Print
Hits: 8859

फक्त दोनच शब्दात सार अगदी सहज सांगता येण शक्य आहे. ते म्हणजे, ‘जनस्वास्थ्य टिकवण्यासाठी ! जनस्वास्थ्य टिकवण्यासाठी शाकाहाराचा पुरस्कार करणे हे श्रेयस्कर आहे. जगाची लोकसंख्या १२ ऑक्टोबर ९९ रोजी ६०० कोटीचा आकडा ओलांडणारा आहे. दरवर्षी ७.६ कोटीची त्यात गेली बारा वर्षे वाढ होत गेली आहे.

भारताची लोकसंख्या १९४७ साली ३५ कोटी होती. आज ती ९३ कोटी आहे. शेती करणे,धान्ये पिकवणे, लागवड करणे या सर्वांचा मानवी वापर सुरू होऊन दहा हजार वर्षाचा काळ लोटला आहे. पण अवाजवी पध्दतीत लोकसंख्या वाढूनही, गेल्या दशकात धान्याचा तुटवडा ना सार्‍या जगात, ना भारतात जाणवलेले आढळतो. कधी कुटे तुटवडा पडला तर त्याचे कारण वाहतुकीमध्ये येणारे अडथळे एवढेच असते. धान्याची नासाडी, चुकीची साठवणूक, उंदीर घुशीची भर लक्षात घेतली तर साया मानवजातीला पुरून उरेल एवढे धान्य आजही पिकत आहे. धान्य अपुरे म्हणून मांसाहार करणार्‍यांना तो करू देत असे म्हणणे किती चुकीचे आहे. यावरून लक्षात येईल.

भारताची लोकसंख्या १९४७ साली ३५ कोटी होती. आज ती ९३ कोटी आहे. शेती करणे,धान्ये पिकवणे, लागवड करणे या सर्वांचा मानवी वापर सुरू होऊन दहा हजार वर्षाचा काळ लोटला आहे. पण अवाजवी पध्दतीत लोकसंख्या वाढूनही, गेल्या दशकात धान्याचा तुटवडा ना सार्‍या जगात, ना भारतात जाणवलेले आढळतो. कधी कुटे तुटवडा पडला तर त्याचे कारण वाहतुकीमध्ये येणारे अडथळे एवढेच असते. धान्याची नासाडी, चुकीची साठवणूक, उंदीर घुशीची भर लक्षात घेतली तर साया मानवजातीला पुरून उरेल एवढे धान्य आजही पिकत आहे. धान्य अपुरे म्हणून मांसाहार करणार्‍यांना तो करू देत असे म्हणणे किती चुकीचे आहे. यावरून लक्षात येईल.

उत्तम मांसाची पैदास करण्यासाठी गुरे, डुकरे, कोंबड्या, यांना मका, राई, ओट ही धान्येच खायला घातली जातात. एक किलो मांस तयार होण्यासाठी किमान पाच किलो धान्य हे पशू खातात. एक किलो मांस पाच जणांच्या कुटुंबाला एकावेळी लागते तरच त्यांचे पोट भरते. याउलट पाच किलो धान्य वापरून पाच माणसाचे कुटुंब आठवडाभर सहज गुजराण करू शकते. याही साध्या गणितावरून पैदाशीनंतर कत्तल करणे तोट्याचे आहे हे लक्षात येईल, मांसाहारी प्राणी स्वत:चा आहार स्वत: शोधतो, स्वत: हत्या करतो व नैसर्गिक रीत्या तो खातो, मनुष्य हाच प्राणी त्याला अपवाद आहे. मांसाहार वगळता शाकाहारातील कित्येक पदार्थ नैसर्गिक रीत्या आजही मानव घेतच आहे. एवढेच नव्हे तर अजिबात न शिजवता, भाजता, उकडता वा कोणतीही प्रक्रिया न करता निव्वळ नैसर्गिकरीत्या उपलब्धीवर अवलंबून शाकाहार करून मनुष्य अत्यंत निरोगी दीर्घायुष्य जगू शकतो.

मनुष्य प्राणी मात्र विविध प्राण्यांची कोणाकडून तरी हत्या करून घेतो. कारण ती होताना त्याला पाहवत नाही. प्राणी मारताना पाहिला तर तो खाववत नाही. हा अनुभव भलेभले मांसाहारी अगदी चवीने(?) वर्णन करून सांगतात. अस्सल शेतकरी घरची कोंबडी स्वत: खात नाही तर ती बाजारात विकतो. यानंतरचा भाग म्हणजे सोलणे, व नको त्या गोष्टींची म्हणजे हाडे, कातडी पिसे, रक्त, यांची विल्हेवाट लावणे, यामुळे होणारे प्रदुषण, माशा, कावळे इ. चा उपद्रव.

उत्तमात उत्तम शास्त्रीय पध्दतीने चालणार्‍या स्वच्छ खाटीक खान्याला एक किलो मांस प्रक्रिया करण्यासाठी पाच लिटर पाणी लागते. याउलट भारतासारख्या, प्यायचे पाणी सुध्दा मैलोनमैल चालून आणाव्या लागणार्‍या देशात ही पाण्याचे ‘नासाडी’ चालवून घ्यायची का शाकाहाराकडे वळायचे हा प्रश्न ओघानेच येतो.

हत्या दुसर्‍याकडून करवून घेतली. प्रक्रियेत पाण्याची नासाडी केली. प्रदूषण तर झालेच. पण यानंतर मांस, शिजवणे, भाजणे वा टिकवणे, यासाठी शाकाहारापेक्षा कितीतरी जास्त इंधन लागते. कोणताही मांसाहारी पदार्थ किमान चाळीस ते पन्नास मिनिटे शिजवावाच लागतो, हे इथे लक्षात घ्यावे लक्षात घ्यावे. इंधनाची छोट्या गावातील अडचण ज्यांना माहिती आहे. लाकूड फाटा मिळणे दुरापास्त होत आहे.

गॅस, रॉकलेची टंचाई, वरचेवर जिथे जाणवते त्यांनी याचाही विचार करणे गरजेचे ठरते. मास टिकवणासाठी फ्रीज वा अतिशीत गृहाची गरज लागते. भारतातील विजेची टंचाई व वीजेचा लपंडाव याबद्दल कोणीही नव्याने बोलण्याची गरजच नाही. वीजेची बिले पाहून श्रीमंतांचेही डोळे हल्ली फिरू लागले आहेत. मग मांस प्रक्रियेनंतर त्याची साठवण, वाहतूक, इ. किती महागड्या आहेत याची नोंद जरूर घ्यावी. भारतातील हवामान पाहता नैसर्गिकरित्या कोणतेही मांस वा तयार पदार्थ हा आठ तासांपेक्षा जास्त टिकूच शकत नाही. तो लगेच खराब होतो हे महत्वाचे कारण ठरते.

मानवी शरीररचना ही शाकाहारासच पोषक आहे. मांसाहारी प्राण्यांचे तोंड खूपच मोठे असते. त्यांचे सुळे अणकुचीदार असतात. तो अन्न चावून खात नाही तर गिळण्याजोगे लचके तोडतो व ते तो गिळतो. हे गिळलेले तुकडे पचवण्याइतके त्याचे जाठरस तीव्र असतात. मांजर वा कुत्रे मांस खाताना कोणीही ही गोष्ट सहज पाहू शकतो वा कुत्रे मांस खाताना कोणीही ही गोष्ट सहज पाहू शकतो. वाघ वा सिंहाचे संपूर्ण जेवण जेमतेम वीस मिनीटात संपते. चारशे पौंडाचा वाघ चाळीस पौंड मांस जेमतेम पंधरावीस मिनीटात खातो व त्यानंतर तो दोन तीन दिवस तरी खायला तोंड उघडत नाही. याउलट सकाळी कितीही जेवलेला मनुष्य संध्याकाळ झाली की तोंडात टाकायला काहीतरी शोधायला लागतो. याचाच अर्थ शरीररचनेतील फरक मूलभूत स्वरूपाचाच आहे.

कोणत्याही हत्याराशिवाय मानव हत्या करूच शकत नाही. कोणत्याही साधनाशिवाय मानव मांसाहार करूच शकत नाही. त्याला चाकू, सुरे, धारदार वस्तूंची मदत घ्यावी लागते. मांसाहारी प्राण्याला या कशाचीही गरज भासत नाही. अती मांसाहार करण्यामुळे मानवी शरीरात अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो हे गेल्या पन्नास वर्षात शास्त्रशुध्द दृष्ट्या सिध्द झालेले आहे.