काय करावे.
- आरोग्यकारक समतोल आहार घ्या, नियमित व्यायाम करा. आठवड्यातून किमान ३ वेळा तो कराच.
- थोडावेळ स्वत:साठी खर्च करा.
- विचारांची देवाणघेवाण करा.
- तुम्हाला रडावस वाटल तर अवश्य रडा ते आरोग्यास चांगले असते.
- रोज किमान ८ तास झोप घ्या.
- आरोग्याच्या प्रश्नाविषयी माहिती करून घ्या.
- तुमचे वय ४० पेक्षा कमी असेल तर वर्षातून किमान एकदा आरोग्याची तपासणी करून घ्या व४० शी ओलांडली असेल तर अधिकवेळा तपासणी करा.
- ध्यानधारणा करा. जे तुमच्या मन व शरीरासाठी आश्चर्यकारक बदल घडवून आणते.
- कृपाकरून निरोध वापरा.
करू नये असे.
- सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा नशापान करू नका, थुंकू नका.
- मद्यधुंद अवस्थेत पार्टीच्या ठिकाणी गोंधळ घालू नका.
- विनाकारण कोणाशीही स्पर्धा करू नका. तुमची स्पर्धा तुमच्याशीच ठेवा. ज्यामुळे तुम्ही जीवनात यश मिळवाल.
- तुमच्या भावना लपवू नका, त्यातून ताण निर्माण होतात, ताण हा जीवाला घातक आहे.
- जेवण टाळण्याची सवय लावू नका. ते दीर्घकाळामध्ये नुकसानकारक ठरू शकते.
- नियमित नखे कापायला विसरू नका.
- अतिरीक्त मळलेले मोजे धुवायला टाकायला विसरू नका.
- त्वचेची निगा राखण्याकडे दुर्लक्ष करू नका. हा केवळ स्त्रियांचा प्रांत आहे असे समजू नका.
- सार्वजनिक ठिकाणी लघवी करू नका. ते आरोग्यास चांगले नाहीच पण शिष्टाचारासही धरून नाही.
- कृपाकरून सार्वजनिक ठिकाणी वेडावाकडा आवाज करू नका.