- प्रत्येक वेंळेंच संभाषण हे त्या त्या वेळेस अनुसरुन असतं.
- समोरासमोर बसुन संभाषण करणं ही उत्तम व परीणामकारक पध्द्त आहे.
- मागील संभाषणाचा गोषवारा देणं ही एक यशस्वी संभाषणाची गुरुकील्ली आहे.
- गोंगांट व गोंधळामुळे नीरोप वा संभाषण विपर्यस्त होते.
- एकापेक्षा अधिक मांणस जमा झाली की संभाषण गुंतागुंतीच होऊ शकते.
- प्रत्येक नीरोपात व संभाषणात अनौपचारिकता व भावनीक जवळीक असते.
- शब्द हे आपले विचार दर्शवीणारे असतात त्यांचा अर्थ कसाही लावला जाऊ शकतो.
- आपल्याला हवा असलेल्या गोष्टिचा अर्थ काढण्यामुळे संभाषण किंवा संदेश विपर्यस्त होऊ शकतात.
- विश्वास नसेल तर परिणामकारक संभाषण होऊ शकत नाही.
- स्व:ताला उमजुन स्व:ताशी केलेले संभाषण हे सर्वात अतिशय महत्वाचे.
- उभयपक्षी होणाऱ्या संभाषणाने होणारा परीणाम हा एकतर्फ़ी संभाषणाने अधिक प्रभावी होतो.
चांगला श्रोता होण्यासाठी आवश्यक असलेल्या दहा महत्वाच्या सुचना
- बोलण बंद करा. तुम्ही जर बोलत असाल तर ऎकु शकत नाही.
- बोलणाऱ्याला मोकळेपणा द्या. त्याला मोकळं वाटेल असं तुमचं वागणं ठेवा.
- तुम्हाला ऎकायचे आहे असं दर्शवुन द्या. त्याच्या बोलण्यांत रस घ्या.
- त्याचं लक्ष वीचलीत होईल असं करु नका. टेबलावर टक्टक करणे, कागदाची चाळवाचाळव करणे इत्यादी.
- समोरच्याच्या बोलण्यावर जोर द्या.तुम्ही त्याच्या जागी बसुन बोलत आहात असं समजा म्हणजे तुम्हाला त्याचा द्रुष्टिकोन समजेल.
- ऎकण्याची चिकाटी ठेवा.
- तुमचा राग ताब्यात ठेवा.
- मतभेद व टिका करताना व स्विकारताना शांत रहा.
- प्रश्न वीचारा. जेणे करुन त्याच्या बोलण्यामधे तुम्हाला रस वाटेल व त्याला प्रोत्साहन मिळेल.
- बोलणे बंद करा. पहीली व शेवटची सुचना.
परमेश्वराने आपल्याला दोन कान दीले आहेत. पण जीभ मात्र एकच दीली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण ऎकायचे काम जास्त करायंच आहे व बोलायचं कमी आहे.