- काम करताना आपण विविध ढबीत बसून बघावे व त्यानंतर ठरवावे की, नेमक्या कोणत्या ढबीत बसल्यावर आपला देह हा अवघडला जात नाही.
- पाठीस पोक न काढणे, अंधारात काम न करणे, खूप पूढे वाकून बसून काम न करणे, पायावर पाय टाकून न बसणे, जर काँप्युटरवर काम करताना ऍडजेस्टेबल खुर्चीचा वापर करावा.
- आपण काम करताना ज्या खूर्चीवर बसतो, ती आपल्या कंबरेखालील भागास आधार देणारी हवी.
- आपल्या कंबरेस जर आधार मिळत नसेल, तर कुशन ठेवून तो द्यावा.
- जर लघवीस लागली, तर शक्यतो ती दाबून ठेवू नये, कारण यामुळे देखील काही अपाय होऊ शकतो.
- जेवण गरम राहील अशा टिफिनमध्ये न्यावे. यात हिरव्या भाज्या, दही डाळ इ. समावेश असावा.
- सारखा चहा, कॉफीवर जोर देवू नये. तसेच चहाबरोबर खाण्यास मोडावलेली कडधान्ये (उदा. मूग,मटकी, सोयाबीन्स्) न्यावीत.
- काँप्युटरवर वा टाइपरायटरवर काम करणार्या स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवावे की, हातांना खूप ताण बसून देऊ नये. हात थोडे ढिले सोडून व हलक्या हातानेच टाइप करावे.
- जेव्हा बसाल, तेव्हा आपली कंबर, गुडघे, पायांच्या पोटर्या यावर दाब पडेल, अशा प्रकारे बसणे टाळावे. हात व पायांची बोटे हालत राहतील, असे काम करावे.
- नोकरी करणार्या स्त्रियांच्या आरोग्य व सौंदर्य यावर घाला घालणाऱ्या मायग्रेन, कंबर, पाठदुखी, फ्रोझन शोल्डर यासारख्या अनेक विकरांची कारणे यात असतात आणि यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच वरील बऱ्याच सूचना विचारात घ्याव्यात.
गर्भवती स्त्रीचे आरोग्य व सौंदर्य
गर्भवती स्त्री ही एक नव्हे, तर दोन जीवांचे पोषन करत असते, म्हणूनच तिचे आरोग्य व पर्यायाने सौदर्य यांची जपणूक व्हावी. या काळात प्रत्येक स्त्रीचा आहार पौष्टिक आणि संतुलीत असावा. भ्रूणाची सामान्य व अविकृत वाढ होण्यास असा आहार जरूरी असतो. सामान्यतः रोज २६०० कॅलरीयूक्त संतुलीत आहार जर गर्भवतीने घेतला, तर तो खात्रीने उपयुक्त ठरतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
यामध्ये दुधाचा समावेश प्रामुख्याने हवा. प्रोटीन्स् अधिक मिळावीत यासाठी डाळी, कडधान्ये इ. आहारात असावीत. आहारात आयोडीन हवे, अन्यथा दातांचे विशिष्ट विकार जडू शकतात. तसेच जीवनसत्वे तर मानवी देहास जीवन देणारीच असतात. म्हणूनच पालक, मेथी, चवळई, मुळा पाने, हिरवे सॅलड इ. खावे.
लोहतत्वे मिळावित म्हणून मेथी, मटार, सफरचंद, कारले, पुदिना, काजू इ. पदार्थ खावेत. मुलांचे दात व हाडे बळकट व्हावीत. यासाठी या मातेने आपल्या दैनंदिन भोजनात तीळ, बदाम, दुध, चणे, उडीद मूग इ. डाळी यांचा समावेश करावा. यामुळे मातेसही आपले आरोग्य सावरणे शक्य होते.
मातेच्या दैनदिन आहारात खूप गोड, तेलकट, मसालेदार खाद्यपदार्थांची रेलचेल नसावी, कारण यामुळे तिला अपचन, त्वचेवर विपरीत परिणाम होणे इ. प्रकारचे त्रास होऊ शकतात. शिळे उघड्यावरील अथवा जेथे स्वच्छतापालन होत नाही, अशा ठिकाणचे अन्नही तिने खाऊ नये. कारण यामुळे तिच्या पोटात नको ते विषाणू जाऊन त्यांचा तिला व तिच्या भ्रूणासही त्रास होऊ शकतो. यामातेने नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात पाणीही प्यावे. त्यामुळे तिच्या पचनास मदत होते व उत्सर्जन प्रक्रियाही वेगाने व नियमितपणे घडते. त्यामुळे तिची त्वचाही नितळ, तारूण्यपिटीकारहित राहण्यास मदत होते. बध्दकोष्ठही होत नाही. अशा प्रकारे ही काळजी घ्यावी.