Print
Hits: 10513

पालक ह्या नात्याने तुमचे तुमच्या मुलाशी संबंध कसे आहेत यावर विचार करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त व्हावे यासाठी येथे एक प्रश्नावली आहे.

 1. तुमचे मूल तुमच्याबरोबर जेवायला बसते का?
 2. तुम्ही तुमच्या मुलाला धारदार/ टोकदार वस्तू इ. हाताळायला परवानगी देता का? चालवून घेता का?
 3. आपल्या मुलासाठी, आपण अजून अधिक काही करू शकत नाही याबद्दल आपल्याला वाईट वाटते का?
 4. मुलाशी अबोला धरण्याची शिक्षा तुम्ही धरता का?
 5. तुम्ही तुमच्या मुलाला दररोज, त्याला हवे ते कपडे घालू देता का?
 6. तुमच्या मुलाचा दिवसाचा कार्यक्रम तुम्ही ठरवता का?
 7. तुमच्या मुलाने तुमचे ऐकले नाही तर तुम्ही त्याला मारता का?
 8. तुमच्या मुलाशी जवळकीच्या नात्याने वागताना, तुमची वागण्या-बोलण्याची पध्द्त सर्वसामान्यपणे असते तशीच असते का?
 9. तुमचे मुल तुमच्या द्रुष्टीआड झाले तर तुम्ही चिंताग्रस्त होता का?
 10. तुमच्या मुलाला सोडून तुम्ही सहलीला वगैरे जाता का?
 11. मुलाच हवं-नको बघताना तुम्हाला कंटाळा येतो का?
 12. तुमच्या मुलाचे, त्याच्या बरोबरीच्या इतर मुलांशी मतभेद झाले तर तुम्ही मधे पडता का?
 13. तुमचं मुल तुमच्याशी खोटं बोललं तर तुम्ही त्याला माराल काय?
 14. घरकाम करताना, तुम्हाला तुमचं मुल आजूबाजूला असलं तर चालतं का?
 15. तुमच्या मुलाने दंगामस्तीचे खेळ खेळलेले तुम्हाला चालेल का?
 16. तुमचं मुल तुमची निराशा करतं का?
 17. आजूबाजूला मोठी माणसं असताना, तुम्ही तुमच्या मुलाला गप्प रहाण्यास-शांत बसण्यास सांगता का?
 18. मुलानं किती खावं हे त्याचं त्याला ठरवायला तुम्ही देता का?
 19. इतर मुलांच्या समोर, तुम्ही तुमच्या मुलाला रागवता का?
 20. मूल रात्री झोपण्यापूर्वी, तुम्ही त्याच्याबरोबर काढता का?
 21. तुमचे मूल आजुबाजूला नाहीये अस धरून तुम्ही त्याच्यासमोर इतर लोकांशी बोलता का?
 22. मुलाला शिक्षा केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटते का?
 23. घरी येणाऱ्या लोकांशी बोलण्यासाठी, तुम्ही मुलाला प्रोत्साहन देता का?
 24. बसण्याच्या खोलीमध्ये सगळं अस्ताव्यस्त होईल म्हणून तुम्ही मुलाला बसण्याच्या खोलीबाहेर ठेवता का ?
 25. मुलाला त्याच्या मित्रांना भेटू न देण्याची शिक्षा तुम्ही मुलाला करता का?
 26. तुम्ही तुमच्या मुलाबरोबर खेळता का?
 27. कौटुंबिक कार्यक्रम ठरवताना, तुमच्या मुलाचे विचार तुम्ही जाणून घेता का?
 28. शिक्षा केल्यानंतर, विसरण्यासाठी तुम्ही मुलाला काही वस्तू, खाऊ देता का?
 29. तुम्ही मुलासाठी जे करता त्याबद्दल मुलाला काही विशेष वाटत नाही असं तुम्हाला वाटतं का?
 30. घरी मुलाबरोबर रहाण्यासाठी, आलेली आमंत्रणे तुम्ही नाकारता का?
 31. मुलाने केलेल्या चुकांची त्याला तुम्ही आठवण करून देता का?
 32. तुमच्या मुलाने तुम्हाला मारलं तर तुम्ही त्याला उलट माराल काय?
 33. एकत्र गाता येतील, म्हणता येतील अशी गाणी तुम्ही मुलाला शिकवता का?