Print
Hits: 4886

आरोग्य क्षेत्रातील करियर नेहमीच प्रतिष्ठेचे व सामाजिक निकडीचे मानले जाते. आरोग्य क्षेत्रात उपचाराचे प्रामुख्याने शारीरिक (Physical) व मानसिक (Mental) हे दोन प्रमूख प्रवाह आहेत. शारीरिक आरोग्य व आजारासंदर्भात सामाजिक जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे; मात्र आजही मानसिक आरोग्य व त्या संदर्भातील आजार, उपचार व पुनर्वसन सेवेसंदर्भात समाज अनभिज्ञ आहे.

मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रामुख्याने तीन प्रमूख तज्ञ मंडळींकडून उपचार पूर्ण करण्यात येतात
१. मनोविकार तज्ञ (Psychiatrist) २. समूपदेशक (Clinical Counsellor) व ३. पुनर्वसन कार्यकर्ता (Rehabilitation worker). मनोविकारतज्ञच पूर्णपणे संपूर्ण उपचार करू शकत नाही आणि म्हणूनच मनोरुग्णांना पुनर्वसन व समूपदेशन सेवा देण्यासाठी विषेश मानसिक आरोग्य सल्लागाराची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे, व ही गरज भविष्यकाळात वाढतच रहाणार आहे. मानसिक आरोग्य जपणा-या वा उपचार करणा-या शासकीयच नव्हे तर खासगी मानसिक आरोग्य केंद्रांनाही अशा विशेष प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासणार आहे.

शासकीय मानसिक आरोग्य प्रशिक्षण संस्था
निमहॅन्स ( NIMHANS )
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ऍण्ड न्यूरॉलॉजी सायन्स: बेंगळूरू येथे राष्ट्रीय पातळीचे सदर मानसिक आरोग्य प्रशिक्षण केंद्र भारत सरकारने उभारलेले आहे.

प्रशिक्षण कार्यक्रम

संपर्कासाठी पत्ता
संचालक, NIMHANS,
हुसर रोड, बेंगळूरू: ५६००२९.
दूरध्वनी: +९१-८०-२६९९५००१
वेब साईट: www.nimhans.kar.nic.in

महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे (महाराष्ट्र)
सदर संस्था ही मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करणारी राज्य शासकीय प्रशिक्षण संस्था आहे.

प्रशिक्षण कार्यक्रम

संपर्कासठी पत्ता
संचालक, डॉ. अलका पवार, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था,
ससून सर्वोपचार रुग्णालय परिसर, पुणे: ४११००१.
फोन: +९१-२०-२६१२७३३१
ई-मेल: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी मेंटली हॅंडिकॅप (NIMH)
सिकंदराबाद येथील सदर संस्था मतिमंदत्त्वावर कार्य करण्यासाठी विषेश प्रशिक्षण वर्ग राबवीत असते.

प्रशिक्षण कार्यक्रम

संपर्कासाठी पत्ता
संचालक, NIMH, मनोविकास नगर,
सिकंदराबाद ५००००९, आंध्र प्रदेश.
टेलिफोन: +९१-४०-२७७५१७४१
वेब साइट: www.nimhindia.org
ई-मेल: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.