आमचा विस्तार व आमचे अस्तित्व ख-याखु-या जगाशी जोडले गेले आहे. मदत गट वास्तविक जीवनात भेटतात. अपंग व्यक्तीदेखील संभाजी पार्कवर आनंद लुटू शकतात. आम्ही बांधलेल्या रॅम्पचे त्यासाठी आम्ही आभार मानतो. किशोरवयीन मधुमेही पिडीतांचे एकत्रीकरण हे आमचे निर्भेळ यशच आहे. व्यसनात अडकलेल्या व्यक्ती आता नविन उभारी घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आपले अर्थपुर्ण आयुष्य जगत आहेत. आरोग्य.कॉमने मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या बरोबरीने व्यसनाने पिडीत असलेल्यांना ऑनलाईन समुपदेशन व मदत केंद्राचीही व्यवस्था केलेली आहे. जॉन अल्मेडा, एमडी आपल्या रुग्णांच्या सद्यस्थितीचे आहवाल प्रसारीत करण्यासाठी आरोग्य.कॉमची नित्यनियमाने हाताळणी करतात जेणे करुन त्या रुग्णाला अमेरीकेमधे त्यांच्या ऎवजी दुसरा डॉक्टर उपलब्ध होऊ शकेल. आरोग्य.कॉमनी उपचारांमधे, प्रक्रियांमधे, उत्पादनांमधे, तसेच उपलब्ध सेवांमधिल अनेक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला आहे.
आरोग्य.कॉम ची काही ठळक वैशिट्ये:
- या साईटमध्ये माहिती पुरवणारा प्रगत विभाग आहे, जो वेगवेगळ्या विमा, निवेश, टेलीमेडीसिन व चिकित्सांविषयीच्या सुचना व कायदेबद्ध नियमावली उपलब्ध करुन देतो.
- औषधोपचारांसाठी जवळपास १०००० सामान्य व प्रख्यात औषधांविषयी माहिती पुरवणारी यंत्रणा उपलब्ध आहे.
- ही भारतातील पहिली व तिन भाषांत उपलब्ध असणारी आरोग्य विषयक साईट आहे. यात मराठी भाषेमधे प्राविण्य असलेला मराठी विभाग आहे ज्यांना इतर कोणत्याही लिपीची वेगळी गरज भासत नाही आणि आता गुजराथी भाषेतही आवृत्ती उपलब्ध आहे.
- विकल्पायुक्त व चिकित्सा पुरक विभाग.
- २५००० हून अधिक चांगल्या डॉक्टरांविषयी माहिती.
- २२ हून अधिक विशेषतांविषयी माहिती.
- ग्रामिण भागासारख्या अप्रगत क्षेत्राच्या आरोग्यासाठी एक विभाग.
- पर्यायी औषधांच्या विषयी सखोल माहिती पुरवणारा विभाग.
- आजाराचे निदान करणा-या विविध पद्धती व त्याच्या परिणामांविषयी पुरक माहिती उपलब्ध.
- संसर्गजन्य रोग व त्याची लक्षणांविषयी माहिती.
- पाळीव व उपयुक्त प्राण्यांविषयी माहिती.
- पोषण आणि आहार विभाग ज्यात प्रथमोपचार, सशक्तता, व आरोग्य राखण्याविषयी माहिती.
- उज्वल भवितव्यासाठी बराच संधी, विडीओ आय आणि सतत चिकित्सकी शिक्षण इत्यादी.
- रुग्णवाहिनी, औषधांची दुकाने, रक्तपेढी, नेत्रपेढी, परिचारीक मंडळ, तज्ञ डॉक्टर, डायलिसिस सेंटर, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, पॅथालॉजिकल प्रयोगशाळा, व्यायाम शाळा, समाज कल्याण विभागाच्या शाखा यांविषयी माहिती व पत्ते.
- ऑनलाईन विचारांची देवाण
- घेवाण करण्यासाठी संदेश फलक व मदत गट.
- ई-कार्ड आणि ऑनलाईन डायरी जी आपल्या व्ययक्तीक बाबी स्वतःपुरती मर्यादीत असते.
- डॉक्टरांना आपले प्रश्न विचारा या विभागात आपण आपले प्रश्न पॅनलवरील १२० पैकी कोणत्याही डॉक्टरांना पाठवू शकता.
- ५००० हून अधिक माहिती पुरवणारी पाने.
- आरोग्य.कॉमच्या उपयुक्ततेमुळे आधीच चांगली लोकप्रियता मिळवलेली आहे.
- ६ जुलै २००० रोजी सुरवात झाल्यानंतर ३० लाखांहून अधिक हिट्स.