Print
Hits: 18081

शरीरात जेव्हा चरबीचा जास्त साठा होतो त्यावेळी व्यक्ती लठ्‍ठ होते, आवश्यक वजनापेक्षा २० टक्‍के जास्त वजन झाले म्हणजे लठ्‍ठपणा दिसतो. लठ्‍ठपणामुळे ऍनजेना, कॉरोनरी, थ्रंबॉयसीस, हृदयरोग, डायबेटीस. संधीवात असे रोग होतात.

लठ्‍ठपणाची कारणे
शरीराचे वजन वाढणे, चरबीची वाढ होणे, कमरेमधल्या चरबीत वाढ. वजन कमी करण्यासाठी औषधांचा काहीही उपयोग होत नाही. ऍम्फेटामाईन, ड्युरेटीक्स, परगेटीव्ह, अशा सारखी भूक कमी करणारी औषधे हानीकारक असतात.

एकदम आहारात घट करणे हे सुध्दा सर्वसाधारणपणे योग्य नसते. अगदी आवश्यक असेल तरच आहारात एकदम घट करणे आवश्यक असते. अशा वेळीसुध्दा शरीराच्या वजनावर लक्ष ठेवणे आवश्यक असते.

लठ्‍ठपणावर उपाय
आहारात घट आणि व्यायाम याशिवाय लठ्‍ठपणा कमी करण्यासाठी पर्याय नाही. पिष्टमय पदार्थात घट, चरबी, युक्त आहारात घट, योग्य प्रमाणात प्रथिन, जीवनसत्व, व खनिज, तंतूमय आहार, व भरपूर द्रवयुक्त पदार्थ असा आहार आवश्यक असतो. त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात व्यायाम, जरूरी असतो. डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणेच आहार व व्यायाम करणे योग्य. लठ्‍ठपणाच्या प्रमाणात वजन कमी करण्याचे प्रमाण ठरवावे. दर महिन्याला साधारणपणे २ ते ३ किलो वजन कमी करणे योग्य असते. त्यामुळे इतरही शारीरिक तोटे होत नाहीत. दिवसाच्या आवश्यकेतेपेक्षा ५०० उष्मांक कमी असणार्‍या आहाराचे सेवन केल्यास दर महिन्याला २ किलो वजन कमी होते.