Print
Hits: 5517

संसर्ग झालेल्या व्यक्तिला पुरळ दिसू लागल्या क्षणापासून ते अगदी खपल्या धरेपर्यंत इतरांपासून दूर ठेवा. दुर्दैवाने कांजण्याचे जंतू पुरळ स्पष्ट दिसू लागण्याच्या आधीच एक दोन दिवस संसर्गजन्य असतात. म्हणूनच त्यांचा प्रसार होण्याला प्रतिबंध करणे कठीण आहे.

तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी कांजण्यांचा प्रतिबंध करणे का महत्वाचे आहे?
प्रथम, लहान मुलांना जडणार्‍या कांजण्या या रोगाच्या परिणांमाकडे रूग्णाकडून किंवा त्याच्या कुटुंबियाकडून फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. प्राकृतिक दृष्ट्या कांजिण्या हा रोग रूग्णांसाठी अतिशय त्रासदायक असतो आणि दीर्घकालीन कुरूपता जडण्याची किंवा गंभीर अगदी प्राणघातक ही दुष्परिणाम उद्‌भवण्याची शक्यता असते.

दुसरे म्हणजे कांजण्या झालेल्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी पालकांना घरीच रहावे लागल्याने किंवा कामावर जाणा-या लोकांना कांजण्यामुळे रजा घ्यावी लागल्याने वेतन बुडून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. कधी कधी आधी ठरविलेल्या सुट्‌टीतील सहलीच्या वेळी किंवा परिक्षेसारख्या कसोटीच्या वेळी मुलांना कांजण्या येऊन त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. खास करून कांजण्या झालेल्या व्यक्ति, मुले, तरूण किंवा प्रौढ कुणीही असली तरी कांजण्या आल्यानंतर त्यातून पुढील रोगसंबंधित समस्या निर्माण झाल्यास अशा व्यक्तीला इस्पितळात दाखल करावे लागल्याने वैद्यकीय खर्चात बरीच वाढ होते. तथापि, कांजण्यांना प्रतिबंध करण्याविषयी एक चांगली बातमी आली आहे. अगदी प्रथमच कांजण्या या रोगाचा भार प्रतिबंधीत करणारे इंजेक्शन विकसीत करण्यात आले आहे. या इंजेक्शनमुळे कांजण्या रोगाला प्रतिबंध केला जाण्याबरोबर मुले, तरूण आणि प्रौढांमध्ये दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारक्षमताही निर्माण केली जाते. कांजण्याचा प्रतिबंध होऊ शकतो. आजच आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्या.

कुणाला धोका आहे?
पूर्वी कधीही कांजण्या न आलेल्या व्यक्तीला यापासून धोका आहे. अगदी, लहान मुले, तरूण आणि प्रौढांनाही हा रोग जडण्याची शक्यता आहे. केवळ बालपणातील रोग अशी समजूत असली तरी अलिकडील संशोधनाने दाखवून दिले आहे की तरूण आणि प्रौढांनाही हा रोग मोठ्या प्रमाणावर जडत आहे आणि त्यांच्या साठी हा रोग अधिक गंभीर स्वरूपाचा तसेच अधिक प्रमाणावर आरोग्य विषयक समस्या वाढविणारा असल्याचे आढळून आले आहे.