Print
Hits: 23831

काय करावे.

  1. आरोग्यकारक समतोल आहार घ्या, नियमित व्यायाम करा. आठवड्यातून किमान ३ वेळा तो कराच.
  2. थोडावेळ स्वत:साठी खर्च करा.
  3. विचारांची देवाणघेवाण करा.
  4. तुम्हाला रडावस वाटल तर अवश्य रडा ते आरोग्यास चांगले असते.
  5. रोज किमान ८ तास झोप घ्या.
  6. आरोग्याच्या प्रश्नाविषयी माहिती करून घ्या.
  7. तुमचे वय ४० पेक्षा कमी असेल तर वर्षातून किमान एकदा आरोग्याची तपासणी करून घ्या व४० शी ओलांडली असेल तर अधिकवेळा तपासणी करा.
  8. ध्यानधारणा करा. जे तुमच्या मन व शरीरासाठी आश्‍चर्यकारक बदल घडवून आणते.
  9. कृपाकरून निरोध वापरा.

करू नये असे.

  1. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा नशापान करू नका, थुंकू नका.
  2. मद्यधुंद अवस्थेत पार्टीच्या ठिकाणी गोंधळ घालू नका.
  3. विनाकारण कोणाशीही स्पर्धा करू नका. तुमची स्पर्धा तुमच्याशीच ठेवा. ज्यामुळे तुम्ही जीवनात यश मिळवाल.
  4. तुमच्या भावना लपवू नका, त्यातून ताण निर्माण होतात, ताण हा जीवाला घातक आहे.
  5. जेवण टाळण्याची सवय लावू नका. ते दीर्घकाळामध्ये नुकसानकारक ठरू शकते.
  6. नियमित नखे कापायला विसरू नका.
  7. अतिरीक्त मळलेले मोजे धुवायला टाकायला विसरू नका.
  8. त्वचेची निगा राखण्याकडे दुर्लक्ष करू नका. हा केवळ स्त्रियांचा प्रांत आहे असे समजू नका.
  9. सार्वजनिक ठिकाणी लघवी करू नका. ते आरोग्यास चांगले नाहीच पण शिष्टाचारासही धरून नाही.
  10. कृपाकरून सार्वजनिक ठिकाणी वेडावाकडा आवाज करू नका.