Print
Hits: 8457

फक्त दोनच शब्दात सार अगदी सहज सांगता येण शक्य आहे. ते म्हणजे, ‘जनस्वास्थ्य टिकवण्यासाठी’ शाकाहाराचा पुरस्कार करणे हे श्रेयस्कर आहे. जगाची लोकसंख्या १२ ऑक्टोंबर ९९ रोजी ६०० कोटीचा आकडा ओलांडणारा आहे.

आधुनिक औषध पध्दत्तीबरोबरच जर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषध पध्दतींचाही अवलंब केला असता कितीतरी कर्करोग पीडीत रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत असे दिसून आले आहे. औषधांबरोबरच आहारही तेवढाच महत्वाचा. पथ्य पाळणे ही रोगाच्या दृष्टिने अत्यंत महत्वाची बाब आहे. योग्य आहार हा योग्य औषधा इतकाच उपयुक्त आहे.

कर्करोग व सुवर्ण
सोन्याचा उपयोग शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने फार पुर्वीपासूनच केलेला आढळतो. तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन सुवर्णाचा एखादा दागिना रात्रभर ठेवावा व सकाळी हे पाणी प्यावे. शरीरातील विषवत्‌ द्रव्ये सुवर्ण संस्कारीत जलाच्या सेवनाने बाहेर टाकली जातात. असे ग्रंथामध्ये वर्णन आहे.

कर्करोग व पोटॅशियम
शरीराला पोटॅशियमची अत्यंत जरूरी आहे. पोटॅशियम हा क्षार पेशींचे पोषण करतो. अन्नात पोटॅशियमचे प्रमाण कमी झाले तर वजनही कमी होते. हा एक उत्तम जंतुनाशक आहे. कॅन्सर या रोगात तो रोगनिवारक तसेच रोगप्रतिबंधंक कार्यही करतो. मेंदू व शरीर यांची कार्यक्षमता या क्षाराने वाढते. खालील आहारातून शरीराला पोटॅशियमचा पुरवठा होतो. सुकामेवा-मनुका, खजूर, जरदाळू, बदाम, खोबरे, अंजीर. फळ- अंजीर, संत्री, द्राक्षे, शहाळे. भाज्या- कोबी, फ्लॉवर, कोहळा, वाटाणा, भुईमूग, टोमॅटो, गाजर, काकडी, बीट, लिंबू. पालेभाज्या- मेथी, चाकवत. इतर- दुध, काकवी, उकडलेले अंडे, जोंधळा, मका.

कर्करोग व लोह
पेशीला प्राण्वायूचा योग्य पुरवठा त्यातील लोहामुळे होतो. शरीरास प्राणवायूचा मुबलक पुरवठा व्हावा लागतो, अन्यथा निरूत्साह, आळस, अशक्तपणा जाणवू लागतो. खालील आहारातून पोटॅशियम अधिक लोह मिळते. बेदाणे, करवंदे, जांभळे, कांदा, पालक, मुळा, गहू, जवस.

पालेभाज्या
कर्करोगाच्या प्रत्येक रूग्णांत सामान्यपणे बध्दकोष्ठता हे लक्षण दिसून येते. यासाठी पालेभाज्या खाणे आवश्यक आहे. तेला-तुपाचा उगीचच बाऊ न करता योग्य प्रमाणात आहारात त्याचाही उपयोग करायला हवा.

दूध
जेवणानंतर १ कपभर दूध घ्यावे. दूध हे पूर्णान्न आहे. मात्र दूध व फळे कधीही एकत्र करून खाऊ नयेत. हा विरूध्द आहार असल्याने व्याधी उत्पन्न करतो असे आयुर्वेदात सांगितले आहे.

चहा कॉफी
अतिप्रमाणात चहा कॉफी प्रशन केल्याने जठरातील अंतत्वचा भाजून निघते व त्यामुळे आम्लपित्त, पचनाच्या तक्रारी, अल्सर निर्माण होतात व याचे कर्करोगातही रूपांतर होण्याची शक्यता असते. अति चहापान अति कॉफीपान निषिध्द आहे.

मद्यपान
अति मद्यपान, धूम्रपान हे कधीही अहितकारकच. चहा, कॉफी, मद्यपान या तीनही गोष्टी वर्ज्य असणार्‍या मॉनेस्ट्री ऑफ ग्रँड ट्रापा मध्ये गेल्या अनेक वर्षात एकही कर्करोगाची केस आढळली नाही.

पाव बिस्किटे
ही पचायला कठीण असतात. तसेच जीवनसत्वांचाही त्यात अभाव असतो. तसेच मुक्तपणे केलेला बेकिंग पावडरचा उपयोग व्याधीकारक ठरतो. त्यामुळे पाव, बिस्किटे खाणे अयोग्यकारक.

तेलकट पदार्थ
शरीराला स्निग्ध्द पदार्थांची आवश्यकता असते. त्यामुळे तेला-तुपाचा योग्यप्रमाणात वापर हा हवाच. शरीररूपी या यंत्रात वंगण आवश्यकच. तेल तूप रूक्षपणा नाहीसा करते. याबरोबरच हिंग, जिरे, मोहरी, धने, हळद, हे पदार्थ सहाय्य करतात.

कडधान्यांमुळे शरीराला आवश्यक प्रथिनांची गरज पूर्ण केली जाते, त्यामुळे आहारात कडधान्यांचा वापर असावा दही हेही आहारातून वर्ज्य करावे. अतिमीठाचे सेवन कधीही अयोग्यच. मीठ ज्यांच्या आहारात नाही त्यांना कधीही कॅन्सर होत नाही. अति शिजवलेल्या पदार्थातून पोषकांशाचा नाश होतो, त्यामुळे शक्यतो कच्ची फळे, कच्च्या भाज्याच खाव्यात.

मांसाहार
अतिप्रमाणात मांसाहार करणार्‍या देशांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढलेले आहे. असे दिसून येते. मांसाहार करणार्‍यामध्ये बध्दकोष्टतेचे प्रमाणही जास्त असलेले आढळून येते. कर्करोगाच्या रूग्णाने मांसाहार वर्ज्य करणेच उत्तम.

शास्त्रीय दृष्टीने शरीर पोषक आहार, रात्री लवकर घेतलेली निद्रा, ‘लवकर उठे, लवकर निजे तया आरोग्यसंपत्ती लाभे’ हीच आरोग्याची गुरूकिल्ली असे म्हणता येईल.