Print
Hits: 5382

या जीर्ण श्वास विकारात अधून मधून धाप लागते. विशेषत: उच्छ्‌वासास त्रास होतो. याचा हल्ला एकाएकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एका एकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायु एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात.

श्वासोच्छ्‌वासासाठी त्याला उच्छ्‌वास करण्यात लागणार्‍या सर्व स्नायुंची मदत घ्यावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही देवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच तो परत कसा उद्‌भवेल याचाही नेम नसतो.

दम्याची धाप चालू असता घ्यावयाची काळजी (उपचार)

  1. दम्याच्या रूग्णाला बसल्या अवस्थेत व थोडे समोर झुकून स्टूल किंवा कोणत्याही आधाराने बसावावे. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास मदत होते.
  2. कुठलेही श्रम करू नये, पूर्ण आराम करावा. त्यामुळे प्राणवायुची गरज कमी होते व धाप कमी होवू शकते.
  3. गंभीर अवस्थेत रूग्णाला प्राणवायु (ऑक्सीजन) लावावा लागतो. प्राणवायूचे प्रमाण २ ते ३ लिटर प्रत्येक मिनिटाला ह्या प्रमाणे घ्यावा लागतो.
  4. आकुंचन पावलेल्या श्वास नलिकेला परत प्रसारित करण्याकरिता विविध औषधोपचार उपलब्ध आहेत. सद्यास्थितीतील प्रचलित असलेली औषधे पुढील प्रमाणे आहेत.
    • इंजेक्शन अमीनोफायलीन २५० ते ५०० मी. ग्रा. इन्ट्राव्हेनस मार्गाने डेक्स्ट्रोजच्या ड्रिपमध्ये द्यावे
    • टरब्युटायलीन इन्जेक्शन सब- क्युटॉनियस ०.५ मि. ली. द्यावे याकरिता अल्ट्रा आयडीएल कंपनीचे टरबुटयलीन इन्जेक्शन वापरू शकतात.
    • ऍड्रीनलीन इन्जेक्शन १:१००० सबक्युटनियस द्यावे (हातावर) त्वचेच्या खाली टोचणे व लहान मुलाला ०.३ ते ५ मिली. टोचावे व पंधरा मिनिटे वाट बघावी फरक न पडल्यास पुन्हा टोचावे. जर दम्याचा वेग कमी न झाल्यास नेब्युलायझर द्वारे पाच ते दहा मिनिटे ब्रॉकोडायलेटर औषध रूपाने दर अर्ध्या तासाने देणे सुरू ठेवावे. किंवा ऐरोसोल थेरपी इनहेलरचा उपयोग करून देता येतो. थोडक्यात माहिती खाली दिली आहे.

श्वासोच्छ्‌वास करण्यास त्रास होऊ लागला की, श्वासोच्छ्‌वासाचा मार्ग मोकळा करण्याची तातडीची गरज असते. अशा वेळी औषध घेण्याकरिता नेब्युलायझरचा उपयोग केला जातो व औषध थेट श्वासनलिकेत सोडले जाते. हे औषध द्रव रूपात असते. ह्या औषधात प्राणवायू सोडला जातो व द्रवाचे रूपांतर धुक्याप्रमाणे वाफेत केले जाते.

ज्यावेळी दम्याचा जोर अधिक असतो त्यावेळी रूग्णाला साध्या इनहेलरच्या साह्याने औषध घेणे कठीण जाते. अशावेळी नेब्युलायझरचा उपयोग केला जातो. तसेच लहान मुलांसाठीही याचा उपयोग करणे सोयीचे असते.