Print
Hits: 11747

आहाराचं महत्त्व नव्यानं कुणी सांगायला नको! चरक या भिषग्वर्यांनी कैक वर्षापूर्वी आहाराचं महत्त्व प्रतिपादन करून ठेवलं आहे. कांदा वा इतर मसाल्याचे पदार्थ तामसी असतात. वगैरे म्हटलं जातं तेसुध्दा मानवप्राण्याला तसा अनुभव आला असेल म्हणूनच ना?

लढाईत सीमेवर लढणार्‍या जवानानं मद्यप्राश केलं तर कुणीही आक्षेप घेत नाही...... एखाद्या मुलाखतीला जाणार्‍या उमेदवाराला पूर्वी म्हणे सांगत असत ‘ब्रॅन्डीचा एक पेग घे!... रंगमंचावर पाऊल ठेवणारा नट ‘मद्याचा एखादा घोट’ पोटात ढकलूनच येतो पैसे किंवा भाषण झोडायला येणारा नवाशिका वक्ताही इतरांच्या सांगण्यामुळे- एक टूंक मारून येतो. हे सर्व कशासाठी? मनात उद्‌भवलेली वादळं शमविण्यासाठी मेंदूला शांत करण्यासाठी हे मद्यसेवन होत असतं!

मानसिक ताणतणाव हे आजच्या मानवी संस्कृतीचे अविभाज्य घटक बनून राहीले आहेत. पूर्वीचं ठीक होतं हो त्यावेळी मानवाला कपड्यालत्याची गरज नव्हती..... तो नंगा फिरायचा! त्याचं घरही एका गुहेत होतं आणि निसर्गदत्त आहारावर तो त्याची गुजराण करीत होता. पण मानवप्राण्यानं स्वत:चा विकास साधण्याचा प्रयत्‍न सुरू केला.

प्रगति-विकास-आधुनिकता अशी अनेक गोड नावं त्यानं चिटकवली आणि त्यासाठी तो रात्रंदिन झगडू लागला. यातून आधुनिक मानव निर्माण झाला. मानवाचा मेंदू नेहमीच सृजनशील! आधुनिकतेत आणखीन नवी आधुनिकता कशी आणता येईल या विचारानं तो आज झपाटलेला आहे. परंतु या सर्वाधुनिकतेच्या अंगाला लागूनच काही समस्या उद्‍भवल्या आहेत. दिवसेंदिवस आधुनिकतेच्या शोधाबरोबरच नवनव्या समस्या त्यानं चिकटवून घेतल्या आहेत. या अनेक समस्यांच्या यादीतली एक अग्रेसर समस्या म्हणजे चिंता!

हि चिंता सर्वांच्या पाचवीला पूजलेली असते. कुणाचं ‘पोट’ हातावर असतं. त्याला आजच्या ‘भाकरी’ची चिंता असते.. थोडं फार अर्थार्जन करणार्‍या मध्यमवर्गीय जिवनक्रमात प्रवेश करण्याचं जीव घेणं आकर्षण असतं. पण ते जमवता ही मंडळी बिचारी मेटाकुटीस येतात. श्रीमंताचं तर वेगळंच, अमाप समव्यावसायिकांशी स्पर्धा कशी करायची, येनकेन प्रकारे अमाप पैसा कसा कमवायचा ... शेअर बाजाराचे निर्देशांक बिचार्‍यांचे जीवन निर्देशांक चढाउतार करीत असतात. एकूण काय संघर्षमय, स्पर्धामय, तणावपूर्ण तथाकथित आधुनिक जीवनपध्दती सर्वत्रच नांदते आहे! पण याची तमा कुणाला? या ताणतणावांनी शरीराच्या चिंधड्या उडतात त्याचं काय योगासनासाठी डोळे मिटायचे आणि ‘आज कोणते शेअर विकत घ्यायचे याचा विचार करायचा ! असो ! यालाच आजचं यशस्वी जीवन म्हणतात!

मानसिक तणावावर इतरही अनेक उपाय शोधण्याची खटपट मानवाने अव्याहतपणे चालवली आहेच! त्यातला एक उपाय म्हणजे आहार! आहार सेवन ही माणसाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. बर्‍याच आहारापायी अनेक रोगांचा उद्‍भव होतो हे दर्शवून दाखविण्याचा प्रयत्‍न नेहमीच आहार पोषण तज्ञांकडून केला जातो. म्हणूनच लोणी, तूप खाऊ नका तळलेले पदार्थ टाळा. मुतखडावाल्यांनी टोमॅटो सेवन टाळावं!

मांसाहार-मत्स्याहार केल्यानंतर दूध पिऊ नका. सांधेदुखीवाल्यांनी आंबट पदार्थ खाऊ नयेत. अशा प्रकारचे अनेक सल्ले दिले जातात. कधी कधी हे सल्ले उलटसूलटच असतात ! उदाहरणार्थ खोबरेल तेल वर्ज्य असं एकेकाळी ठणकावून सांगणारी संशोधक मंडळी आज सांगतात, ‘खोबरेल तेल मुळीच वाईट्‍ट नाही हो !’ हे सर्व ध्यानी घेऊनच आहाराचा उपयोग उपचारासाठी करता येईल का याचा वेध शास्त्रज्ञ आज काल घेत आहेत. उदाहरणार्थ मेदाचं प्रमाण अधिक असलेल्या आहाराचं सेवन केलं तर शरीरात किटोनमयता प्रमाण (एक प्रकारची रक्त आम्लता !) निर्माण होते. आणि लहान मुलांच्या काही विवक्षीत प्रकारातील अपस्मारावर ही किटोनमयता उपकारक ठरते ! अर्थात आहाराचा औषधीवापर संशोधकांनी कधीच सुरू केला आहे.ताणतणावातून जन्मास येते चिंता ! काळाजी वाटणं यासारखी चिंतेची अपत्यं प्रत्येक मानवाला कधी ना कधी बेजार करीत असतातच. पण ही चिंता बर्‍याचदा तात्पुरत्या स्वरूपाची असते. परंतु काहीच्या बाबतीत मात्र ही चिंता पाठच सोडीत नाही ! सावलीसारखी ती व्यक्तींच्या मागं चिकटलेलीच असते. अशावेळी मात्र ही समस्या वैद्यकीय क्षेत्रात अंतर्भुत होऊ लागते. अनेक साध्यासुध्या घरगुती उपायांनी चिंता दूर होत नाही!

उदाहरणार्थ साखर घालून गोड बनविलेले दूध प्यायलं तर चिंता दूर होण्यास मदत होते असा बर्‍याच जणांचा स्वानुभव आहे. दुधामध्ये ‘ट्रिप्टोफॅन’ मुळं ‘सॅरोटिनिन’ नामक एक रसायन तयार होते. ‘सॅरोटिनिन’ रक्तप्रवाहात फिरू लागलं की मनःशांती प्राप्त होते ! झोप यावी म्हणूनही या गोडावलेल्या दुधाचा वापर काहीजण करतात ! असा उपाय कुचकामी ठरला तर मात्र डॉक्टरी इलाजासाठी जाणं प्रसंगी मनोविकारतज्ञांकडे जाणं क्रमप्राप्त !

दैनंदिन मानवी जीवन सुरळीत कधीच नसतं. कधीकधी मग एकाएकी चिंतेने ग्रासून जातं. तर कधी कधी भिती मनास दडपून टाकते. अर्थात यात नवं ते काय ? हे सर्व मानवी स्वभावालाच अनुसरून असतं. असं काही घडलं नाही तरी मानव प्राण्याला कंटाळा येतो. मग तो म्हणतो, काय बुवा? फारच संथपणं चाललंय आयुष्य ! बोअर झालो बुवा ! चिंता, भिती वा अस्वच्छता यांच दुष्टचक्र सततंच चालू राहीलं तर मात्र हे काहीतरी वेगळं घडत आहे हे ध्यानी घ्यावं ! यासाठी डॉक्टरांकडे जायलाही हरकत नाही ! काही लोकं तर एखाद्या डॉक्टरपर्यंत जरूर जातील पण मानसशास्त्रज्ञाकडं कधीच नाही. मला काय वेड लागलंय कां ? असा त्यांचा प्रश्न असेल. परतू मानसशास्त्रज्ञच याबाबतीत अतीव मदत करू शकतो हे कैक जणांना माहित नसतं. म्हणूनच हा प्रश्न म्हणजे मागासलेपणांच लक्षण आहे असं समजलं जावं !

चिंता, भिती वगैरे प्रकार मानसशास्त्रात ‘चिंतावस्था’ (ऍन्क्झायटी स्टेट) म्हणून ओळखला जातो हा एक प्रकारचा मनोविकार असला तरी याची लक्षणं मात्र शारीरीक तक्रारींच्या स्वरूपात उमटतात. या मानसिक अवस्थेवर मात करण्यासाठी ‘खास आहार’ घेतल्यास बराच फायदा मिळतो असं बरीच डॉक्टर मंडळी आज काल सांगू लागली आहेत. या अवस्थेतील बरीच लक्षणं कमी करणंच काय पण घालवणं देखील सहज शक्य होतं. असा काही वैद्यक व्यवसायीकांचा दावा आहे.

तोंड सुकणं, कोरडं पडणं, घाम फुटणं, श्वास/ धाप लागणं, छाती धडधडणं, डोक गरगरणं, डोळे भिरभिरणं, छातीत दुखणं, हगवणीचा वारंवार त्रास होणे , थकवा जाणवणं.... यासारखी शारीरीक लक्षणं, चिंतावस्थेत गुरफटलेल्या व्यक्तींना जाणवतात. सतत चिंता जडण्यापायी मानवाची रोग प्रतिकार शक्ती ही कमी होऊ शकते. परिणामी जंतूनिर्मित रोग वारंवार त्या व्यक्तींना छळू लागातात. चिंतेपायी भूक मरते हे तर सर्वज्ञातच आहे. यापायी‘ जेवण चुकविण्याचे’ प्रसंग वारंवार घडू लागतात यापायी व्यकींचे वजन घटते. पुरेसा आहार पोषण न झाल्यामुळे जीवनसत्व- न्यूनता. प्रथिन न्यूनता यासारखे अनेक न्यूनता जन्य विकारांना निमंत्रण मिळते. या न्यूनतांपायीही चिंतेचा जन्म होत असतो. उदा. आहारातून पुरेसे बी-६ हे जीवनसत्व किंवा मॅग्नेशिअम (खनिज पदार्थ) पोटात गेलं नाहीतर चिंता आणखीनच ‘गहरी ’ बनते! मानसिक तणाव निर्माण झाला असतां शरीरातील ‘ सी’ जीवनसत्व न्यूनतेपायी‘ हिरड्यातून रक्त वाहण्यापासून’ ते स्कर्व्ही नामक रोगापर्यंत कसलाही विकार शरीराला जडू शकतो हे ध्यानी घेऊन चिंतावस्थेच्या गुंतवळ्यात अडकून पडलेल्यांनी ‘सी जीवनसत्वाचे सेवन करणे अत्यावश्यक ठरते.

कॉफी, चहा, काही कोला पेये, गडद रंगाचे चॉकलेट यासर्व अन्न पदार्थात कॅफीन नामक उत्तेजक पदार्थ असतो या पेयांचे माफक सेवन केल्याने तजेला जरूर वाटतो परिणामी शरीराची/ मनाची कामही उत्तमरीत्या घडू शकतात. हा उत्तेजक परिणाम प्राप्त करून घेण्याची सवय काही चिंता व्यथित माणसे लावून घेतात.

चिंतेवर इलाज म्हणून उत्तीजक पेयांचे सेवन केल्यानुळं क्षौभक प्रवृत्ती(ऍजीटेशन) वाढते. कॅफिनला चटकन बळी पडणारी संवेदी/ सेस्नीटीव्ह व्यक्ती असली तर मग विचारायलाच नको! ही क्षोभता आणखीनच पेटून उठते! चिंता हरण करण्यासाठी काही चिंता अस्वस्थ माणसं मद्यपानाकडं वळतात! हे तर आणखीनच आत्मघातकी! यामुळेच चिंतेचे स्वरूप अघोया चिंतेत बनून जाईल! अल्कोहोल(मद्य/ दारू) हे एक उत्तेजक पेयं आहे असा गैरसमज सर्वत्र पसरलेला आहे. अल्कोहोल अधिक शामकता / दमन घडवून आणतो असं सिध्द झालं आहे. मद्य सेस्वनानंतर ६-१२ तास लोटतात तेव्हा रक्तातील साखर पातळ्या (ब्लड- शुगर) खाली गेलेल्या असतात अशावेळी चिंता अवस्थेचे झटके प्रमाणात ग्रासू शकतात.अंडी, मांस, चीज, दाणे, हिरव्या भाज्या, संत्री, मोसंबी, आंबा यासारख्या अन्न पदार्थाचा अंतर्भाव चिंता पिडीतांच्या आहारात असावा. दमा आणि चिंता यांचा फारच जवळ चा संबंध आहे. हे तर सर्वज्ञातच आहे. तजेला प्राप्त करवून घेण्यासाठी कॉफीपानाचा मार्ग काही मंडळी अनुसरतात. परंतु दमेकर्‍यावर चालू असलेल्या औषधांमध्ये थिओफायलीन नामक औषध असते अशा दमेकयांनी ‘स्ट्रॉग’ कॉफीचे दोन कप वारंवार घ्यायला सुरवात केले की थिओफायलीन आणि कॅफिन यांचा संयुक्त दुष्परिणाम होऊ शकतो, आणि विशाक्ततेचे (टॉक्सिसीटी) लक्षणं उद्‌भवू शकतात!

मानसिक दडपण आणि दमा यांचा सर्वमान्य संबंधातील ही एक आहाराची बाजू. माणसाचा रक्तदाब वाढण्याचं एक कारण म्हणजे मानसिक तणाव! मानसिक तणाव कमी करण्यासाठी नेहमीच ( वर सांगितलले) सर्व उपाय योजणं आलंच!

पण मन:शांती प्राप्त करवून घेण्यासाठी थोडं- फार मद्य घावं असं सांगितलं जातं! रोज मद्याचे एक दोन पेले घ्या आणि हृदयविकारांना टाळा! असंही बर्‍याचदा वैद्यकीय साहित्यात प्रसृत केलं जातं! पण यातून व्यसनाधिनता निर्माण होऊ शकते त्यांच काय? खरं पाहता अतिरीक्त मद्यपान थांबवलं की रक्तदाब खाली उतरू लागतो. हा बर्‍याच वैद्यक व्यावसायिकांचा अनुभव आहे! तरी मानसिक तणाव कमी करण्यासाठी ‘मद्य’ हा ‘दवा’ नव्हे हे संबंधितांनी जरूर ध्यान ठेवावं!

तरूण वयातील मुली वा तरूणी एकाएकी खाणं पिणं कमी करतात. ‘कधीकधी काहीच कसलाच आहार पोटात जात नाही’. अशी अवस्था निर्माण होते. अर्थात हा विकार तरूणांमध्ये/ पुरूषांमध्ये उद्‌भवतच नाही असे मात्र होत नाही. या विकाराला चेतनीक्षुधानाश ऍनोरेक्झिया नर्व्हेसा असं शास्त्रात म्हणतात. अशा प्रकारं क्षुधानाशग्रस्त दहा व्यक्तिंपैकी एक पुरूष/ तरूण असू शकतो. याचाच अर्थ विकाराचं ९० टक्के प्रमाण स्त्री वर्गातच प्रामुख्यानं आढळून येतं. मनोव्यापारांचा परिणाम म्हणून हा मानसिक विकार उद्‌भवतो. इतरांमध्ये न मिसळणं

वर्गामध्ये/ कार्यालयांमध्ये, चर्चेमध्ये नेहमीच मागं राहणं! स्वत: म्हणजे काय ‘किस झाडकी पत्ती’ असं सतत मानणं! परिणामी कुठंही धडाधडीनं पुढं पुढं न वावरणं! या सर्वांचा परिणाम असा होतो की भूक हीच एक लक्ष्य बनविली जाते. भूकेला मागं सारण्याचे प्रवृत्ती या व्यक्तींमध्ये रूजू लागते. दौनंदिन जीवनक्रमातील खर्‍या खोट्या समस्यांवर मात करण्यासाठी या चेतनी क्षुधांवाशी अन्न नाकारण्याचा पत्कर स्विकारला जातो.

चेतनी क्षुधानाश उद्‌भवला असता दृग्गोचर होणारी लक्षणं सहजगत्या कुणालाही ध्यानी येण्याजोगी आहेत! माणूस स्वत:मध्ये झुरत राहिलाय असं क्षुधानाशीच्या आसपासच्या लोकांना जाणवत असतं. अग बारीक- लुकडी काय होत चाललीस आज काल लोकं म्हणू लागतात. क्षुधानाशींना पूर्वी निट (फिट्‍ट) बसणारे कपडे हल्ली सैल होतात हे त्यांच्या व त्यांच्या समवेत असलेल्यांच्या सहज ध्यानी येते. बर्‍याचदा ही माणसं जेवायला बसतात आणी ताटातलं अन्न नुसतं चिवडूनच ती जेवणावरून उठतात ही एक चिंतनीय बाब होय. या विकारानं आजारलेल्या व्यक्तीपैकी बहुतांश व्यक्ती पौगंडावस्थेतील असतात या अवस्थेत लहान मुलांच्या शरीराचं रूपांतर प्रौढ पुरूषांमध्ये किंवा प्रौढ स्त्रीमध्ये होत असतं. यासाठी शारीरीक वाढ होत असते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही संप्रेरकांची (हामोन्स) निर्मिती अधिक प्रमाणात होऊ लागलेली असते यासर्व विकास प्रक्रियेसाठी सकस- समतोल आहाराची नितांत आवश्यकता असते.

ही गरज ओळखूनच या वयातील मुला-मुलींना सपाटून भूकही लागत असतो. परंतु या कार्यपध्दतीला खोडा घालण्याचे काम चेतनी क्षुधानाश करू लागतो. यापायी भूक मेल्या कारणानं अथवा अन्नाकडं पाठ फिरविण्याचाच धर्म पाळला जात असल्यानं य“) पौंगडांच्या शरीरात जात नाहीत. यापायी मुला- मुलींची नीट प्रकाराने वाढ होत नाहे.

खरं पाहता वयात येणार्‍या पौगंड अवस्थेतील मुलां च्या आहारातून भरपूर प्रथिने जायला हवीत. प्रथिनं म्हणञ शरीर विकास अवस्थेपायी आवश्यक ठरणारं अन्न पुरेशा प्रमाणात जात नाही. परिणामी शरीराची अक्षरश: उपासमार सुरू होते. आवश्यक तितकी ऊर्जा (शक्ती) मिळत नाही. तसेच पुरेशी जीवनसत्वं (व्हिटॅमिन्े शरीर रचनेसाठी/ शरीर बांधणीसाठी आवश्यक ठरणार्‍या विटाच! पालेभाज्या मार्फत जीवनसत्वाचा भरपूर पुरवठा होतो. क्षाराचं महत्व किती आहे हे नव्या ने सांगायाला नको. साखर मीठाचं पाणी, हगवाणीपायी जलहास झालेल्यांना आपण पाजतोच की! हे क्षार शरीरातील अनेक क्रिया -प्रक्रियांना हातभार लावीत असतात. फळांमधून जीवनसत्व- लोह वा अनेक सूक्ष्म - पोषंक (मायक्रोन्युट्रिअन्टस्‌) उपलब्ध होत असतात. या वयात भात- बटाट्यासारखी पिष्टमय पदार्थ शरीरास उपलब्ध होणं अतिमहत्वाचं ठरतं! पण अक्षरश: दोन बिस्किटं खाऊन अथवा पावाचे तुकडे पोटात ढकलून जेवणाची/अन्य भूकेची वेळ निभावून नेणार्‍यांना पौंगडावस्थेतील तरूण- तरूणींना काय म्हणावं/ मानसिक तणावातून निर्माण झालेला हा चेतनी क्षुधानाश अशाप्रकारे पौगंडी शरीरव्यवस्थेचा ‘शिस्तबध्द’ नाश करीत असतो.

सडपातळ बांध्याऐवजी अगदी ‘कडकी- लुकडी’ शरीर ठेव म्हणजे सौदर्यांच लक्षण हे समीरकण या चेतनी क्षुधानाश - पिडितांच्या मनावर कोरलेले असतं. स्वत: फारच स्थूल आहोत असंच त्यांना वाटत असतं. खरं पाहता, त्याचं शारीरिक पोषण खालच्या पातळीवरून झालेलं असतं कधी कधी या अपपोषणानं अत्यंत धोक्याची पातळी गाठलेली असते तथापि ‘खाणंच कमी’ थोडफार खाल्लं तरी खाल्याखाल्याच बाथरूममध्ये/ संडासात जाऊन उलट्या करणं यासारखे प्रकार या मनोविकृत व्यक्तींकडून अनुसरले जातात. हे जमत नसेल तर रेचके रोज (परसाकडेच्या गोळ्या) घेऊन पोट ‘साफ’ करीत रहाण्याचा उपद्‌व्याप ही मंडळी करू लागतात.