव्हे, तर कांड्या , कंबर, पोट, दंड इ. वरील चरबी कमी करण्याचे व्यायाम जरूर करावेत. यासाठी हेल्थ क्लबमधील व्यायाम, योगधारणा इ. उपाय व उपचार करावेत. परंतु त्याच्याच जोडीला अत्यंत महत्त्वपूर्ण बाब विचारात घ्यावी की आहार- नियंत्रण अत्यंत जरूर ठरते.

आवश्यकता वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊनही आपला दैनंदिन आहार ठरवून व त्या जोडीस योग्य व्यायाम करून ठरविता येतो. प्रौढ स्त्रियांचे वजन व उंची यांचे परस्पर - प्रमाण हे सीमेपलीकडे जाता कामा नये. कपडे व पादत्राणे यांच्यासकट हे किती असावे, याचा तक्ता पुढे दिला आहे. या नुसार जर आपले वय, वजन व उंची याचा ताळा बसविण्याचे प्रयत्‍न प्रत्येकीने करून पाहिले, तर आपले वजन नेमके किती जास्त आहे वा कमी आहे, हे ठरविता येते.

उंची वजन
फूट इंच किलो ग्रॅम्स्‌

१०
११
००


४३.६ ते ४७.२
४५.० ते ४९.२
४५.९ ते ५२.७
४६.८ ते ५१.८
४८.२ ते ५३.२
५०.४ ते ५६.२
५२.७ ते ५८.६
५३.६ ते ६०.०
५५.९ ते ६१.८
५७.२ ते ६३.६


• तुमची उंची, तुमचे वजन हेल्थ कॅल्क्युलेटर च्या साह्याने तपासुन पाहा