Print
Hits: 5483

बाधक घटक व घटकांचा विचार
ऍलर्जी (तीव्र संवेदनक्षमता)
दम्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे ‘ऍलर्जी उर्फ तीव्र संवेदनक्षमता’ (वावडे) होय. विशिष्ट खाद्यपदार्थ, रज कण, पुष्पकेशर, औषधी द्रव्ये यांसारखे काही पदार्थ विशिष्ट व्यक्तींना त्रासदायक ठरतात.

विशिष्ट व्यक्ती विशिष्ट पदार्थलाच इतर कोणत्याही द्रवाला नव्हे तीव्र संवेदनात्मक प्रतिक्रिया दर्शविते. एखाद्याला अंड्यातील प्रोटीनची ऍलर्जी असते. अशा माणसाने अंड्यापासून केलेला कोणताही पदार्थ खाल्ला, एवढेच नव्हे तर तो पदार्थ ज्या बशीतून दुसर्‍याने खाल्ला असेल त्याच बशीचा उपयोग दुसरा पदार्थ खाण्यासाठी केला तरी एवढ्याने देखील त्याला उलट्या, अंगावर गाठी इ. ऍलर्जीची लक्षणे सुरू होतात असा अनुभव आहे. एखाद्याला ऑस्पिरिनच्या एका गोळीनेही ऍलर्जीची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया समजण्यासाठी अँटिजेन (प्रतिद्रव्य जनक) म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल.
अँटीजेन
जो पदार्थ शरीरात शिरल्यावर अँटिबॉडीज्‌ निर्माण करतो त्याला अँटिजेन म्हणतात. नंतर पुन्हा जेव्हा या वर्गातील द्रव्य तोंडाने, नाकाने स्पर्श होऊनही किंवा इंजक्शनद्वारे शरीरात जाते तेव्हा पूर्वी उत्पन्न झालेल्या अँटिबॉडीज्‌ व हे नविन ऍटिजेन यामध्ये प्रक्रिया होऊन त्यामुळे विशिष्ट बाधक रसायने निर्माण होतात. त्यामुळे मळमळ होणे, गाठी उठणे इ. लक्षणे दिसून येतात.
अँटिबॉडी
अँटिजेन पदार्थ शरीरात गेला की त्यामुळेच अँटीबॉडी निर्माण होतात. अँटीजेन व अँटीबॉडी ह्यांचा संयोग नाक, फुप्फुस, त्वचा अशा विशिष्ट भागी झाला की सर्दी होणे, धाप लागणे (दमा सुरू होणे) यासारखी लक्षणे सुरू होतात. पण ते एकदम लक्षात येत नाही व म्हणूनच आपल्याला नेमका कशाचा त्रास होतो, म्हणजेच कशाची ऍलर्जी आहे, याचे परिक्षण करणे आवश्यक असते. ऍलर्जीचा थोडासा संशय येताच डॉक्टरी सल्ला लगेच घ्यावा.
ऍलर्जीच्या कारणाचे निदान
‘ऍलर्जी’ मागील कार्यकारण भाव निश्‍चित करण्यासाठी, त्या व्यक्तींची त्या दिवसाची दिनचर्या म्हणजेच ऍलर्जी उद्‌भवण्यापूर्वी काय काय गोष्टी क्रमश: घडत गेल्या याची संगतवार माहिती, औषधे, अन्न इत्या. चा तपशील, घरचे वातावरण व नोकरी व्यवसायाची जागा इत्यादी बारीक सारीक माहितीचा तपशील घेणे जरूर आहे. वरील तपशीलवार माहितीशिवाय ऍटिजेनचे स्वरूप ठरविण्यासाठी पुढील ‘परिक्षणे’ करावी लागतात. त्यासाठी निरनिराळी ऍटीजेन तयार मिळतात.
१) आराखडे काढून परिक्षण: हि एक साधी परीक्षणाची रीत असून लहान मुलांसाठी सोयीची आहे. यात चामडीवर ‘ऍटीजेन’ चा एक थेंब टाकून उभे ओरखडे रक्त येऊ नये इतपत हळूवार हाताने काढतात. सुमारे अर्ध्या तासात कमी - जास्त प्रतिक्रिया होते.

यात चामडीवर ‘ऍटीजेन’ चा एक थेंब टाकून उभे ओरखडे रक्त येऊ नये इतपत हळूवार हाताने काढतात. सुमारे अर्ध्या तासात कमी - जास्त प्रतिक्रिया होते. त्या जागी त्यात फुगवटा आल्यास त्या ऍटीजेनने ऍलर्जी येते. ही ऍलर्जी मिली मिटरमध्ये स्केल द्वारे किंवा कॉलीपर द्वारे मोजतात व तसेच निगेटीव्ह कंट्रोल हे बफर सलाईनच्या थेंबाने बघतात व पॉजेटीव्ह कंट्रोल हे हिस्टामीन नावाच्या पदार्थाच्या थेंबाने बघतात व नंतर हायपोसेनसि टायझेशनच्या औषध उपचाराकरिता रिपोर्ट पाठवतात. {mospagebreak} हायपोसेंसिटाझेशन म्हणजे संवेदना मंदीकरण
ऍलर्जी उत्पन्न करणारे ऍटिजेन सापडलेच तर मग त्याची प्रथम लहान लहान व पुढे क्रमश: वाढत्या प्रमाणात इंजेक्शन हप्त्यातून दोन वेळा देऊन ऍलर्जी उत्पन्न होण्याची प्रवृत्ती थांबविता येते. पुढे एका वर्षानंतर महिन्यातून एक वेळ किंवा दोन वेळ मेंटेनन्स डोस द्यावा लागतो. शरीराला त्या द्रव्याची जणू हळूहळू सवय होऊन त्यातील बाधकता नाहीशी होते. या प्रक्रियेला ‘संवेदना मंदीकरण हायपोसेंसिटायझेशन’ असे म्हणतात.
ऋतुकालदी परिस्थिती: काहींना दमा रूक्ष व थंड हवेने सुरू होतो. आपल्याला काय मानवते व काय बाधते ते त्या व्यक्तीने अनुभवाने ठरवून बाधक तेवढे टाळावे.
शारीरिक उणिवा दूर करणे: नाकातील हाड वाढणे व पडदा सरळ नसणे, त्यावर छोटीशी गाठ येणे इ. दोष आढळल्यास ते दुरूस्त करावे.
संसर्गदोष दूर करणे: नाक, घसा सारख्या श्वसन मार्गातील वरच्या भागात संसर्गबाधा असल्यास अशा व्यक्तींनी थंडी, वारा ओला पाऊस यांस जपावे व पडसे खोकला बंदोबस्त करावा.
पचनाच्या तक्रारीही: दम्याला आमंत्रण देतात मलावरोध, अपचन, अर्जीर्ण यांची उपेक्षा करू नये. तसेच, खाण्यापिण्यातील अत्याचार व एकदा बाधक ठरलेले विशिष्ट पदार्थ टाळणेच भाग आहे.
मानसिक कारणे: चिडखोरपणा, अती चिंता, मनाचा समतोल बिघडणे यामुळे दम्याचा इतर कारणास हातभार लागून दमं सुरू होतो. यावर प्राणायम, योगनिद्रा, मेडिटरेशनने फायदा होतो.
क्सरसाईज टाँलरंस टेस्ट (चाचणी)
प्राणायाम, योगासने ही जरी दम्याच्या रूग्णासाठी लाभकारक असली तरी प्रत्येकच दम्याच्या रूग्णांना ती सारख्याच प्रमाणात योग्य ठरणार नाहीत. कारण प्रत्येकाची क्षमता ही वेगळी वेगळी असेल म्हणुनच रूग्णाने यापैकी काय करावे व काय करू नये यासाठी एक चाचणी येथे दिलेली आहे. या चाचणीलाच एक्सरसाईज टॉलरंस टेस्ट म्हणतात. ही चाचणी स्वत:चीच स्वताला घेता येते.