Print
Hits: 3507

ऑरीक्युलर रिंग
अ‍ॅक्युप्रेशर पध्दतीने दम्यावर उपचार करण्यासाठी ‘ऑरीक्युलर रिंग’ हे एक उपयुक्त साधन असल्याचे निदर्शनास आले आहे. बाह्य कर्णावर फुप्फुसाचे प्रतिनिधीत्व करण्यावर जागेवर दाब दिला जाईल अशा प्रकारे ही रिंग तयार केलेली असते. त्याद्वारे त्या विशिष्ट जागी दाब दिल्यास दम्याला आराम पडल्याचे लक्षात आले आहे. ही ऑरीक्युलर रिंग अलर्जी अस्थमा हॉस्पीटलने संशोधीत केलेली आहे. व ती त्या हॉस्पिटलद्वारे मिळण्याची सोय केली आहे.

लंग मेरीडीयन
लंग मेरीडीयन याचा मार्ग छातीच्या वरच्या भागातुन सुरू होतो. व चित्रात दाखविल्याप्रमाणे हाताच्या आतील बाजूच्या बाहेरील कडेने मनगटापर्यंत जातो व तेथून अंगठ्याच्या नखाच्या पायथ्याशी जाऊन संपतो. या मार्गावरील चित्रात दार्शविल्या ठिकाणी अ‍ॅक्युपंक्चर करता येते. पण हे काम जरा काळजीपूर्वकच करावे लागते. अस्थमासाठी चित्रात ठळकपणे दार्शविलेल्या ठिकाणी अ‍ॅक्युपंक्चर करावे लागते. याशिवाय लंग मेरीडियन वर टेन्सच्या उपचाराच्या साह्यानेहे अस्थमाला आराम पडतो.

आयुर्वेदिक उपचार
अस्थमा वर उपचारार्थ औषध म्हणून आयुर्वेदात प्रामुख्याने चवनप्राश व कनकासव यांचा उपयोग केला जातो. चवनप्राश मध्ये प्रामुख्याने आवळा ह्या फळाचा समावेश असल्यामुळे त्यातून जीवनसत्व क भरपूर प्रमाणात मिळते व म्हणूनच आवळायुक्त चवनप्राशचे सेवन दम्याच्या रूग्णाला लाभदायक ठरते. ही दोन्ही औषधे साधारणत: जेवणाआधी रिकाम्या पोटी घ्यायची असतात. प्रतिबंधक व उपचारात्मक असल्यामुळे नेहमी घेतले तरी चालते. या सोबतच शितोफलदी चूर्ण ही दिवसातून ३-४ वेळा १ चमचा मधासोबत घ्य़ावे, अशाच प्रकारे लेंडी पिंपळीची पूडही घेता येते.

याशिवाय अस्थमावर आरामदेही असणारे बरेच क्षारयुक्त औषध आहेत. त्यापैकी कनकासव. श्वासकासवचिंतामणी रस, इत्यादींचा प्रयोग करता येतो. पण आपल्या डॉक्टरांना विचारूनच, सर्वात कफनाशक असे घरगुती आयुर्वेदिक औषध म्हणजे कडुलिंबाच्या खोडाला पोखरून त्यात आंतमध्ये हळकुंड ४५ दिवस ठेवावे. असे करण्याने कडुलिंबाचा रस त्या हळकुंडात शोषला जातो. त्यानंतर हळकुंड खोडातून बाहेर काढून घ्यावे. त्याचे लहान लहान तुकडे करून रूग्णाला रोज चोखायला द्यावे. यामुळे कफ बाहेर पडण्यास मदत होते.

फुप्फुसातील कफ काढण्यासाठी वापरण्यात येणार्‍या क्रिया:
हृदयाच्या स्थितीनुसार फुप्फुसात - रालाचे उजव (राइट) आणि डावे (लेफ्ट) असे भाग होतात. हे दोन भाग विभागले जाऊन त्याच्या शाखा तयार होतात. ह्या शाखा विभागल्या जाऊन उपशाखा तयार होतात. त्याचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे:

उजवे फुप्फुस डावे फुप्फुस
१) अग्रस्थ उपशाखा १) अग्रस्थ उपशाखा
२) पश्‍च उपशाखा २) पश्‍च उपशाखा
३) पुरस्थ उपशाखा ३) पुरस्य उपशाखा
४) पार्श्र्विक उपशाखा ४) ऊर्ध्वस्थ उपशाखा
५) मध्य उपशाखा ५) अधस्थ उपशाखा
६) अग्र तलस्थ ६) अग्रस्थि किंवा ऊर्धस्थ उपशाखा
७) मध्यतलस्थ ७) डावी तलस्थ उपशाखा
८) पुरतलस्य ८) पुरतलस्य उपशाखा
९) पार्श्र्विक तलस्थ ९) पार्श्र्विक तलस्थ उपशाखा
१०) पश्‍च तलस्थ १०) पश्‍च तलस्थ उपशाखा


कफ काढण्याचे ५ प्रकार आहेत
१. श्वसन योगक्रिया
२. थोपटणे किंवा दाब
३. तरंग योगक्रिया
४. जोराने हलविणे
५. कफ काढणे

पूर्व शाखा - अग्रशाखा
ह्या शाखेतील कफ काढण्याकरिता रोग्याला पाय लांब करून पाठीला तक्या लावून बसवावे.

उजवी पूर्वशाखा - पुरस्थ उपशाखा

डावी पूर्वशाखा - अग्रस्थ पश्‍च उपशाखा
ह्या शाखेतील कफ काढण्याकरिता रोग्याला उजव्या कडेला झोपवून डोक्याखाली आणि पोटाजवळ असे दोन तक्के लावावे.

पूर्वशाखा - पुरस्य उपशाखा
ह्या शाखेतील कफ काढण्याकरीता रोग्याला सरळ झोपवून त्याच्या डोक्याखाली आणि पोटाखाली असे दोन तक्के लावावे.

उजवी मध्यशाखा - अग्रस्थ पश्‍च उपशाखा

डावी पूर्वशाखा - ऊर्ध्वस्थ आणि मध्यस्थ उपशाखा
रोग्याला सरळ झोपवून त्याच्या पाठीशी आणि डोक्याखाली डाव्या बाजूस दोन तक्के लावावे. रोग्याचा पलंग पायाकडून १४ इंच उंच आणि डोक्याकडिल बाजूस १५ अंशाचा कोन तयार अशा स्थितीत ठेवावे. त्याचप्रमाणे डावी ऊर्ध्वस्थ आणि अध्यस्थ उपशाखेतील कफ काढण्याकरिता पलंगाची स्थिती तशीच ठेवून रोग्याला डाव्या कडेवर झोपवावे.

डावी उत्तर शाखा - पार्श्र्विक तलस्य उपशाखा

उजवी उत्तर शाखा - मध्यतलस्थ उपशाखा
डाव्या उत्तर शाखेतील कफ काढण्यासाठी रोग्याला डाव्या कडेवर झोपवून, डोक्याशी एक तक्या ठेवावा त्याच बरोबर पलंग पायाकडून १८ इंच उंच करून डोक्याशी ३० अंशाचा कोन करावा. उजव्या उत्तर शाखेतील कफ काढण्यासाठी रोग्याला उजव्या कडेवर झोपवावे. पलंगाची स्थिती वरील प्रमाणे असावी.

उत्तर शाखा - अग्रस्थ किंवा ऊर्ध्वस्थ उपशाखा
रोग्याला पोटावर झोपवुन पोटाखाली एक तक्क्या आणि पायाखाली एक असे दोन तक्के लावल्यास ह्या शाखेतील कफ काढता येईल. योग्य त्या मार्गदर्शनाद्वारे योगक्रियांचा वापर केल्यास तुम्हाला सशक्त बनविण्यास मदत होईल.