क्षयरोगाला कसे ओळखावे?
तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी वर्षातून एकदा संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तुमच्या घरात काम करणार्या नोकरांची, मोलकरणींची कामावर नेमणूक होण्याचेवेळी डॉक्टरकडून चिकित्सा करून घ्यावी. जर डॉक्टरांना लक्षणे आढळून आली तर पुढील तपासण्या करण्याकरता डॉक्टर सांगतीलच.क्षयरोग बरा होऊ शकतो का?
जर वेळेवर/योग्य वेळी निदान झाले तर १००% क्षयरोग बरा होऊ शकतो. एटीटी औषधांचा गट म्हणजेच क्षयरोग विरोधी औषधांचा वापर या करता करावा लागतो. सामान्यत: उपचारांचा कालावधी सहा महिन्यांचा असतो. क्वचित प्रसंगी उपचार अधिक काळ द्यावे लागतात. उपचारातील सर्वात मोठी अडचण म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेल्या बाबींचे काटेकोरपणे पालन न करणे आणि/किंवा मध्येच उपचार थांबवणे ही होय. त्यामुळे आजार उलटतो आणी क्षयरोगाचे जंतूवर पूर्वीच्या औषधांचा परिणाम होईनासा होतो. उपचार सांगितल्याप्रमाणे न घेणे हा वाटतो त्या पेक्षा विलक्षण गंभीर प्रश्न आहे. ही केवळ रूग्णाची जबाबदारी नाही. तर त्यावर उपचार करणार्या संबंधित डॉक्टरने, रूग्णाला उपचारांचे महत्व पटवून देण्याचीही आहे. ह्या बाबत बेफिकिरीमुळे (MDR) एम. डी. आर. टी. बी. (अनेक औषधांना विरोध करणार क्षयरोग अशा नव्या आजाराची उत्पत्ती झाली आहे.एम डी आर टी बी चा उभारती समस्या मोठी गंभीर आहे. त्याची औषधे महागडी आहेतच पण ती अंशत:च उपयोगी पडतात. ह्या समस्येवर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं, DOT म्हणजेच प्रत्यक्ष देखरेखी खालील उपचार पध्दतींचा पुरस्कार केला आहे. या पद्धतीत , तज्ञांच्या देखरेखीखाली औषधे दिली जातात.