Print
Hits: 5117

पाळीव प्राण्यांच्या दाताकडे नियमीत लक्ष देणे, त्यांना नियमीत दंतवैद्याकडे घेऊन जाणे आणि घरी सुद्धा रोजचे रोज त्यांचे दात साफ करणे हे त्यांच्या मालकांचे कर्तव्यच आहे. ही गोष्ट जर कुत्रा पिल्लू असल्यापासूनच सुरू केली तर सोपी असते. कारण त्यांना त्याची सवय होऊन जाते. नाहीतर कुत्रा मोठा झाल्यावर आपल्याला नीटपणे त्याचे दात बघता येत नाहीत. त्यांचे दात, तोंड हाताळणे आपल्याला अशक्य होते. परंतु पहिल्यापासूनच दात साफ करायची सवय लावली तर ही गोष्ट सोपी होते.

कुत्र्यांच्या आरोग्यातील वारंवार येणारी अडचण कोणती हे तुम्हाला माहित आहे? ८०% देशी पाळीव कुत्रे जे तीन वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत, ते हिरड्यांची सूज, दाताच्या अडचणी अशाच समस्यांना जास्त तोंड देतात. कुत्र्यांच्या मालकांना ह्याच समस्येला जास्तीत जास्त तोंड द्यावे लागते.

दंतरोगाची नेहमीची लक्षणे कोणती?

ह्या समस्यांवर ताबडतोब उपचार न घेतल्यास त्याचे गंभीर रुपांतर होऊन त्याचे दुष्परिणाम फुफ्फुसे, ह्रुदय, यकृत, मुत्रपिंड ह्यापैकी कोणत्याही अवयवावर होऊ शकतात. पाळीव प्राण्यांच्या दातांकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांना पेरिओडेन्टल डिसीज सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे प्रथमपासूनच पाळीव प्राण्यांच्या दातांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.