Print
Hits: 6052

लहान मुलांमधे खालील लक्षणे दिसतात

प्रौढांमध्ये ही लक्षणे जास्त गंभीर स्वरूपाची असतात

ही लक्षणे साधारणपणे त्वचेवर लालसर रंगाचा पुरळ उठण्यापूर्वी २४ ते ३६ तास आधी घडू लागतात.

कांजण्याचे स्वभावविशिष्ट लक्षण म्हणजे खाजणारा पुरळ धडावर येण्यास सुरूवात होऊन तो हळुहळू चेहर्‍यावर आणी त्यानंतर डोक्याची कातडी, तोंड आणि कानापर्यंत पसरत जातो. बहुतांशी मुलांच्या बाबतीत २५०-५०० क्षते पडून त्यावर चार ते पाच दिवसांनी खपली धरू लागते आणि त्या खपल्या दोन ते तीन आठवड्यांपर्यंत तशाच राहतात. यावेळी सुटणार्‍या तीव्र खाजेचा मुलांना अतिशय त्रास होतो आणि त्यांना ताप, सर्दी, मळमळ आणि वांत्या यांचाही त्रास जाणवू लागतो.

त्वचेवर जवळ जवळ २५०-५०० फोड उठतात. प्रौढांमधील या फोडांचे व्रण अधिक खोल आणि जास्त प्रमाणात असतात. तसेच यामधे आरोग्यविषयक समस्या वाढण्याची शक्यता १० ते १५ पटीने जास्त व अधीक गंभीर असते.