प्रथमोपचार तसे अनेक गोष्टींसाठी करावे लागतात. परंतु त्यासाठी प्रामुख्याने पुढील कारणे दिसून येतात.
चावे किंवा दंश हे डास, माश्या, किडे अशांसारख्या किटकांचे असतात; किंवा कुत्र्यासारख्या प्राण्याचे असतात. कधी तर मानवाचे सुद्धा चावे दंश असू शकतात. अशांसाठी त्वरित प्रथमोपचार हे अतिशय गरजेचे असतात. प्राण्याच्या चाव्यामुळे किंवा किटकाच्या चाव्यामुळे काहींना ऍलर्जीक रिऍक्शन येऊन पूर्ण अंगाला सूज येते. त्यांना त्वरित जवळच्या हॉस्पिटलमधे नेऊन योग्य ते इन्जक्शन देणे अतिशय महत्त्वाचे असते.
सर्पदंशामधे साप विषारी होता की बीनविषारी हे समजले तर पुढील उपचार करणे सोपे जाते. साप चावल्या नंतर माणसाला दारू पाजावी हा पूर्णपणे गैरसमज आहे. साप जिथे चावला असेल त्याच्या वरील बाजूला हातरुमाल किंवा फडके घट्ट बांधावे. दंश झालेल्या ठिकाणी छेद देऊन रक्त वाहुन जाऊ द्यावे. ही माहिती अतिशय प्राथमिक आहे. खरेतर दंश झालेल्या माणसाला ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमधे नेणे अत्यंत गरजेचे आहे
भाजणे हे चार प्रकारात मोडते.
फस्ट डिग्री बर्न
ह्या प्रकारच्या भाजण्यामधे त्वचेचा अगदीच वरवरचा भाग येतो. म्हणजेच, ज्या भाजण्याची धग त्वचेच्या खाली पोचत नाही, आणि ती घटनाही छोटीशीच असते त्याला फस्ट डिग्री बर्न असे म्हणतात. अशा प्रकारच्या भाजण्यामधे सूर्यप्रकाशाने त्वचा जळणे हे ही येते.
फस्ट डिग्री बर्न वर उपचार म्हणजे सर्वसामान्य वेदनाशामक क्रीम लावणे हे होय. पेशंटच्या शारिरीक तब्येतीस काही झाले असल्यासच डॉक्टरकडे जाणे गरजेचे असते. अथवा फस्ट डिग्री बर्नसाठी डॉक्टरकडे न गेल्यानेही काही बिघडत नाही.
सेकंड डिग्री बर्न
ह्या प्रकारच्या भाजण्यामधे त्वचेचा फक्त वरवरचाच भाग येत नाही, तर थोडे ब्लिस्टर्स होतात, भाजण्यामुळे जखमेत थोडे पाणी होते. सूर्यप्रकाशामुळे त्वचा अती जळाली तर ते ही ह्याच भागात मोडते.
ह्या प्रकारच्या भाजण्यासाठी डॉक्टरकडे/ फिजिशियनकडे जाणे गरजेचे असते. प्रथमोपचारासाठी भाजलेली जागा दहा मिनिटे नळाखाली गार पाण्याखाली धरावी. ह्यावेळी पोटामधे पाणी किंवा सरबत/द्रव पदार्थ जात आहेत की नाहीत ह्याची काळजी घ्यावी. ते पोटात जाणे अत्यंत गरजेचे असते. भाजलेल्या जागेवर क्रीम लावावे आणि स्टराइल्ड ड्रेसिंग करणे.
थर्ड डिग्री बर्न
ह्या प्रकारच्या भाजण्यामधे त्वचेचे सर्वच थर येतात. तसेच भाजलेल्या जागी त्वचेचे कार्य बिघडूनच गेलेले असते.
थर्ड डिग्री बर्न झाले असल्यास त्यावर स्वत: इलाज कधीच करू नये. ताबडतोब हॉस्पिटलमधे नेऊन डॉक्टरांनी आणि नर्सेसनी त्यावर इलाज करणेच योग्य रहाते. पेशंट जर खूप मानसिक धक्क्यात असेल तर स्ट्रेचर वर घेऊन डॉक्टरांकडे न्यावे. आणि जखमेवर कोणतेही तेल, क्रीम आपण लाऊ नये.
फोर्थ डिग्री बर्न
ह्या प्रकारच्या भाजण्यामधे फक्त त्वचेचेच बिघडणे मोडत नाही तर खूपच आत आत पर्यन्तच्या पेशी, रक्त वाहिन्या, हाडे, इथपर्यन्त भाजण्यामुळे खूपच जास्त इजा पोहोचते.
फोर्थ डिग्री बर्न सुद्धा थर्ड डिग्री बर्न सारखेच ट्रीट करावे. म्हणजे आपण घरी काहीही न करता पूर्णपणे पेशंटला डॉक्टरांवर सोपवावे.
जी माणसे भरभर खातात किंवा अन्न तोंडात असताना बोलतात त्यांना ठसका लागायची शक्यता असू शकते. त्या पेक्षा हळू आणि व्यवस्थित चर्वण करून जेवणा-यांमधे आणि अन्न तोंडात असताना कमी बोलणा-यांमधे ठसका लागायची शक्यता कमी असते.
मुलांना ठसका लागायची शक्यता जास्त असते का?
होय; कारण मुलांना नीट कसे जेवायचे, व्यवस्थित चावायचे कसे, ह्या गोष्टींची सवय व्हायला वेळ लागतो. किंवा त्यांना खेळणी किंवा नाण्यासारख्या वस्तू तोंडात घालायची सवय असते. त्यामुळेही ठसका लागू शकतो.
वयोवृद्ध माणसांना ठसका लागायची शक्यता जास्त असते का?
होय. कारण वयोवृद्ध व्यक्तींची लाळग्रंथी नेहमी कार्यरत असतेच असे नाही. आणि त्या उलट तरुणांची लाळग्रंथी खूपच चांगले काम करते.
अन्नचा ठसका लागण्यापासून बचाव कसा होतो?
घशातील पटजीभ (एपिग्लोटिस) ही श्वासनलिकेचे दरवाजे उघडण्या-मिटण्याचे काम करते. त्यामुळे अन्न हे फुफ्फुसात, श्वासनलिकेत, जाऊ शकत नाही, आणि अन्नाचा ठसका लागण्यापासून आपला बचाव होतो.
एखाद्या व्यक्तीला फीट/आकडी आली असता इतरांनी काय करावे...
- गडबडून जाण्यापेक्षा धीराने घ्या
- पेशंटच्या मानेखाली उशी किंवा हात ठेवा आणि त्याला कुशीवर वळवा.
- त्याचा चष्मा काढून ठेवा आणि कपडे थोडे सैल करा.
- दारं-खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू द्या.
- पेशंटच्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या.
- पेशंटच्या अवतीभवती गर्दी करू नका.
- पेशंटला पाणी पाजू नका. पाणी श्वासनलिकेत जाऊन पेशंट गुदमरू शकतो.
- कांदा चप्पल नाकाला लावू नये. तो पूर्णपणे गैर्समज आहे.
- फीटमुळे होणारी त्याच्या हाता पायाची थरथर जबरदश्तीने थांबवू नका.
पाण्यात बुडणे-नाकातोंडात पाणी जाणे, ह्यासाठी प्रथमोपचार काय आहेत?
पाण्यात पडलेल्या व्यक्तीला जेव्हा पाण्यातून बाहेर काढले जाते तेव्हा तेव्हा जर त्याचा श्वास अडकला असेल किंवा श्वास घ्यायला त्रास पडत असेल तर प्रथम त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातो. इतर काही दुस-या प्रकारे श्वास देण्यापेक्षा तोंडावाटे हवा भरणे हा सर्वमान्य प्रकार आहे.
तोंडावाटे श्वास कसा देतात?
- पाण्यातून बाहेर काढलेल्या व्यक्तीला पालथे झोपवा. त्याच्या गळ्याभोवती, छातीपाशी किंवा कमरेपाशी काही घट्ट कपडे असतील तर ते सैल करा.
- हनुवटी वर उचला आणि वरच्या बाजूनी डोके जितके मागे करता येईल तितके करा. (असे करण्यामुळे श्वासनलिकेतून फुफ्फुसात जाणारा मार्ग मोकळा होतो.)
- अकृतीत दाखविल्याप्रमाणे तुमच्या बोटांच्या सहय्यने त्या व्यक्तीच्या नाकपुड्या बंद करा. म्हणजे श्वासनलिकेतून पाणी आत जाणे बंद होईल.
- तुमचे तोंड त्या व्यक्तीच्या तोंडावर दाबून ठेऊन जमेल तितक्या जोरात हवा आत सोडा.
- तुमचे तोंड बाजूला घेऊन त्या व्यक्तीला श्वास घेण्यास प्रयत्न करण्यासाठी आणि फुफ्फुसापर्यन्त हवा जाण्यासाठी मोकळी हवा मिळू द्या.
- असे दर ५ - ६ सेकंदांनी करा.
- त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास आणि ह्रदयाचे ठोके नीट सुरू होई पर्यन्त ही प्रक्रीया चालू ठेवा. ही प्रक्रीया कधी कधी पाच मिनिटात संपू शकते, तर कधी कधी त्याला एक तास सुद्धा जाऊ शकतो.
- हे करण्यानी तुम्ही दमून जाल तेव्हा तिस-या व्यक्तीची मदत घ्या.
- त्या व्यक्तीच्या घशात किंवा तोंडात पाणी गेले आहे असे आपल्याला आढळल्यास त्याला कुशीवर वळवावे आणि पाणी तोंडावाटे बाहेर जाईल असे बघावे.
- त्या व्यक्तीचे तोंड फडक्याने आतून पुसून घ्यावे. (शुद्ध हरपलेली व्यक्ती कधीच चावत नाही.)
- जर तुम्ही तोंडाला तोंड लावून पाणी काढण्यास तयार नसाल तर दोन तोंडांच्या मधे रुमाल ठेवा. परंतु ही प्रक्रीया तोंडाला तोंड लावून पाणी काढण्याइतकी प्रभावी नक्कीच नाही.
- जेव्हा तुमच्या खात्रीने लक्षात येईल की ती व्यक्ती थोडा थोडा श्वास घ्यायला लागली आहे, आणि ह्रदयाचे ठोके सुद्धा नीट ऐकू येत आहेत तेव्हाच कृत्रीम श्वासोच्छ्वास बंद करा. तसेच छातीच्या डाव्याबाजूला कान लाऊन व्यवस्थित ठोके ऐका.
- पाण्यातून बाहेर काढलेली व्यक्ती आता जर ठीक झाली असेल तर त्याला ऊबेत ठेवा. गार हवा लागू देऊ नका. डॉक्टर येईपर्यन्त, निदान अर्ध्या तासापुरते - हलू देऊ नका.
विजेच्या झटक्यासाठी कोणते प्रथमोपचार घ्यावेत?
ज्या माणसाला शॉक बसला आहे तो जर अजूनही विजेच्या संपर्कात असेल तर त्याला अजिबात स्पर्श करायला जाऊ नका. असे केल्यास तुमच्यावर आणि शॉक बसलेल्या माणसावरसुद्धा मृत्यू ओढवू शकतो. शॉक बसलेल्या माणसाला विजेपासून त्वरीत दूर करणे अत्यावश्यक असते. पण हे दूर करणे त्या व्यक्तीला खेचण्यापेक्षा ती वायर कापून टाकून, किंवा विद्युत प्रवाह बंद करून करावे. तसे करणे शक्य नसेल तर एका जाड आणि पूर्ण कोरड्या दोरखंडाच्या सहय्याने त्या व्यक्तीला ओढून घ्यावे, आणि कु-हाडीच्या सहय्याने वायर कापून त्याला विजेपासून वेगळे करावे. कु-हाडीचा लाकडी दांडा कोरडा असल्याची खात्री करून घ्या.
बाहेरील कण (फॉरिन बॉडीज) शरिरात जाणे
फ्रॅक्चर होणे / सांधा निखळणे
डोळ्यात रक्त साकळणे
ह्रुदयाचा झटका
मोठी जखम
वीषबाधा
रेडिएशन एक्स्पोजर
गुदमरणे