Print
Hits: 19951

हर्निया ज्याला मराठीत ‘अंतर्गळ’ म्हटले जाते. हा एक गंभीर आजार आहे. एखादी व्यक्ती खेळताना किंवा जड वस्तू उचलताना तिच्या जांघेतील सूज सहजतेने दिसू शकते. पुरूषांच्या बाबतीत ही सूज वृषणकोशात उतरल्यास एक वृषण मोठे दिसते. यालाच वैद्यकिय भाषेत हर्निया असे म्हणतात.

ज्या वैद्यकिय तपासण्या करून घेण्यास लहान मुलांना आवडत नाही त्यात हर्नियाची तपासणी वरच्या स्थानावर आहे. यासाठी हुशार डॉक्टरांनी मुलांची शारिरिक तपासणी करताना हर्नियाबद्दल खुबीनी तपासणी करावी.

हर्नियाच्या सूजेकडे दुर्लक्ष झाल्यास ही सूज बास्केटबॉलच्या आकारापर्यंत वाढू शकते, हे कितीजणांना माहीत आहे का? काहीवेळेस शरीरातील इतर अवयवांवरील सुजेच्या बाबतीत डॉक्टरांकडून ‘हर्निया’ असा उल्लेख होत असला तरी सर्वसाधारणपणे जांघेतील सूजेला हर्निया म्हटले जाते. क्वचित प्रसंगी स्त्रियांनाही ‘हर्निया’ होऊ शकतो, परंतु स्त्रियांपेक्षा पुरूषांमध्ये या सूजेचे प्रमाण जास्त आहे.

जांघेतील हर्नियांचे दोन प्रकार आहेत.
पहिल्या प्रकारचा हर्निया घर्षण किंवा भेगेमुळे होतो. साधारण चाळीशी ओलांडल्यांनंतर उदराभोवतीच्या स्नायूंच्या आवरणावर एक क्षीण असा ठिपका निर्माण होतो. हळूहळू त्याचे छिद्रात रूपांतर होते. लहान आतड्यात एक पिशवीच्या आकाराचा फुगा तयार होतो. आतड्याच्या आतील नळीवर त्याचे धक्के बसतात.