किशोर आरोग्य

मुलांच्या दृष्टीने पालक सुध्दा गोंधळलेल्या मनस्थितीत असतात. एका बाजूला ते सतत ‘तू आता मोठा झाला आहेस’ असं म्हणत असतात. तर दुस-या बाजूला स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ पण देत नाहीत. आणि शेवटी यातून पालक व मूल याच्यात सतत वादविवाद, शाब्दिक चकमकी व्हायला लागतात.
किशोरावस्थेतील आरोग्याविषयी ओळख आरोग्य.कॉमच्या किशोरविभागाला किशोरावस्थेत असणा-या मुलांकडून त्यांच्या प्रांजळ प्रतिक्रिया व त्यांचे उद्देश जाणून घ्यायचे आहेत. किशोरांना त्यांच्या किशोरावस्थेविषयी काय वाटते ही बाजू सामाविष्ट करुन घेणे महत्त्वाचे वाटते.
यौवनावस्था म्हणजे परिपक्वता येण्याचा कालावधी. हा कालावधी कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा कालावधी मानला जातो. कारण याच काळात त्याच्या शरीर रचनेबरोबरच त्याच्या मानसिकतेचाही विकास होत असतो. त्या विकासावरच त्या व्यक्तीच्या जीवनात होणारे छोटे मोठे बदल ठरणार असतात. याच कालावधीत किशोरवयीन मुले-मुली खुप संवेदनशील असतात.
अस मानल जात की किशोरावस्था म्हणजे मानसिक अशांती आणि विचारांचे उंच सखल टोक गाठणारा आयुष्यातला काळ असतो. कधी कधी तर मन स्थिर असणे हीसुद्धा चिंतेची बाब मानली जाते. कारण त्यावेळी आपल्या जीवनात काहीच मोठ अस घडत नाही अस सारख वाटत असत. हे दोन्ही दृष्टिकोन आपल्याला आपल्या योग्य मार्गापासून वन्चित ठेवतात. किशोरावस्थेतील प्रवास इतक्या वेगाने होत असतो की त्या काळात अशा दोन्ही दृष्टिकोनांची हाताळणी करणे फारच अवघड असते.
यौवनावस्थेत वेगवेगळ्या प्रकारची परिपक्वता येत असते जशी सामजिक परिपक्वता, भावनात्मक परिपक्वता आणि मानसिक परिपक्वता. खर पाहिल तर यौवनावस्था एक संक्रमणरुपी मंच असतो. त्यात अद्यापही पूर्णत: शारिरीक आणि मानसिक परिपक्वता आलेली नसते.
अद्यापही त्यात स्वतंत्र व्यक्तीमत्व तयार झालेले नसते. ते पुर्णतः सशक्त प्रौढ झालेले नसतात. आत्ताची पिढी ताणतणावाने ग्रासलेली आहे असे मानले जाते. म्हणुनच आजचे युवक युवती त्यापासून वाचू शकणार नाहीत. पाश्चात्य संस्कृतीतील युवकयुवतींवरही याचा फार मोठे परिणाम झाले आहेत.
या वयात किशोर अधिकच आक्रमक पद्धतीने विचार करतात कारण त्यांना स्वतःची ओळख स्वतःच बनवायची असते. त्यांची स्वतःच्या काही आवडी निवडी असतात जसे खास केसांची ठेवण ठेवणे किंवा चांगले कपडे परिधान करणे वगैरे वगैरे. स्वतःचे स्वातंत्र्य सिद्ध करण्यासाठी ते सिगारेट ओढणे किंवा उंची दारु पिणे असे प्रयत्न करु शकतात. ते त्यांच्या नातेवाईकांना जुनाट मर्यादित विचारांचे ठरवतात. ते त्यांच्या कुटुंबियांपेक्षा मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाणे योग्य समजतात. ते त्यांच्या कुटुंबियांपेक्षा मित्रांशीच आपले विचारांची देवाणघेवाण करतात. ते त्यांच्या कुटुंबियांच्या परवानगी शिवाय मोटार किंवा मोटार सायकल चालवायला लागतात. ते आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोगही करु शकतात.
जर तुम्ही किशोरवयीन आहात तर तुम्हाल खालील गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा योग्य पद्धतीने अवलंब करा. स्वतःची जबाबदारी योग्य पद्धतीने घ्यायला शिका.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा तुमचाच विभाग आहे. मनमोकळेपणाने लिहा आणि आमच्याबरोबरीने सहभागी व्हा. तुमचे विचार लिहा, लेख लिहा आणि सुचवा This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
किशोर आरोग्य
आहार म्हणजे काय?
