Print
Hits: 12235

पुरूषांचे दु:ख
सामान्यपणे स्त्री व पुरूष आपले दु:ख एकाच पध्दतीने व्यक्त करत नाहीत. मृत्यू , घटस्फोट व आयुष्यातील इतर तोटे अशा कठीण प्रसंगी पुरूष वेगळ्या पध्दतीने दु:ख व्यक्त करतात.

मर्दानी विरूध्द महिलांचे दु:ख व्यक्त करण्याची पध्दती
कठीण प्रसंगातील स्त्रीचे वर्तन हे जसे अविशिष्ट मानले जाते, तसे ते प्रत्यक्षात नसते. उलट तेच खरे निकोप मानायला हवे. अशा प्रसंगातील पुरूषांचे वर्तन हे ठराविक मर्दानी पध्दती असते. तो. त्याचे दु:ख खाजगीत व्यक्त करतो. तथापि स्त्रिया मात्र त्यांचे दु:ख कुटुंबियांशी व मैत्रिणीसमोर बोलून, रडून व्यक्त करतात.

ज्यावेळेस स्त्री तिचे दु:ख व्यक्त करते व आपसात वाटू घेऊन भूतकाळाकडे पाहते. त्यावेळी पुरूष मात्र त्यासंबंधात बोलण्याचे वा भावना व्यक्त करण्याचे टाळतात, दु:खी असल्याचे नाकारतात.

पुरूषांना त्यांचे दु:ख व्यक्त करण्यास वाव दिला तर सुरवातीस ते खूप रागवतात, चीड व्यक्त करतात व नंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात्‌ स्त्रियांच्या बाबतीत ही प्रक्रिया उलट असते. त्या आधी रडतात व नंतर चीड व्यक्त करतात. काही वेळेस राग हा अविशिष्ट असतो. खोलवर दु:खात बुडालेले पुरूष आत्महत्येच्या प्रयात्‍नात यशस्वी होतात, परंतु स्त्रियांचा हा प्रयत्‍न फसतो.

दुःख व्यक्त करण्याची उपचार पध्दती
या उपचारपध्दतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात परिणामकारक ठरू शकेल याप्रकारे तिला आकार दिलेला असतो. बोलणे व भावना व्यक्त करणे हे बहुसंख्य पुरूषांच्या बाबतीत अवघड असते. पण दुसर्‍यांची मदत घेणे हे त्यांच्या स्वभावात बसत नाही. एकवेळ मुलं बास्केटबॉल खेळता खेळता बोलतील, पण ते एकमेकांच्या समोर बसून बोलणार नाहीत.

जेव्हा पुरूष बोलायला लागतात. तेव्हा ते स्त्रियांपेक्षा जास्त राग व्यक्त करण्यास उत्सुक असतात. काहीवेळेस ते दोघांबद्दल जास्त अपराधिक भावना व्यक्त करतात. त्या विशिष्ट परिस्थितीत त्याने आणखी काही करायला हवं होतं. परिस्थितीवर नियंत्रण करण शक्य होतं. हे कल्पना ठरीव पुरूषी पध्दतीची आहे. मात्र स्त्रियांचा असा विश्वास असतो की त्यांच्यासाठी ते शक्य नाही म्हणून मदतीच्या अपेक्षेने त्या अधिक तीव्र स्वरूपात भावना व्यक्त करतात.

संस्कारशास्त्र
संस्कारशास्त्र हा दैनंदीन जीवनातील असा भाग आहे, जो लोकांना एका मानसिक अवस्थेतून दुसऱ्या मानसिक अवस्थेत घेऊन जातो. हा नेहमीच पुरूषांच्या सुधारण प्रक्रियातील नाजूक भाग राहीलेला आहे. काहीवेळेस पुरूष त्यांचे दु:ख प्रतिकात्मक कृती म्हणजे खेळांच्या स्पर्धा चालू असताना खेळांसाठी वाहून घेणे किंवा एखाद्याच्या स्मृतीसाठी स्मारक उभारणे.

संमिश्र संकेत
दु:ख व्यक्त करताना पुरूषांना संमिश्र संकेत मिळतात, म्हणजे एखादे अपयश वाट्याला आले तर, अरे पुरूषासारखा पुरूष तू असं त्याला म्हटलं जात किंवा प्रौढावस्थेत आल्यानंतर हाच संकेत विरूध्द पध्दतीने मिळतो. याप्रकारे पुरूष ज्यावेळेस दु:ख व्यक्त करत नाही. त्यावेळेस त्याबद्दल त्याच्यावर टीका केली जाते व ज्यावेळेस ते दु:ख व्यक्त करतात त्यावेळेस त्याच्या मर्दपणाचे उदाहरण दिले जाते.

स्त्री- पुरूषांमधील शारिरिक भेद
स्त्री पुरूषांमधील शारिरिक भेद समजावून घेतल्यानंतर पुरूषांची दुःख व्यक्त करण्याची पध्दती समजू शकते. १२ व्या वर्षानंतर मानवी भावनाशी संबंधित असलेल्या शिर्खस्थ ग्रंथीत बदल होतो. हा बदल झाल्यानंतर मुले व मुलींच्या भवपातळीत बदल होतो. पुरूषांच्या बाबतीत मेंदुतील भावना व शब्द यांच्यातील संवेदनांच्या टोकाची जोडणी ही मंद गतीची असते. याचा अर्थ पुरूषांना भावना व्यक्त करण्यास अधिक वेळ लागतो. जेव्हा स्त्री व पुरूष दोघांनाही समजून येईल की पुरूषी व स्त्रीसुलभ भावना व्यक्त करण्याच्या बाजू वरील कारणामुळे भिन्न आहे. हे समजून घेतले तर कदाचित ते त्यांच्या जीवनाशी संबंधित दु:ख आपापल्या परीने व्यक्त करण्यास परवानगी देतील.