इनहेलरचा उपयोग - (ऐरोसोल थेरपी)
अस्थमा किंवा दमा यावर उपचार म्हणून जी औषधे घ्यावी लागतात त्यापैकी काही गोळ्यांच्या स्वरूपात असतात. काही द्रव स्वरूपात, तर काही पावडरच्या स्वरूपातही असतात. पावडर स्वरूपात असलेले औषध ‘इन्हेलरच्या’ साहाय्याने घ्यावी लागतात. जसे की, अस्थालीन, एरोकार्ट, पलमिकॉर्ट ब्रिकॉनिल इनहेलर.
इनहेलरचा उपयोग कसा करावा.
- अ) पावडर असलेले छोटे सीलेंडर इनहेलरच्या माऊथ पीसमध्ये बसवावे. माऊथपीसचे झाकण उघडून स्वच्छ आहे किंवा नाही ते बघुन घ्यावे. इनहेलर हलवून घ्यावे.
- ब) आता तोंडावाटे एक दीर्घ श्वास बाहेर सोडावा व माऊथपीसला तोंडात दातांच्या मध्ये धरावे.
- क) चित्रात दाखवल्याप्रमाणे इनहेलर हातात उभे धरून आंगठा माऊथपीसच्या खालच्या बाजूला ठेवावा.
- ड) इनहेलर तोंडातून बाहेर काढावे. इनहेलरच्या माऊथपीसला नेहमी झाकण लावावे. इनहेलरच्या प्रयोगानंतर गरम पाण्याच्या गुळण्या जरूर करणे.
स्पेसहेलर
हे रूग्णाला परवडणारे नेब्युलायझर सारखे उपयोगात येणारे यंत्र. हे यंत्र ऑस्ट्रा आयडीलय बेंगलोरच्या कंपनीने विकसित केलेले यंत्र होय.
खालीलप्रमाणे याचा वापर करता येतो.
- अ) चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्रिकॅनिल किंवा पलमीकाँर्ट इनहेलर स्पेसहेलरला लावावे व इनहेलर मधून औषध स्पेसहेलरमध्ये सोडावे.
- ब) चित्रात दाखविल्याप्रमाणे स्पेसहेलरच्या माऊथ पीसवर बोंट ठेवावे जेणे करून स्पेस हेलरचा वाल्व बंद असावा.
- क) पूर्ण श्वास सोडून इनहेलर चा माऊथ पीस तोंडात धरावा आणि सावकाश औषधयुक्त हवा स्पेस हेलरद्वारे आत फुप्फुसात ओढावी. यानंतर दमा रूग्णाला मोकळे वाटायला सुरूवात होते, धाप कमी होते, आणि बरे वाटू लागते.
ऍन्टीबायटिक्स
दम्याच्या धापे बरोबर खोकला, बेडका व ताप असेल तर द्यावे.
इतर औषधे - मेथोट्रेकझोट्, सोडियम, क्रोमो-ग्लायकेट, केटोटिपेन इत्यादी औषधे प्रतिबंधक म्हणून वापरता येतात. तसेच थिओलाँग १०० मि. ग्रॅम. किंवा २०० मि. ग्रॅम. चे कॅपसूल रात्रीच्या वेळेस द्यावी त्यामुळे मध्यरात्री दम्याचा त्रास होत नाही.
पुढची काळजी - हवा खेळती राहून रोग्याला श्वसन सुलभ व्हावे म्हणून खोलीच्या खिडक्या, दारे सताड उघडी ठेवावी. रोग्याच्या अंगावर घट्ट कपडे असल्यास, गुंड्या सोडून सैल करावे, आराम वाटल्यावर काय घडले याचा विचार करून ते टाळावे.
मध्यंतरातील परिचर्या - ज्या कारणामुळे दमा सुरू होतो ती कोणती ह्याचा विचार दम्याचा आवेग कमी होताना करणे जरूरीचे आहे. म्हणजे बाधक घटकाचा (ऍलर्जीचा) विचार करणे जरूरीचे आहे.