आपल्याला जास्तीत जास्त - सुंदर बनविण्याचा प्रयत्न करणे, हा प्रत्येक स्त्रीचा जन्मसिध्द अधिकार असतो. परंतु अनेकींचा गैरसमज असतो की, सौंदर्य प्राप्त करण्यासाठी कृत्रिम प्रसाधनेच वापरावीत. परंतु त्यांच्या ऐवजी जर नैसर्गिक वा निसर्गातून प्राप्त होणाऱ्या प्रसाधनांच्या वापराचा विचार केला, तर ते अधिक फायदेशीर, टिकाऊ आणि उपकारक ठरत असते. कारण कृत्रिम प्रसाधनांमध्ये असणार्या रसायनांचा आत अभाव असतो. म्हणूनच आपल्याला सहज उपलब्ध असणार्या आपल्या दैनंदिन आहारात सामील असणार्या भाज्यांचा वापर करून आपण पुढील प्रसाधने तयार करू शकतो. जर त्वचा उजळ व कांतिमान बनवायाची असेल, तर प्रत्येकी अर्धा टी-स्पून मध, अंड्यातील पांढरी सफेदी व अर्धा टेबल स्पून गाजराचा रस हे पदार्थ एकत्र कालवून त्यांची पेस्ट चेहर्यास लावावी. १५/२० मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा.
जर उन्हाने त्वचेवर राप चढला असेल, तर सॅलडची पाने उकळून त्याचे पाणी गाळून थंड करावे व ते त्वचेवर लावावे. किंवा जेथे जेथे त्वचा सनटॅन झाली असेल, त्यावर काकडीच्या चकत्या कापून लावाव्यात. जर नुसताच राप नसून त्वचा काळपटही पडली असेल, तर लिंबू व काकडी यांचा रस एकत्र करून घ्यावा व स्वच्छ कापसाने डोळ्यांत जाऊ न देता सगळीकडे लावावा.
जर चेहर्यावर सुरकुत्या पडत असतील, तर एक बटाटा स्वच्छ धुवा व किसा. त्याचा रस पिळून घ्या. यात चाळलेली मुलतानी माती मिसळा व थोडा मध घालून कालवा. २० ते २५ मिनिटे चेहर्यावर लावा. धुवा आठवड्यातून २-३ वेळा केल्यास उपयोग होईल. चेहर्यावरचे डाग घालवण्यासाठी मेथीची पाने धुवा, वाटा व त्यांचा रस काढा आणि चेहर्यावर लावा. रोज केल्यास डाग जाण्यास वेळ लागत नाही.
सावळी त्वचा स्वच्छ, निरोगी होऊन निखारली जावी यासाठी मध, हळद व लिंबू यांचे मिश्रण नियमितपणे चेहर्यावर लावावे. तेलकट व जरा सुरकुतलेली त्वचा असेल, तर जवसाचे पूठ व एक टेबल - स्पून दूध एकत्र कालवावे व त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिसळावा. कालवून याचा लेप चेहर्यावर द्यावा.
उन्हाळ्यातील ऊष्मा हा त्वचेस घातक ठरू शकतो व तो सहन न झाल्याने जिवाची घालमेल होते. हा त्रास टाळणे, निदान त्याची तीव्रता कमी करणे यासाठी स्नानाच्या पाण्यात थोडा ताज लिंबाचा रस घालावा. सम प्रमाणात टोमॅटो , गाजर , काकडी यांचा रस कालवून त्वचेवर लावावा. वाळल्यावर धुवावे. त्वचा उजळ, तुकतुकीत व मुलायम बनते.
भाज्या व सौंदर्य
- Details
- Hits: 15205
21
महिलांचे आरोग्य
आहार म्हणजे काय?
