Print
Hits: 20490

व्यायाम करून तीन महिन्यांत वजन घटविण्यासाठी - वजन घट दैनंदिन व्यायाम उष्मांक किती हवा
६ किलो एक तास चालणे प्रतिदिवस २५० ऊष्मांक
१२ किलो दोन तास चालणे प्रतिदिवस ५०० ऊष्मांक

एक तास विशिष्ट व्यायाम करून किती कॅलरीज्‌ घटतात?
व्यायाम / हालचाली प्रकार एक तासातील घट
नेहमीच्या गतीने चालणे १८० कॅलरीज
घरकाम ( स्वयंपाक, झाडलोट इ.) १८० कॅलरीज
पोहणे, सायकलिंग, पळणे ६०० कॅलरीज
योगा करणे ३० ते ६० कॅलरीज
ऍरोबिक्स ४२० ते ६० कॅलरीज

मैदानी खेळ
(उदा. टेनिस, बॅडमिंटन) ३०० ते ७०० कॅलरीज
नेहमीचे ऑफिसमधील काम ६० कॅलरीज्‌

आहार नियंत्रण कसे कराल?
आहारात काय टाळाल?
तळकट, तूपकट, गोड पदार्थ, चॉकलेट्‌स्‌, केक मद्य, शीतपेये , तूप चीज, लोणी, मिठाई, सुकामेवा, साय, गोड सरबते मुरंबे.

अधिक काय खाल?
ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, सूप, सोडा, ताक, मासळी, लिंबूपाणी, गाईचे सायविरहित दूध.

काय मर्यादित खाल?
कंदमुळे, तेल द्विदल धान्ये.

डाएटिंगबाबत सूचना
मध, केळे चिक्‍कूसारखी गोड फळे, टोस्ट इ. पदार्थामुळे वजन वाढू शकते, हे विसरू नये. मसाज, टक्रिश बाथ, चरबी काढणे हे वजन घटविण्याचे केवळ खर्चिक व तात्पुरते मार्ग आहेत, हे विसरू नये. व्यायाम व आहार-नियंत्रण या दोन परस्परपूरक व परिणामकारक मार्गांवरच जोर द्यावा. सौना बाथमुळे शरीरातील जलांश घटतो, चरबी नव्हे, हे विसरू नका

बाळंतपणानंतर वजन वाढणे स्वाभाविकच असते, त्यावर विश्वास न ठेवता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार ते घटवा. रोजच्या खाण्याच्या वेळा, पदार्थ , प्रमाण इ. ठरावा व त्यानुसारच तुमचा आहार ठेवा. जरी एखादी औषध उत्पादक कंपनी छातीठोकपणे त्यांच्या वजन घटविणाऱ्या औषधांची जाहिरात करत असली, तरीही त्याकडे लक्ष देऊन प्रत्याक्षात त्या औषधांचे सेवन चालू करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विसरू नका.

कारण यातील काही औषधांमुळे अपचन, निद्रानाश, रक्तदाब वाढणे, थकवा, केस गळणे इ. व्याधी, तक्रारी जडू शकतात. चुकून एखाद्या दिवशी जास्त खाल्ले, तर दुसऱ्या दिवशी कमी खा वा उपवास करा व कॅलरीज्‌ संतुलित करा.

डाएटिंग स्विमिंग यांची सुरूवात करण्याआधीही वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन घ्यावे. प्रत्येकीस किती कॅलरीज आवश्यक ठरातात? आहार कोणता? कोणते व्यायाम कसे व केव्हा करावे? या सर्वांबाबत मार्गदर्शन घ्यावे.

स्त्रीचा बांधा चवळीच्या शेंगेप्रमाणे असणे, हे सौंदर्याचे लक्षण मानले जाते. तिचा कमनीय बांधा तिच्या व्यक्तिमत्वास एक आगळी चौकट प्राप्त करून देत असतो. यामध्ये तिचे चालणे बसणे, उभे रहाणे यासारख्या हालचालींची ढबही विचारात घेतली गेलेली असते. म्हणूनच व्यायाम व आहार-नियंत्रण या दोहोंचा वापर करून ती हे उध्दिष्ट साध्य करू शकते.