Print
Hits: 5098

तुमच्या पाळीव प्राण्याचे वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे?
पाळीव प्राण्याचे वजन जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर प्राण्याचा मालकच त्याची जबाबदारी घेऊन तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य तो आहार घेऊन त्या कुत्र्याचे किंवा मांजराचे वजन योग्य रितीने घटवू शकतो. आज काल पाळीव कुत्र्या-मांजरांमधे स्थूलता निर्माण होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. ह्यातील मुख्य अडचण अशी आहे, की त्या मालकालाच माहीत नसते की आपला कुत्रा स्थूल आहे की नाही हे कसे ओळखावे. एखादे गुटगुटीत मूल जसे सुंदर दिसते, त्याचे कौतूक होते, तसेच प्राण्यांच्या बाबतीत होते. पाळीव प्राण्याची स्थूलता त्यामुळेच कुणाच्या लक्षात येत नाही. प्राण्याच्या आहारातील थोडासा बदल, त्याला भरवायची त-हा, खायला द्यायच्या वेळा, आणि रोजचा नियमीत करून घेतलेला व्यायाम ह्या सर्व गोष्टींमुळे त्या पाळीव प्राण्याची स्थूलता कमी होण्यास नक्कीच उपयोग होईल. आणि त्यामुळे त्याची आयुर्मर्यादा वाढण्यास आणि जीवनशैली सुधारण्यास नक्कीच मदत होईल.

तुमच्या पाळीव प्राण्यामधे स्थूलता जास्त आहे हे कसे ओळखावे?