दम्याच्या रूग्णाने आपली दिनचर्या कशी ठेवावी?
रोज सकाळी जलधौती (वमन) व जलनेतीचा नियमित अभ्यास करावा. तसेच आपल्या तोंडाची व शरीराची स्वच्छत: पाळावी.
- मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या.
- प्राणायम, लंग व्हायटलायझरच्या साह्याने श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करावा.
- योगासने करावी.
- सकाळ सायंकाळ डॉक्टरानी दिलेली औषधे नियमित घ्यावी.
- रात्री झोपताना गरम पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडवून बसावे.
टीप - यापूर्वी नमुद केल्याप्रमाणे स्वत:चे एक्झरसाईज टॉलरन्स टेस्ट घेऊनच प्राणायम, योगासने व जड व्यायाम करावा.
दम्याच्या रूग्णानी कुठली काळजी घ्यावी.
- रोज मीठ घालून गरम पाण्याने गुळण्या कराव्या.
- गरम पाण्याचा वाफारा घ्यावा.
- नाकाची स्वच्छत: राखावी. (नेती क्रिया करावी)
- तोंड स्वच्छ ठेवावे. प्रत्येक जेवणानंतर दात घासावे व जीभ (बाजारात मिळणार्या प्लॅस्टीकच्या दांडीने स्वच्छ ठेवावी.)
- धूम्रपान करू नये.
- उग्रदर्प असलेल्या वस्तुपासून दूर रहावे. (उदा. रसायने, रंग इ.)
- अधिक धावू नये, त्याऐवजी हळूहळू चालावे.
- ऍस्पिरिनयुक्त औषधे पोटात घेऊ नये.
- दारू, थंडपेय, तळीव पदार्थ, आंबट पदार्थाचे सेवन कधीच करू नये.
- दिवसातून अधिकाधिक पाणी प्यावे.
- रात्रीचे जेवण मात्र सुपाच्या (हलके) व सूर्यास्तापूर्वी करावे.
- झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. रोज स्वच्छ अंथरूण पांघरूण वापरावे.
- रोज आंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवावे.
दम्याच्या रूग्णांनी धूळ, प्राण्य़ाचे कातडे, उनी कपडे यापासून दूर रहावे. अधिक महत्वाचे म्हणजे आपल्याला दमा आहे कसे होईल? अशी काळजी करू नये. दम्याच्या रूग्णांनी व्यायामाच्या अगोदर इनहेलर असो की एरोकॉर्ट, अस्थालीन किंवा बिक्रँनिल इनहेलरचा वापर करावा. आणि नंतरच व्यायाम करावा. दम्याचा त्रास मध्यरात्री होत असल्यास थिओलांग २०० मि. ग्राम. ची एक कॅपसूल द्यावा.