Print
Hits: 7285

किशोरवयीन मुले धुम्रपान का करतात ? या मागचे मुख्य कारण हे आहे की ते या वातावरणात किंवा समाजात स्वत:ला असुरक्षित समजतात किंवा इतर मित्रांच्या दबावामुळे प्रवृत्त होतात. त्यांना सतत असे वाटत असते की ते केव्हाही धुम्रपान सोडू शकतात , कारण त्यांना या व्यसनाविषयी किंवा व्यसनात गुरफटण्याविषयी काहीच माहिती नसते.

रसायने
प्रत्येक सिगारेट मध्ये ४००० पेक्षा जास्त रसायने असतात. त्यापैकी कमीत कमी ४३ रसायने कॅन्स्ररला कारणीभुत ठरतात. सिगारेट्मध्ये निकोटीन नावाचा व्यसनयुक्त हानीकारक पदार्थ असतो.

धुम्रपानामुळे होणारे रोग
सिगारेटच्या व्यसनामुळे होणारे आजार: फ़ुफ्फुसांचा कर्करोग , घशाचा कर्करोग ब्रोंकायटीस इत्यादी.
सतत सिगारेट ओढणा-यांच्या संपर्कात रहाणे आपणास धोकादायक वाटत नाही पण त्यामुळे पुष्कळ समस्या येऊ शकतात , जसे डोके दुखी डोळ्यांची आग , खोकला आणि ज्या लोकांना दमा आहे त्या लोकांसाठी हे अधिक धोकादायक ठरु शकते. हे संपर्कात राहणा-यांनीही धुम्रपान न करताही धुम्रपान करण्यासारखेच आहे. दर वर्षी अशाप्रकारच्या धुम्रपानामुळे ३५००० लोकांवरा अती उष्णता वाढून म्रुत्यू ओढावतो, जवळपास ३७०० जणांना फ़ुफ़ुसांच्या कर्करोग होवून म्रुत्यू येतो. तसेच १२००० जणांना इतर प्रकारचे कर्करोग होवून म्रुत्यू येतो.

ध्रुम्रपान सोडणे
धुम्रपान सोडणे तसे सोपे नाही जे लोक धुम्रपान सोडण्याच्या मार्गावर आहेत , ते पुन्हा त्याच मार्गाकडे वळू शकतात. उदास वाटणे, निराश होणे, चिडचिड होणे किंवा झोप न येणे या समस्या येऊ शकतात पण प्रबळ इच्छाशक्ती असेल तर या समस्यांवर मात करता येते. तसेच धुम्रपान सोडण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे निकोटीन पॅच. हे पॅच शरीरावर लावल्यावर व्यसनी व्यक्तीला धुम्रपान करण्याची इछा होत नाही. बरेच मदत गट या करीता कार्यरत आहेत आणि ज्यांना धुम्रपान सोडायचे आहे ते या गटात सह्भागी होऊ शकतात.