प्रवासाला निघण्यापूर्वी सुकामेवा, तयार पॅक्ड बिस्किट्स काजू, बदाम, फरसाण, चिवडा, शेव इत्यादी पदार्थ घ्यावेत. पण अधिक प्रमाणात सारखे खावू नयेत.
शक्यतो रात्रीचा प्रवास असल्यास सायंकाळी निघण्यापूर्वी भोजन घेवू नये. किंवा अल्पसा हलका आहार घ्यावा. तरी शक्यतो उपवास (लंघन ) करणे अधिक आरोग्य देणारे आहे.
ज्यांना बस किंवा रेल्वे प्रवासाची सवय नाही वा प्रवासात उलट्या होत असतील तर त्यांनी जेवण घेवूच नये. अन्यथा स्वत:ला त्रास व दुसर्यांना त्रास होईल अधिक दिवसांचा प्रवास असेल तर घरूनच ड्रायफ्रूटस् किंवा सिलबंद पॅकटेस् वापरावेत. ओले स्निग्ध पदार्थ, गोड पदार्थ सोबत घेवू नयेत. प्रवासात सहन होत नसेल अशांनी प्रवासात आल्हाददायक गरम पेय, थंड पेय, डाळिंब रस, संत्रा, रस, लिंबू मोसंबी रस अल्प आवश्यकते नुसार घ्यावेत व शक्यतो मागच्या बाजूला बसावे. जेणेकरून पटकन उतरता येईल, काही प्रवासी उलट्या होतात म्हणून माहित असूनही टच्च जेवण करून येतात. व उलट्या होऊ नये म्हणून उलटी दाबण्यासाठी औषधी गोळ्या घेतात. हे तर त्याहूनही हानीकारक व रोगकारक आहे. त्यामुळे नको असलेल खाद्य पदार्थ पेय शरीराबाहीर टाकू इच्छिते व आपण उलट त्यास पुन्हा आतमध्ये दाबतो. त्यामुळे त्यापासून होणारा पोषक रस हा दुष्ट होवून पुढील रक्त खराब होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे पुढे अनेक प्रकारचे रोग ही संभवतात.
प्रवासाला निघण्यापूर्वी
- Details
- Hits: 9257
2
पोषक पदार्थ आणि अन्न
आहार म्हणजे काय?
