आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • कुटुंबाचे आरोग्य
  • महिलांचे आरोग्य
  • फळे व सौंदर्य

फळे व सौंदर्य

  • Print
  • Email
Details
Hits: 31364

निसर्गाने विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त द्रव्यांचे जणू भांडारच भरलेले असते. जर यांचे भरपूर प्रमाणात व नियमितपणे सेवन केले, तर केवळ आरोग्याच नव्हे, तर सौंदर्य वर्धन होण्यास त्यापासून उपयोगच होणार असतो. रोज फळे खाताना आवडणारे त्याच प्रकारचे फळ न खाता ती जरा बदलून खावीत. त्यामुळे प्रत्येकात असलेले भिन्न पोषक तत्व पोटात जाऊन आरोग्य व सौंदर्य या दोहोंचे वर्धन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जर उपवास केला असेल, तर नेहमीच तो फळे खाऊनच सोडावा. यामुळे पचनास मदत होते. तसेच जर अपचन, गॅसेस्‌ इ. मुळे पोटास त्रास होत असेल, तर पोट व पचन पूर्ववत्‌ करण्यासाठी २-३ दिवस फलाहारच करावा.

आपल्या देशात सहज उपलब्ध असणाऱ्या आणि मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या पुढील काही फळांची माहिती पुढे दिली आहे.

आंबा - यास फळांचा राजा म्हणतात. यात अ, ब व क ही तीन जीवनसत्वे मुबलक असतात. पण हा प्रकृतीस उष्ण असल्याने खाण्याआधी काही काळ थंड पाण्यात बुडवून ठेवून खावा. उन्हाळ्यातील उष्म्याच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी कच्चे पन्हे प्यावे किंवा ताज्या आंब्याच्या गराचा मँगो मिल्क शेक करून प्यावा. चेहऱ्याची त्वचा उजळावी यासाठी आंब्याचा गर, हळद दुधात, एकत्र कालवून चेहऱ्यावर चोळावे.

कैरी उकडून त्याचा गर चेहरा, गळा मान यावर चोळून घ्यावा व मग वाळल्यावर धुवावे. त्वचा मुलायम व कांतिमान बनेल.

डाळिंब - पिकलेल्या डाळिंबाचे दाणे चेहऱ्यावर नियमितपणे चोळा, त्वचेचा रंग हलका व गुलबट होण्यास मद होईल. याचा प्रयोग ओठांवरही करावा. ओठांचा रंग सुधारण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील डाग आणि झाकोळलेपणा घालविण्यासाठी डाळिंबांची स्वच्छ धुतलेली साल कच्च्या दुधात वाटा व चेहरा मान, गळा यावर लेपा, वाळल्यावर धुवा, सकाळी उठल्यावर नियमितपणे मधूर व रसाळ असे डाळिंबाचे दाणे चावून खा. त्यामुळे कोठा साफ राहतो. जर पोटात जंत असतील, तर तेही पडतील व आपोआप त्वचा उजळेल.

पपई - पुरातन कालापासून पिकलेल्या पपईचा गर हा एक प्राकृतीक आणि उपयुक्त सौंदर्य-प्रसाधन म्हणून करतात. कारण यात अ, ब, क ही जीवनसत्वे भरपूर असतात. तसेच यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस कार्बोहैड्रेटस्‌ इ. चे प्रमाणही अधिक असते. याचा गर जर नियिमीतपणे चेहऱ्यावर चोळला तर त्वचेचे आरोग्य सुधारते. त्यावरील डाग, पुरळ इ. कमी होतात. जर चेहरा व अन्य ठिकाणी मस असेल, तर त्यावर कच्च्या पपईचा गर चोळून लावावा. नियिमितपणा केल्यास मस जाऊ शकतील. चेहऱ्याचा रंग उजळावा आणि त्यावरील डाग कमी व्हावेत म्हणून अर्ध्या पपईचा रस काढावा त्यात गॉझ्‌ भिजवावे व ते चेहऱ्यावर पसरावे. त्यावर पपईचा गर लेपावा, वाळू द्यावे. मग हे जिन्नस काढून चेहरा धुवावा. जर नवा जोडा चावला, तर त्यावर उतार पडावा यासाठी कच्च्या पपईचा रस काढून लावावा. चेहऱ्यास मसाज केल्यावर पिकलेल्या पपईचा गर फ्रुट पॅकप्रमाणे लेपावा. वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे त्वचा आकसली जाऊन कांती सुधारते. नारळाचे पाणी अनेक जीवनसत्वे व तत्सम घटकांनी युक्त असते. म्हणूनच जर हे नियमितपणे चेहऱ्यास लावले, तर त्यावरील डाग, राप इ. निघून येण्यास मदत होते.

केळे - या फळात भरपूर प्रमाणात अ, ब, क, द, ई, जी, व एच्‌ ही जीवनसत्वे असतात. यात भरपूर स्टार्च व कार्बोहैड्रेटस्‌ असतात. म्हणूनच केळे हे फळ आरोग्यवर्धक ठरते. अशक्त व कमी वजन असणाऱ्या व्यक्तीने नियमितपणे केळी खावीत . प्रकृती सुधारून वजन वाढण्यास मदत होते. पिकलेल्या केळाच्या गरात मलई मिसळा व याचा पॅक चेहऱ्यावर लेपा. पंधरा मिनिटांनी चेहरा धुवा यानंतर पिकलेल्या दुसऱ्या केळाच्या पातळ व गोल चकत्या कापून मधात (आधीच) बुडवून ठेवा व त्या सर्व चेहऱ्यावर ठेवा. यानंतर १५ मिनिटांनी चेहरा धुवा. त्वचा जर शुष्क असेल, तर हा उपाय केल्यास त्वचेचा कोरडेपणा जाऊन तिचे आरोग्य सुधारते.

जर चेहऱ्यावर फोड, पुटकळ्या असतील, तर त्यावर पिकलेल्या केळाचा गर चोळून घ्यावा. अर्धा तास ठेवावा व त्यानंतर कच्च्या दुधाने चेहरा धुवावा. नियमितपणे केल्यास फायदा होईल.

सफरचंद - मानवी आरोग्य आणि सौंदर्य या दोहोंचे जतन आणि वर्धन करायचे असेल , तर रोज एक तरी सफरचंद खावे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॉस्फरस, लोह, ईथर इ. उपयुक्त द्रव्ये असतात. याच्या सालातही खूप महत्वपूर्ण क्षार असतात. त्यामुळे हे अमृताप्रमाणेच मानावे. याखेरीज यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात. सौंदर्य-वर्धनासाठी त्याचा पुढीलप्रमाणे उपयोग व्हावा. सफरचंदाच्या रसात थोडे गुलाबजलाचे थेंब टाका व चेहर्‍यास चोळा. सावळा रंग उजळविण्यास मदत होईल. चेहर्‍याच्या त्वचेचा वर्ण सुधारावा यासाठी सफरचंदाचा गर थोडा उकडा व चेहर्‍यावर चोळा. वाळला की चेहरा धुवा. नियमितपणे केल्यास फायदा होईल. जर केसातील कोंडा कमी करायचा असेल, तर प्रथम नेहमीप्रमाने केस धुवा. ओल्या केसांच्या मुळांच्या भांगा भांगातून ताज्या सफरचंदाचा रस चोळून लावा. २५-३० मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवावेत. नियमितपणे हा उपाय करावा.

खरबूज व टरबूज - ही फळे उन्हाळ्यातच उपलब्ध असतात. व त्यांचा उपयोग उन्हाळ्याचा त्रास कमी करून गारवा देण्यासाठी होत असतो. यांच्यात जलांश अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे ही फाळे कमी उष्मांकाची असतात. जर त्वचा शुष्क असेल, तर ती तैल व्हावी यासाठी खरबूजाच्या गरात एक अंड्याचे पाढरे व थोडी मिल्क पावडर कालवा व चेहर्‍यावर लेपा. वाळल्यावर धुवा. त्वचा जर चरचरीत व राठ वाटत असेल, तर ती नरम व्हावी यासाठी त्यावर खरबूजाचा गर चोळावा. सर्वांगावर टरबूजाची साल चोळावी. त्यामुळे त्वचा निखरून येते.

संत्रे - या फळात मुबलक प्रमाणात ‘क’ जीवनसत्व असते हे रेशदार फळ असते. याचा गर, रस, साले या सर्वांचा उपयोग सौंदर्य-वर्धनासाठी होतो. याची ताजी साल नेहमी हात, पाय, चेहरा, यावर जरा चुरडून चोळावी. त्यांना ‘क’ जीवनसत्व मिळते. हात नरम व मुलायम करण्यासाठी याच्या ताज्या रसात थोडा मध मिसळावा व त्वचेवर चोळावा. तेलकट त्वचेस संत्र्याचा रस व मुलतानी माती यांच्या मिश्रणाचा पॅक लावावा.

केस धुण्यासाठी रिठा, शिकेकाई यांच्या पावडरीत सुकलेल्या संत्र्याची पूड घाला, उकळा गाळा. याने नियमितपणे केस धुवा म्हणजे ते काळेभोर, लांब व तजेलदार होतील.

संत्र्याची साले उन्हात वाळवा वस्त्रगाळ पूड करून ती दूधात कालवा. मिश्रण एक जिन्नसी बनवा व हि पेस्ट चेहर्‍यावर लेपा. यामुळे तेलकट त्वचेचा आरोग्यास फायदा होईल आणि चेहर्‍याचा रंग उजळण्यासही मदत होईल. संत्र्याची साले मऊसर होईपर्यंत उकळा. मग हाताने त्याचा पाण्यात चांगली कुस्करा. एका बादलीभर पाण्यात हे पाणी ओता व या सुगंधी आणि औषधी पाण्याने स्नान करा.

काकडी - काकडीचा रस ऍस्ट्रींजंटप्रमाणे काम करतो. त्वचा ब्लीच करण्यासाठी याचा रस चेहर्‍यास चोळावा अथवा चेहर्‍यावर काकडीच्या फोडी ठेवाव्यात. पंधरा-वीस मिनिटांनी चेहर्‍यावरून याफोडी काढून चेहरा धुवावा.


60

महिलांचे आरोग्य

  • महिलांचे सबलीकरण ही काळाची गरज : कोहीनकर
  • तीन महिन्यांत वजन घटविण्यासाठी
  • किती (प्रमाणात) व काय गोड खाल?
  • नोकरी करणारी स्त्री व आरोग्य
  • फळे व सौंदर्य
  • भाज्या व सौंदर्य
  • शारीरिक आरोग्य
  • रजोनिव्रुत्ती आणि आहार
  • तुम्ही व तुमचे मूल
  • स्त्रियांचे सौंदर्यशास्त्र
  • सुडौल बांधा व सुंदरता
  • तुमची त्वचा निरोगी व सुंदर कशी ठेवाल?

आहार म्हणजे काय?

हआहार म्हणजे काय? स्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.